DNA मराठी

ताज्या बातम्या

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली

Onions Price In Maharashtra : लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले कांद्याचे दर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव फक्त १० दिवसांत ३६ रुपये प्रति किलोवरून १७ रुपये २५ पैशांवर आले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. काय आहे कारण?निर्यात शुल्क: केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले २०% निर्यात शुल्क हे या भावात मोठी घसरणीचे प्रमुख कारण आहे. यामुळे कांद्याची निर्यात कमी झाली आहे आणि देशांतर्गत बाजारात आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. निवडणुका: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात राजकीय कारणांसाठी कांद्याचे भाव वाढवण्यात आले होते. मात्र, निवडणुका संपल्यानंतर हे कृत्रिम वाढीव भाव टिकू शकले नाहीत. शेतकऱ्यांची स्थिती:नुकसान: शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी खूप खर्च येतो. मात्र, सध्या मिळत असलेले भाव या खर्चाच्याही खाली आहेत. यामुळे शेतकरी मोठे आर्थिक नुकसान सोसत आहेत. चिंता: भाव कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यांना पुढील पिकासाठी कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते. सरकारकडे मागणी: शेतकरी सरकारकडे या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. सरकार काय करू शकते?निर्यात शुल्क हटवा: सरकारने कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क हटवले तर कांद्याची निर्यात वाढेल आणि देशांतर्गत बाजारात भाव स्थिर राहू शकतात. खरेदी: सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून त्यांना आधार देऊ शकते. प्रोत्साहन: सरकारने कांद्याच्या नवीन उत्पादनांना प्रोत्साहन देऊन बाजारपेठेतील विविधता वाढवू शकते.काय करावे? एकत्र येऊन लढा: शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारकडे आपली मागणी ठामपणे मांडावी. बदलाव: शेतकरी पिकांची विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. संगठन: शेतकरी संघटनांमध्ये जाऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा. कांद्याच्या भावात मोठी घसरण ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. सरकारने या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीही एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा.

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

मोठी बातमी: जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू – २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत आदेश प्रभावी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश २१ डिसेंबर २०२४ पासून ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, धारदार हत्यारे, दारुगोळा, स्फोटके किंवा अनुशासन बिघडवणाऱ्या वस्तू बाळगणे व पाच किंवा त्याहून अधिक लोकांचा जमाव करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. सवलती यांना लागू नाही बंदी: कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 📢 नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra Government: आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करणार, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्याकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा

Maharashtra Government: जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधीचा विनियोग करताना विविध योजनांचे अभिसरण करून आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि विकास आराखड्यात रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्यावा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरिकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसामुद्रे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.गेडाम यांनी जिल्हा विकास आराखड्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार व्हावा. विविध योजनांच्या अभिसरणाद्वारे विकासाचे नियोजित उद्दिष्ट पूर्ण होईल आणि त्या भागातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल याचा विचार विकास आराखड्यात असावा. त्यासाठी प्राधान्याच्या विशिष्ट विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आवश्यक सुविधा उभाराव्यात. विविध शासकीय,अशासकीय संस्थांची मदत घेऊन कृषी आणि दुग्ध व्यवसाय आधारित क्लस्टरमधून निर्यात करण्याबाबत शक्यतांचा विचार व्हावा. अशा क्लस्टरच्या विकासासाठी अपेक्षित सुविधा उभारण्यावर भर द्यावा. एखाद्या क्षेत्राचा विकास करताना त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधांचा विकास करण्याकडे अधिक लक्ष द्यावे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा विचार करताना तेथील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्यावा. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना टुरिस्ट गाईडचे प्रशिक्षण देण्यात यावे, असेही डॉ.गेडाम म्हणाले. डॉ.गेडाम यांनी यावेळी जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा घेतला. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गाव जल परिपूर्ण करण्यासाठी पुढील 30 वर्षाचे नियोजन करा, त्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. गावाच्या पाण्याची गरज लक्षात घेण्यासोबत नदी किंवा नाला प्रवाहितही राहील याचाही विचार करावा, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील विकासाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येऊन प्राधान्याने गायसामुद्रे यांनी जलसंधारण योजनांचा आढावा सादर केला. यावेळी जिल्हा विकास आराखडा, जलयुक्त शिवार योजना , गाळमुक्त धारण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अमृत सरोवर अभियान आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.

Maharashtra Government: आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करणार, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्याकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा Read More »

Pune Road Accident: पुण्यात भीषण अपघात, डंपरने लोकांना चिरडले, 3 ठार, 6 जखमी

Pune Road Accident: पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. माहितीनुसार, मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मद्यधुंद कारचालकाने 9 जणांना चिरडलेघटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वाघोली, पुणे येथील केसनंद फाट्याजवळ हा अपघात झाला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या लोकांवर वाहन चालवल्याने हा अपघात झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे सर्व लोक मजूर असून अमरावतीहून पुण्यात कामानिमित्त आले होते. अपघातादरम्यान फूटपाथवर एकूण 12 जण झोपले होते. त्यानंतर एका डंपरचे नियंत्रण सुटले आणि झोपलेल्या कामगारांना पायदळी तुडवत थेट फूटपाथवर गेला. चालकाला अटकपोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला. पोलिसांनी आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

Pune Road Accident: पुण्यात भीषण अपघात, डंपरने लोकांना चिरडले, 3 ठार, 6 जखमी Read More »

Delhi Assembly Election: आप-काँग्रेसला धक्का, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ओवेसींची एन्ट्री, ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देणार

Delhi Assembly Election: पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये एआयएमआयएम देखील उमेदवार देणार असल्याची घोषणा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी पक्षाकडून मुस्तफाबादमधून ताहीर हुसेन यांच्या नावाची घोषणा देखील पक्षाकडून करण्यात आली आहे. माहितीनुसार एआयएमआयएम दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 10 जागांवर निवडणुक लढवणार आहे. एआयएमआयएमच्या या घोषणेनंतर सत्ताधारी आम आदमी पक्षाला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे एआयएमआयएमने केवळ ताहिर हुसैन यांना तिकीट दिले नाही तर 18 डिसेंबर रोजी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या मतदारसंघात रॅलीही काढली. मुस्लीमबहुल मुस्तफाबाद येथे रॅली काढताना ओवेसी म्हणाले की, राजकारणात मुस्लिमांना कोणीही नेतृत्व देऊ इच्छित नाही. त्यांचे नेतृत्व कोणालाही सहन होत नाही. ते म्हणाले की भारतातील प्रत्येक समुदायाला राजकीय नेतृत्व आहे परंतु मुस्लिमांसाठी राजकीय नेतृत्व तयार करण्यात लोकांना अडचणी येतात. एआयएमआयएम दिल्लीतील दहा विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मुस्तफाबाद या एका जागेसाठी ताहिर हुसेन यांची नावे आधीच जाहीर करण्यात आली आहेत. पक्ष लवकरच 9 जागांची घोषणा करेल. ओवेसी यांचा पक्ष सीलमपूर, बाबरपूर, बल्लीमारन, चांदनी चौक, ओखला, जंगपुरा, सदर बाजार, मतिया महल आणि करावल नगर या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. आम आदमी पक्षाने 10 पैकी 9 जागा जिंकल्यादिल्लीचे राज्य प्रभारी इम्तियाज जलील म्हणाले की, पक्ष सर्वेक्षण करत आहे जेणेकरून योग्य उमेदवार उभे करता येतील. वृत्तांवर विश्वास ठेवला तर AIMIM ने ज्या 10 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यापैकी 9 जागांवर मुस्लिम बहुल आहेत. या जागा आम आदमी पक्षाकडे आहेत.

Delhi Assembly Election: आप-काँग्रेसला धक्का, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ओवेसींची एन्ट्री, ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देणार Read More »

Rahul Gandhi: लोकसेभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर

Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज सोमवारी परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणी दौऱ्यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील व त्यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. या दोन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील व संध्याकाळी ५.१५ वाजता विमानाने दिल्लीला जातील. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित देशमुख, खा. रविंद्र चव्हाण, खा. डॉ. कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत लोकांना अमानुष मारहाण केली व निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणालाही अटक केली होती त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणात शांतता प्रस्थापित करत असताना विजय वाकोडे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा ह्लदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Rahul Gandhi: लोकसेभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर Read More »

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी… खासदार लंकेंची सरकारवर टीका

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेली नाही. अशी टीका माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी राज्य सरकारवर केली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की,बीडमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. मी संसदेमध्ये सुद्धा प्रश्न आण्याचा प्रयत्न केला.आज स्वतः शरद पवार त्यांना भेटायला जाणार आहे. आरोपीचा प्रत्यक्ष रित्या सबंध आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेल नाही. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. अशी प्रतिक्रया खासदार लंके यांनी केली. तसेच याला राजकीय रंग ना देता ज्याचा प्रत्यक्ष सबंध आहे त्यांच्यावर करवाई झाली पाहिजे आणि प्रत्येकाची हीच मागणी आहे. अशी मागणी देखील त्यांनी केली. राष्ट्रवादी एक की दोन?आमचे नेते जी भूमिका घेतील ती आमची भूमिका असेलसुप्रिया सुळे ज्यांच्या बाजूने असतील त्यांच्या बाजूने आम्ही असू. निवडणुकीत ज्या गोष्टी झाल्या त्या तेव्हा सोडून द्यायच्या असतात. असं देखील ते म्हणाले. धडाडीचे नेते आहेत भुजबळतर राज्य सरकारमध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळाला पाहिजे होता असं देखील ते म्हणाले. धडाडीचे नेते आहेत भुजबळ. त्यांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे होती. भुजबळ यांना चांगल खात मिळायला पाहिजे होत. ते एक ताकदीचे नेते आहेत. स्पष्ट वक्ता आहेत भुजबळ जे पोटात ते ओठात. असेही निलेश लंके म्हणाले. तसेच भुजबळ आमच्या पक्षात आलेच तर स्वागत आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी दिली.

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी… खासदार लंकेंची सरकारवर टीका Read More »

Rey Misterio Sr Passes Away : WWE स्टार रे मिस्टेरियो यांचे निधन

Rey Misterio Sr Passes Away: WWE स्टार रे मिस्टेरियो सीनियर यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रे मिस्टेरियो सीनियर हे WWE स्टार रे मिस्टेरियो जूनियरचे काका होते. रे मिस्टेरियो सीनियरने वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन आणि Lucha Libre AAA वर्ल्ड वाइड यासह अनेक संस्थांसोबत टायटल जिंकले होते. रे मिस्टेरियो सीनियर यांनी द ग्रेट खली आणि जॉन सीनासारख्या अनेक दिग्गजांना टक्कर दिली होती.रे मिस्टेरियो सीनियरला पराभूत करणे या मोठ्या दिग्गजांसाठीही सोपे नव्हते. Lucha Libre AAA ने रे मिस्टेरियो सीनियर यांच्या मृत्यूबद्दल अधिकृत निवेदनात म्हटले आहे. “आम्ही मिगेल एंजल लोपेझ डायस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो, ज्यांना रे मिस्टेरियो सीनियर म्हणून ओळखले जाते. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो. आम्ही तुम्हाला सांगूया की रे मिस्टेरियो सीनियरच्या कुटुंबीयांनी 20 डिसेंबर रोजी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली होती. 2009 मध्ये WWE चा निरोप घेतलारे मिस्टेरियो सीनियरची WWE कुस्ती कारकीर्द प्रदीर्घ होती. तथापि, 2009 मध्ये, त्याने वयाच्या 51 व्या वर्षी WWE कुस्तीमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर, त्याचा भाचा रे मिस्टेरियो जूनियर WWE मध्ये त्याचा वारसा पुढे नेत आहे.

Rey Misterio Sr Passes Away : WWE स्टार रे मिस्टेरियो यांचे निधन Read More »

Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Police : शेवगाव पोलीसांनी मोठी कारवाई करत अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेवुन आरोपीस 24 तासाचे आत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा आप्पासाहेब काजळे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांचे पती आप्पासाहेब भानुदास काजळे यांना 18 डिसेंबर रोजी दोन ते तीन इसमांनी बोधेगाव येथुन बळजबरीने वाहनात टाकुन पळवुन नेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळी तीन पोलीस पथके तयार करुन जि.सांगली, जि.बीड तसेच तिसरे पथक ता.पैठण हद्दीत रवाना केली. तपासाच्या सहाय्याने जि.बीड येथे गेलेल्या तपास पथकाला माहिती मिळाली की शिरुर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबुन ठेवले आहे. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना तसेच अपहरित व्यक्तीस ताब्यात घेतले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सोमनाथ बाबुश्या जाधव (रा. औरंगपुर ता.शिरुर कासार जि.बीड) असं आहे. तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेऊन नमूद गुन्ह्यात लवकरात लवकर अटक करणार आहोत.

Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई Read More »

Shrigonda Police: सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

Shrigonda Police: श्रीगोंदा पोलिसांनी मोठी कारवाई करत मांडवगण येथील सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी व दान पेटीतील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासाचे आत अटक केली आहे. माहितीनुसार, मांडवगण गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या आतील गाभा-यात असणारी दानपेटी चोरी झाल्याची तक्रार मंदीराचे पुजारी पोपट गणपत खराडे यांनी 16 डिसेंबर रोजी दाखल केली होती. या गुन्हेचा तपास करत असताना बाळु वसंत घोडके याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांस 05 दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनावले आहे. दान पेटीमधील 17,600 रुपये किमतीची रोख रक्कम देखील आरोपीकडून पोलिसांनी जप्त केली आहे.

Shrigonda Police: सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद Read More »