Devendra Fadnavis: इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मतदार यादीत घोळ असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच राज्यात पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आणि आणखी सहा महिने झाले नाहीतर काही फरक पडणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर जेव्हापर्यंत मतदार यादीमध्ये असलेला घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते असा टोला लावला आहे. सोलापुरात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते. आगामी निवडणुकीत पराभव दिसत असल्याने आधीच नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच विरोधकांमध्ये सर्वात समजदार हे शरद पवार आहेत. मतदार यादीत सुधारणा करण्यास माझा पाठिंबा आहे असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.