DNA मराठी

हायलाईट

sangli

Sangali News :  बिबट्याला रोखण्यासाठी बियरच्या बाटल्या वापरून सांगलीत अनोखं ‘जुगाड’

Sangali News  : सध्या ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र, वाळवा तालुक्यातील कुरळप येथील एका जिद्दी शेतकऱ्याने या संकटावर मात करण्यासाठी शक्कल लढवली आहे. शेतात बिबट्या येऊ नये म्हणून त्यांनी चक्क बियरच्या रिकाम्या बाटल्या आणि नट-बोल्टचा वापर करून एक ‘ध्वनी यंत्र’ तयार केले आहे. त्यांच्या या अनोख्या जुगाडाची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. कुरळप येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांची मळ्यामध्ये वस्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीवरील जनावरांच्या शेडपर्यंत येत असल्याने जनावरांच्या शिकारीची भीती निर्माण झाली होती. वनविभागाकडे दाद मागण्यासोबतच स्वतःच्या पातळीवर काहीतरी करणे गरजेचे होते.असे तयार केले ‘स्वदेशी अलार्म’ बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी आवाजाला घाबरतात, हे ओळखून चव्हाण यांनी एक शक्कल लढवली त्यांनी झाडाच्या फांद्यांवर बियरच्या रिकाम्या बाटल्या सुतळीने टांगल्या.त्या बाटल्यांच्या आत नट-बोल्ट आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे अशा प्रकारे अडकवले की वाऱ्याच्या मंद झुळुकीनेही त्यातून ‘खुळखुळ’ असा आवाज येतो. काचेवर धातू आदळल्याने निर्माण होणारा हा आवाज रात्रभर सुरू राहतो. या प्रयोगाचा फायदा असा झाला की, रात्रीच्या शांततेत या बाटल्यांचा सतत आवाज येत राहिल्याने बिबट्याला तिथे माणसांची चाहूल किंवा काहीतरी हालचाल असल्याचा भास होतो. परिणामी, बिबट्याने या शेडच्या परिसराकडे फिरकणे बंद केले आहे. अत्यंत कमी खर्चात आणि टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले हे सुरक्षा यंत्र कुरळपमधील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.शासकीय मदतीची वाट न पाहता आपल्या बुद्धीचा वापर करून संकट कसं परतावून लावता येतं, याचं उत्तम उदाहरण चव्हाण यांनी घालून दिलं आहे.

Sangali News :  बिबट्याला रोखण्यासाठी बियरच्या बाटल्या वापरून सांगलीत अनोखं ‘जुगाड’ Read More »

pune crime

Maharashtra Crime News : मोठी कारवाई, पबवर धाड अन् 3.67 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 50 जण ताब्यात

Maharashtra Crime News : पुण्यातील विमाननगर परिसरातील ‘द नॉयर’ (रेड जंगल) पबमध्ये बेकायदा सुरू असलेल्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केलीये. या कारवाईमध्ये महिला व पुरुष मिळून 50 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पब मालकासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलायं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक अतुल कानडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात सुमारे 3 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 178 विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच अवैध मद्यव्यवसायासाठी वापरलेले साहित्य खुर्चा, सोफा, लाकडी टी-पॉय, लोखंडी लोखंडी साहित्य, स्पीकर्स, साऊंड सिस्टम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन आदींचा समावेश आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदा पार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 21 भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती अधीक्षक कानडे यांनी दिली. या प्रकरणात एकूण 52 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून पब चालक व व्यवस्थापक असे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Maharashtra Crime News : मोठी कारवाई, पबवर धाड अन् 3.67 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 50 जण ताब्यात Read More »

maharashtra news

Maharashtra News: दारू रोख, दूध उधारीवर : आपलीच प्राधान्ये…प्रगती की मूल्यांची माघार?

Maharashtra News : चपला आज झगमगत्या शोरूममध्ये शोभून दिसतात; मात्र पुस्तकांची जागा रस्त्यावर येऊन ठेपली आहे. ज्ञानाऐवजी उपभोगाला प्राधान्य दिलं जाणारं हे चित्र केवळ बाजारपेठेचं नाही, तर आपल्या सामाजिक मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. दारू रोख पैशांत सहज उपलब्ध आहे, पण दूध मात्र उधारीवर घ्यावं लागतंही विसंगती आपल्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उभं करते. कुत्रे वातानुकूलित घरांत सन्मानानं राहतात, तर शेतकऱ्याची गाय रस्त्यावर भटकताना दिसते. प्राण्यांप्रती प्रेम असणं गैर नाही मात्र उपयुक्ततेऐवजी दिखाव्याला महत्त्व दिलं जात असेल, तर तो विवेकाचा पराभव ठरतो. शहरांचा विस्तार झाला, उंच इमारती उभ्या राहिल्या, पण संवेदनशीलतेचं अधिष्ठान मात्र ढासळत गेलं. आजची तरुण पिढी परदेशात नोकरी करत आहे, करिअर घडवत आहे, ही बाब अभिमानास्पदच आहे. मात्र ज्यांनी त्यांच्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, त्या आई-वडिलांचं आयुष्य वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजलं जात असेल, तर ही प्रगती एकांगी ठरते. आर्थिक स्वावलंबन मिळालं पण भावनिक नात्यांचं काय? समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, हा प्रश्न पुन्हा एकदा ठळकपणे उभा राहतो. विकास म्हणजे केवळ सोयी-सुविधांची वाढ नव्हे, तर मूल्यांची जपणूकही तितकीच महत्त्वाची आहे. अन्यथा ही वाटचाल प्रगतीकडे नसून, समाजाच्या अधःपतनाकडे नेणारी ठरेल.

Maharashtra News: दारू रोख, दूध उधारीवर : आपलीच प्राधान्ये…प्रगती की मूल्यांची माघार? Read More »

sanjay raut

Sanjay Raut on NCP Alliance: पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut on NCP Alliance : पुण्यातील राजकारणात सध्या हाय वॉल्टेज ड्रामा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेसाठी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आता अजित पवार कोणतीही सुरक्षा न घेता कुठे तरी निघून गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे मला माहिती नाही असं म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला माहिती नाही, त्यांच्या पक्षात काय चाललय त्यावर मी काय बोलणार. अजून तिथे काही घडत नाही आहे. तर दुसरीकडे यावेळी राऊत यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी बरोबर युतीसाठी आमची सकारात्मक चर्चा झाली असून त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुतेक जागा त्यांना दिल्यात असल्याची माहिती दिली आहे. तसेच आमच्या युतीत काही अडचण या क्षणी दिसत नाही, मनसेच्या गोटातल्या काही जागा आहेत . पण आम्ही त्याचं समाधान केलंय. आमच्या सोबत असावेत आमची इच्छा आहे. आमच्या वाट्याच्या जागा दिल्यात, आमचं नुकसान झालं पण ठीक आहे ते चालेल. आमच्या अनेक जागा मनसेला सीटिंग आहेत, आमचेही लोक नाराज झाले, पण युतीमध्ये या गोष्टी पहायच नाही असं संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेना मनसे युती आहे. राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे. जागा वाटप पूर्ण झालं आहे पण ठाण्यात महत्व वेगळं आहे, भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचा आहे. लोकसभा विधानसभेच गणित वेगळं होतं तिथे आमची केवळ भाजपशी लढाई असेल असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on NCP Alliance: पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? संजय राऊत स्पष्टच बोलले Read More »

ajit pawar

Ajit Pawar: पुण्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके गेले कुठे?

Ajit Pawar: पुणे महापालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सकाळी बारामती हॉस्टेल मधून पोलीस संरक्षण,पोलीस ताफा काहीही न घेता एकटे निघाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके कुठे गेले याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार बारामती हॉस्टेल मधून निघून जिजाई या त्यांच्या निवासस्थानी असण्याची शक्यता आहे. अजित पवार बारामती हॉस्टेल मधून ज्या गाडीतून निघाले ती गाडी जिजाई बंगल्या मध्ये असल्याने अजित पवार देखील जिजाई बंगल्यातच असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युतीसाठी अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली असून लवकरच युती बाबत निर्णय होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या निवडणुकीत एकत्र लढणार असून काँग्रेस स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Ajit Pawar: पुण्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके गेले कुठे? Read More »

imtiyaz jaleel

AIMIM Candidate For Ahilyanagar Municipal Corporation Election : इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा; अहिल्यनगर महापालिकेसाठी माजी नगरसेवकासह चार जणांना उमेदवारी

AIMIM Candidate For Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा करत प्रभाग क्रमांक 4 साठी उमेदवारांची घोषणा केली आहे. इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. तर लवकरच दुसरी यादी देखील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एमआयएमकडून देण्यात आली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मधून माजी नगरसेवक समद खान यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांची पत्नी शहनाज खालिद शेख, शेहबाज सय्यद आणि सलमा शेख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शहरात सभा घेत अहिल्यानगर महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेसाठी एमआयएमकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. तर आता माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून अहिल्यानगर महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली असून चार जणांचा उमेदवारी देण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

AIMIM Candidate For Ahilyanagar Municipal Corporation Election : इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा; अहिल्यनगर महापालिकेसाठी माजी नगरसेवकासह चार जणांना उमेदवारी Read More »

gmail

Gmail च्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच होणार; मिळणार अनेकांना दिलासा

Gmail Update: अनेकांना दिलासा देण्यासाठी आता गुगल एक मोठा नियम बदलण्याची तयारी करत आहे.कंपनी एक नवीन फीचर आणत आहे जे वापरकर्त्यांना त्यांचा @gmail.com ईमेल ॲड्रेस बदलण्याची परवानगी देईल. पहिल्यांदाच जीमेल ॲड्रेस बदलण्याचा पर्याय आतापर्यंत, गुगलने फक्त थर्ड-पार्टी ईमेल ॲड्रेसने तयार केलेल्या खात्यांसाठी ईमेल बदलण्याची परवानगी दिली होती. जीमेल ॲड्रेस असलेल्या खात्यांमध्ये हे फीचर नव्हते, परंतु गुगल सपोर्ट पेज सूचित करते की कंपनी आता जीमेल वापरकर्त्यांना त्यांचा ईमेल ॲड्रेस बदलण्याचा पर्याय देत आहे. जुने जीमेल एक उपनाम बनेल नवीन फीचर अंतर्गत, जेव्हा वापरकर्ता नवीन जीमेल ॲड्रेस निवडतो तेव्हा जुना पत्ता हटवला जाणार नाही. गुगल जुना जीमेल ॲड्रेस उपनाम म्हणून वापरेल. याचा अर्थ असा की वापरकर्ते जुन्या आणि नवीन दोन्ही ईमेल ॲड्रेससह गुगल सेवांमध्ये लॉग इन करू शकतील. इतकेच नाही तर जुन्या जीमेल ॲड्रेसवरील ईमेल पूर्वीप्रमाणेच प्राप्त होत राहतील. गुगलने स्पष्ट केले आहे की या बदलाचा फोटो, मेसेज, ईमेल आणि इतर डेटावर परिणाम होणार नाही. काही निर्बंध लागू होतील तर दुसरीकडे या वैशिष्ट्यासह काही मर्यादा देखील असणार आहे. गुगलच्या मते, ईमेल पत्ता बदलल्यानंतर, वापरकर्ते एका वर्षासाठी नवीन गुगल खाते तयार करू शकणार नाहीत. शिवाय, वापरकर्ता त्यांचा जीमेल पत्ता एकूण तीन वेळाच बदलू शकतो. सर्वांसाठी उपलब्ध नाही गुगलने असेही म्हटले आहे की हे वैशिष्ट्य अद्याप सर्व वापरकर्त्यांसाठी लाइव्ह नाही. ते हळूहळू आणले जात आहे, म्हणून काही वापरकर्त्यांना थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते. सुरुवातीला, हा पर्याय मर्यादित संख्येच्या खात्यांवरच दिसेल. हा बदल का महत्त्वाचा? बऱ्याच वापरकर्त्यांनी वर्षांपूर्वी घाईघाईत किंवा तरुण वयात जीमेल आयडी तयार केले होते, जे आता व्यावसायिक किंवा वैयक्तिक गरजांसाठी योग्य वाटत नाही. म्हणूनच, गुगलच्या या हालचालीमुळे वापरकर्त्यांना नवीन खाते तयार न करता त्यांची डिजिटल ओळख सुधारण्याची संधी मिळेल.

Gmail च्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच होणार; मिळणार अनेकांना दिलासा Read More »

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Rahuri By election : भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ३ जानेवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नव्याने पात्र असलेल्या मतदारांची नोंदणी करणे व दोषरहित मतदार यादी तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. यात कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. प्रारूप मतदार यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ०१/०१/२०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व भारताचा नागरिक असलेल्या पात्र व्यक्तीस नाव नोंदणी करता येईल. नवीन नाव नोंदणीसाठी ‘नमुना नं. ६’ भरावा लागेल. याशिवाय मतदार यादीतील मयत अथवा दुबार नावे वगळण्यासाठी ‘नमुना नं. ७’, तर एका भागातून दुसऱ्या भागात नाव समाविष्ट करणे किंवा तपशीलात (नाव, वय, लिंग, फोटो इ.) दुरुस्ती करण्यासाठी ‘नमुना नं. ८’ भरता येईल. यासाठी https://voters.eci.gov.in/ हे संकेतस्थळ व ‘Voter Helpline App’ या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार यांची, तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी व पुनर्वसन विभागाच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या अनुषंगाने २६ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर Read More »

nawab malik

Maharashtra Election: राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक मैदानात; नवाब मलिकसह ‘या’ नावांचा समावेश

Maharashtra Election : राज्यातील 29 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्या नावाला महायुतीमध्ये भाजपकडून जोरदार विरोध पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्यावर महापालिका निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांचा नाव स्टार प्रचारक म्हणून घोषित झाल्यानंतर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे आणि विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

Maharashtra Election: राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक मैदानात; नवाब मलिकसह ‘या’ नावांचा समावेश Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : मी हिंदुत्ववादी, ठाकरे बंधू एकत्र पण फरक पडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : राज्यातील राजकारणातील मोठी घडामोड घडली असून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून देखील ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले, “शिया आणि युक्रेन एकत्र आल्यासारखे प्रचार केला जात आहे, झेलेन्स्की आणि पुतिन बोलत आहेत, त्यांचे अस्तित्व शोधणारे पक्ष, त्यांचे अस्तित्व गमावलेले पक्ष, ज्यांनी वारंवार भूमिका बदलून स्वतःबद्दल अविश्वास निर्माण केला आहे असे दोन पक्ष एकत्र आले तर काय फरक पडेल? हे दोन्ही पक्ष त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या लोकांनी महायुती सरकारचा विकास पाहिला आहे. मुंबई आमच्यासोबत आहे, मुंबई आमच्यासोबत राहील आणि महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल.” फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप निराश व्यक्ती आहेत, म्हणून मला वाटते की त्यांच्या शब्दांना महत्त्व देऊ नये. तसेच मी हिंदुत्ववादी आहे संपूर्ण जगाला माहिती आहे असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज यांनी युतीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र राहण्यासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (यूबीटी) फक्त 20 जागा मिळाल्या होत्या, तर मनसेला यश मिळाले नव्हते.

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : मी हिंदुत्ववादी, ठाकरे बंधू एकत्र पण फरक पडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल Read More »