DNA मराठी

हायलाईट

rain

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका

Rain Alert: जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे – नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने २२७ व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहिल्यानगर (कापुरवाडी, केडगांव, भिंगार, चिचोंडी, चास), श्रीगोंदा (मांडवगण, कोळेगांव), कर्जत (मिरजगाव), जामखेड (जामखेड, खर्डा, नान्नज, नायगांव, साकत), शेवगांव (बोधेगांव, चापडगांव, मुंगी), पाथर्डी (पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगांव, करंजी, तिसगांव, खरवंडी, अकोला) अशा मंडळांच्या गावांमध्ये ७० मिमी ते १५५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. बचावकार्याची ठळक माहिती अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी, जामखेड – पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील ७० जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील ३ जण , पिंपळगव्हाण – १, खरमाटवाडी – २५, कोरडगाव – ४५ व कोळसांगवी – १२ व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली. जामखेड तालुक्यातील धनेगाव – ४ व्यक्ती, वंजारवाडी – ३०, शेवगांव तालुक्यातील खरडगांव – १२ व आखेगाव – २५ नागरिकांना पुरामधून वाचविण्यात आले. मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगांव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका Read More »

rain

Ahilyanagar Rain Alert: नगर जिल्ह्यात 24 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

Ahilyanagar Rain Alert: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार २३ आणि २४ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १०,१९८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, ओझर बंधारा ४,२९९ क्युसेक, मुळा धरणातून ५,००० क्युसेक, घोड धरणातून ३,००० क्युसेक, सीना धरणातून ११,५६० क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ३०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १,६०० क्युसेक, खैरी धरण येथून ९,६१३ इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Ahilyanagar Rain Alert: नगर जिल्ह्यात 24 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »

oplus 16908288

Maharashtra Rain Alert: शेतकऱ्यांनो पिकांना सुरक्षित ठेवा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत धो धो पाऊस

Maharashtra Rain Alert: 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, आणि 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे. या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे. ज्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपार नंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Rain Alert: शेतकऱ्यांनो पिकांना सुरक्षित ठेवा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत धो धो पाऊस Read More »

sawedi land scam the then board officer and then talathi were suspended, what's next, what's the matter.

Sawedi land scam – तत्कालीन मंडळाधिकारी व तत्कालीन तलाठी निलंबित, पुढे काय, काय आहे प्रकरण.

Sawedi land scam – अहिल्यानगर, २२ सप्टेंबर २०२५ –  सावेडी (गट क्रमांक २४५) येथील जमीन फेरफार प्रकरणातील गंभीर अनियमितता आढळल्यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पारनेर तालुक्यात कार्यरत मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना व तत्कालीन तलाठी प्रमोद दत्तात्रय गायकवाड यांनाही तातडीने शासनसेवेपासून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर भाग यांच्या पत्रावरून आणि त्यानुसार तयार झालेल्या तपास अहवालाच्या आधारे लागू करण्यात आले आहेत. अहवालात दिलेल्या निष्कर्षानुसार १९९१ मध्ये नोंद झालेल्या खरेदी दस्तावेजांमध्ये फेरफार करताना कोणत्याही सक्षम न्यायालयाचा आदेश न घेता व कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता ३४ वर्षांनंतर नोंदी करण्यात आल्या आहेत. ही कृती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८ या नियमांचे उल्लंघन ठरते, असे अहवालात नमूद आहे. अहवालातील मुख्य ठळक निष्कर्षः मुद्दे – सावेडी जमीन घोटाळा प्रकरण या निष्कर्षांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या कलमान्वये शिस्तभंगविषयक कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तलाठी प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्धही लेखी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. नागरिकांची प्रतिक्रिया व मागणीस्थानिक नागरिकांमध्ये या घटनेनंतर नाराजी लक्षात येत आहे. अनेक नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की अशा प्रकारच्या चुका सामान्य माणसाच्या आयुष्याला उध्वस्त करण्याची हिंमत करतात; त्यामुळे केवळ निलंबनापुरते मर्यादित न राहता कठोर प्रशासनिक आणि कायदेशीर कारवाई व्हायला हवी. काही नागरिकांनी प्रशासकीय निष्क्रियतेविरुद्ध आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी व्यक्त केली आहे. शासनाची दिशा आणि पुढील पावले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चालू तपास व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निलंबनात्मक आदेश लागू राहतील. परंतु अधिकार्यांच्या निलंबनानंतर पुढील अभ्यास व नोंदींचा आराखडा कसा असेल, ही बाब प्रशासनाच्या अंतर्गत निर्णयांवर अवलंबून राहील. काही वर्तुळांत असेही मत आहे की प्रशासकीय तपास संपल्यानंतर सहा–सात महिन्यांनी फेरविचार करून अधिकार्‍यांना कामावर परत आणण्याचे पर्यायही विचारात घेतले जाऊ शकतात, मात्र या अधिकाऱ्यांच्या चुकी मुले अनेक वर्ष हे प्रकरण न्यायलयात चालणार यात शंका नाही,

Sawedi land scam – तत्कालीन मंडळाधिकारी व तत्कालीन तलाठी निलंबित, पुढे काय, काय आहे प्रकरण. Read More »

yogendra yadav

Yogendra Yadav : देशाला सध्या आणीबाणीपेक्षा अधिक धोका; योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन

Yogendra Yadav : आणीबाणी काळात लोकशाही धोक्यात आली होती. मात्र आता मोदी सरकारच्या काळात लोकशाहीसह देशाची संस्कृती, सभ्यता, आयडिया ऑफ इंडिया धोक्यात आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि मोदींविरोधातील लढाई तीव्र करून एकूण अन्यायाच्या विरोधात परावर्तित केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते योगेंद्र यादव यांनी केले. समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त पुण्यात तीन दिवसीय समाजवादी एकजुटता संमेलन पार पडले. पुणे घोषणा पत्र या सत्रात यादव बोलत होते. अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती चळवळीचे नेते अविनाश पाटील होते. या सत्रामध्ये अमूल्य निधि (इंदौर), विनोद शिरसाठ, अशोक पांडा (छत्तीसगड), हरीश खन्ना, शाहिद कमाल, सिद्धराम पैटी आदी सहभागी होते. सुनीति सु. र., गीता आर यांनी घोषणा पत्राचा प्रस्ताव मांडला. देशाला लोकशाहीवादी बनविण्याचे काम समाजवादी चळवळीने केले आहे. देशातील सध्याच्या प्रश्नांचा मुकाबला करण्याची ताकद देखील समाजवादी विचारांमध्ये आहे. प्रत्येक समाजवादी व्यक्तीने संघ, भाजप यांना प्रतिकार करणे हा पहिला धर्म आहे. अन्यथा त्यांना समाजवादी म्हणवून घेण्याचा अधिकारी नाही, असेही यादव म्हणाले. राजकीय सामाजिक संस्था संघटनांमध्ये पन्नास पंचावन्न वय झाले तरी ते कार्यकर्ते स्वतःला तरुण समजतात. वयोवृद्ध झाल्यावरही पदांचा मोह त्यांना सुटत नाही. त्यामुळे व्यवकांनी संघर्ष करून संस्था संघटनांमधील सत्ता हस्तगत केली पाहिजे. अनेक ठिकाणी असे संघर्ष उभे राहिले आहेत, असे अविनाश पाटील म्हणाले. हिंदीभाषा दिन बंद करावा मी स्वतः हिंदीप्रेमी आहे. मात्र हिंदी भाषा दिन साजरा करण्याची गरज नाही. सरकारने तो बंद करून भारतीय भाषा दिन सुरू करण्याची गरज आहे. हिंदी आणि इतर भाषांमध्ये वाद निर्माण केला जात आहे. उलट सर्व भाषांनी एकमेकांशी एकोपा निर्माण करून सरकारच्या विरोधात सांस्कृतिक लढाई लढली पाहिजे, असेही योगेंद्र यादव म्हणाले.

Yogendra Yadav : देशाला सध्या आणीबाणीपेक्षा अधिक धोका; योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन Read More »

img 20250921 wa0010

Uddhav Thackeray: वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या हाती शिव बंधन…

Uddhav Thackeray : वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ( उ बा ठा ) शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह 20/9/2025 रोजी मातोश्री येथे पक्ष प्रवेश केला. सध्या अहिल्यानगर येथील अस्थिर राजकीय वातावरणात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व शहर प्रमुख किरण काळे यांच्या मागे खंबीर पणे उभे राहणे गरजेचे वाटल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतीक बारसे यांनी सांगितले. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील एक स्वच्छ चेहेरा असलेले प्रतीक बारसे यांनी शिवबंधन हाती बांधल्याने शहरातील राजकारण बदलणार आहे. दांडगा जनसंपर्क व सर्व सामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता मिळाल्याने किरण काळे यांची शहरात ताकत वाढणार आहे. या पक्ष प्रवेशाला स्वतः उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, नेते विनायक राऊत, अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे, अनिस चुडिवाल, सुनिल भोसले, विलास उबाळे, ओंकार वडे, अभिषेक बारसे, धरम परदेशी, प्रविण पवार, अमोल कारंडे, नदीम शेख, अंबादास सोले, सचिन वाघमारे आदी सह शकडो कार्यकर्ते उपास्थित होते.

Uddhav Thackeray: वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या हाती शिव बंधन… Read More »

navnath waghmare

Navnath Waghmare : मोठी बातमी, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या कारला जाळण्याचा प्रयत्न

Navnath Waghmare : जालन्यातील निलम नगर परिसरात रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लागल्याची घटना घडली. ही आग जाळपोळीच्या उद्देशाने लावण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणी वाघमारे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कदीम जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रविवारी रात्री साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळील निलम नगर येथील नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या कारमधून अचानक धूर निघू लागला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच वाघमारे यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गाडीजवळ एक संशयास्पद व्यक्ती आल्याचे दिसून आले, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी थेट जरांगे-पाटील यांच्या समर्थकांवर आरोप केले. “शनिवारी संध्याकाळपासून माझी गाडी घरासमोर झाकून ठेवलेली होती. मी दुसऱ्या गाडीने बाहेरगावी दौऱ्यावर होतो. रात्री जेवणानंतर मी गाडीपासून काही अंतरावर फिरायला गेलो असताना, दहा-पंधरा मिनिटांतच गाडीला आग लागल्याचा आरडाओरडा झाला,” असे वाघमारे यांनी सांगितले. या घटनेसाठी जरांगे-पाटील यांच्या समर्थकांना पूर्णतः जबाबदार धरत वाघमारे यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मी जरांगेसारखा भिकारचोट नाही. गाडी जाळल्याने ओबीसींचा आवाज दाबला जाणार नाही. आम्ही ठरवले आणि जरांगे यांच्या गाड्या आणि घरे जाळले तर चालेल का? परंतू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे निष्ठावान आहोत आणि असे कृत्य आम्ही करणार नाही.” याचवेळी वाघमारे यांनी शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. सध्या पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे जालन्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

Navnath Waghmare : मोठी बातमी, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या कारला जाळण्याचा प्रयत्न Read More »

img 20250920 wa0023

Sawedi Plot Scam : अखेर ‘त्या’ प्रकरणात तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप जायभाय निलंबित

Sawedi Plot Scam : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पारनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. सावेडी येथील गट क्रमांक २४५ मधील जमीन फेरफार प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या पत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. अहवालानुसार, १९९१ मध्ये नोंद झालेल्या खरेदी दस्ताअंतर्गत झालेल्या फेरफार प्रक्रियेत न्यायालयाचा आदेश नसताना ३४ वर्षांनंतर नोंद घेण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८ मधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. सदर खरेदी दस्ताच्या गावदप्तरी फेरफार नोंदी करताना तत्कालीन सावेडी मंडल अधिकारी जायभाय यांनी संबंधित खरेदीदार-खरेदीदारांना लेखी कळवले नसल्याचे नमूद आहे. तसेच शेती जमीन खरेदी करताना खरेदीदाराचा शेतकरी पुरावा न घेता थेट नोंद करण्यात आल्याची बाब उघड झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या कलमान्वये शिस्तभंगविषयक कारवाईस प्रारंभ करण्यात आला असून, तत्कालीन सावेड मंडळाधिकारी दिलीप जायभाय यांना तत्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Sawedi Plot Scam : अखेर ‘त्या’ प्रकरणात तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप जायभाय निलंबित Read More »

team india

IND vs OMAN : पैसा वसूल, भारताचा रोमांचक सामन्यात 21 धावांनी विजय

IND vs OMAN : भारताने आशिया कप 2025 च्या ग्रुप सामन्यातील तिसरा आणि शेवटचा सामना 21 धावांनी जिंकला आहे. ओमानविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत आठ विकेट्स गमावत 188 धावा केल्या. संजू सॅमसनने 56, अभिषेक शर्माने 38, तिलक वर्मा 29, अक्षर पटेल 26, हर्षित राणा 13 नाबाद, शुभमन गिल 5, हार्दिक पंड्या 1, शिवम दुबे 5, अर्शदीप सिंग 1 आणि कुलदीप यादवने नाबाद 1 धावा केल्या. ओमानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमान 20 षटकात 4 गडी गमावून फक्त 167 धावाच करू शकला आणि सामना 21 धावांनी गमावला. आमिर कलीमने 64 धावांची शानदार खेळी केली. हम्माद मिर्झा यांनीही 51 धावा केल्या. मात्र, या दोन दमदार खेळी असूनही ओमान जिंकू शकला नाही. ओमानकडून जतिंदर सिंगने 32, जिकरिया इस्लामने 0, विनायक शुक्ला 1 आणि जितेन रामनंदीने 12 धावा केल्या. मात्र, ओमानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तथापि, अर्शदीप सिंगने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या.

IND vs OMAN : पैसा वसूल, भारताचा रोमांचक सामन्यात 21 धावांनी विजय Read More »

rain

IMD Rain Alert: नगरकर सावधान, 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

IMD Rain Alert: नगर जिल्ह्यासह गेल्या काही दिवसांपासून राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेकांना याचा फटका देखील बसला आहे. शेतकऱ्यांना लाखोंचा नुकसान झाला आहे. तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरात पाणी साचले आहे. यातच आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत.जनावरे व शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावे. मेघगर्जना होताना झाडाखाली/टॉवरजवळ थांबू नये. पर्यटनासाठी धरणे व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याची सूचना देखील हवामान विभागाने नागरिकांना दिली आहे. याच बरोबर आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष टोल-फ्री 1077 0241-2323844 / 2356940 या नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IMD Rain Alert: नगरकर सावधान, 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »