DNA मराठी

हायलाईट

asaduddin owais

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी 9 ऑक्टोबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. खासदार ओवैसी यांची ही सभा मुकुंदनगर मधील सीआयव्ही ग्राउंड येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यापूर्वी खासदार असदुद्दीन ओवैसी 30 सप्टेंबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार होते मात्र 29 सप्टेंबर रोजी शहरात दोन गटात वाद निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर खासदार ओवैसी यांनी सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर आता ही सभा 09 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती अहमदनगर एमआयएमकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नगर शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या या सभेत एमआयएम कडून आगामी पालिका निवडणुकीसाठी कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील नगर शहरात 09 ऑक्टोबर रोजी येणार आहे.

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू Read More »

oplus 16908288

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार

Shirdi Sai Baba : श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी आंध्रप्रदेश येथील एका श्री साईभक्‍ताने श्री साईचरणी ९५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्‍नांचे खडे असलेला सोन्‍याचा हार श्री साईबाबांच्‍या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द केला. याची किंमत ०१ कोटी ०२ लाख ७४ हजार ५८० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार श्री साईभक्‍त यांचा सत्‍कार केला. श्री साईभक्‍त यांच्‍या विनंतीवरून त्‍यांचे नाव गुप्‍त ठेवण्‍यात आले आहे.

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार Read More »

img 20251006 wa0006

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीची वातावरण निर्माण होत आहे. यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे. रविवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे पुण्यातील कायद्याव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला Read More »

kotwali police

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई

Ahilyanagar Police: नगर शहरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना गुटखा बाळगणारे एका इसमास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे.कोतवाली पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी गायकवाड 2 ऑक्टोबर पहाटे 5 च्या सुमारास काळया रंगाच्या गाडीमधे एक इसम गुटखा व सुंगधी तंबाखु घेवुन अहिल्यानगर शहरात येणार असल्याची माहिती संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीवरून दिपक पोपटराव लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर बी एन एस कलम 123.223.274.275 प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपासही कोतवाली पोलिसांनी सुरू केला आहे.

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई Read More »

atul save

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

Maharashtra Government: राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, अभ्यास समितीचे अध्यक्ष आयुक्त, पशुसंवर्धन असून, सदस्य सचिव म्हणून आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे आहेत. समिती राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. तसेच, दूध उत्पादक शेतकरी, खाजगी व सहकारी दूध संघ यांचेकडून प्राप्त सूचना लक्षात घेऊन उपाययोजना सुचवण्याचे काम समिती करणार आहे. समितीच्या कार्यात “विकसित महाराष्ट्र 2047” या उद्दिष्टाचा विचार केला जाईल. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभाग म्हणून कामगिरी करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांतील योजना अभ्यासून सर्वोत्तम योजना राज्यात राबविण्याचे मार्गदर्शन समिती करणार आहे. ही अभ्यास समिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, दुग्ध उद्योगांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना आवश्यकतेनुसार आमंत्रित करेल. समितीच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दुग्धव्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच बचतगट/शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या बाबींचेही नियोजन केले जाणार असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत Read More »

rain alert

IMD Rain Alert : नगरकरांनो जिल्ह्यात आज धो धो पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

IMD Rain Alert : तीन – चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. ३ ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू होता. तर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४ ऑक्टोबर रोजी वीजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका   पुणे, नाशिक,अहिल्यानगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.   सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १२,०३८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ६,३१० क्युसेक, जायकवाडी धरणातून २८,२९६ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १,३५६ क्यूसेक,ओझर बंधारा २,७५७ क्युसेक, मुळा धरणातून ३,००० क्युसेक, घोड धरणातून ४,००० क्युसेक, सीना धरणातून ३,३९३ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ५०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १,२२० क्युसेक, खैरी धरण येथून ५१९ क्सुसेक इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या  केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

IMD Rain Alert : नगरकरांनो जिल्ह्यात आज धो धो पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »

sana mir

Sana Mir Controversy : पाकिस्तान बांगलादेश सामना अन् “आझाद काश्मीर” चा उल्लेख; नवीन वादाला सुरुवात

Sana Mir Controversy: महिला विश्वचषक 2025 ची शानदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात समालोचन करताना पाकिस्तानी खेळाडू नतालिया परवेझच्या गावाचा उल्लेख केला आणि ती आझाद काश्मीरची असल्याचे सांगितले. हे विधान प्रसारित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेक चाहत्यांनी त्यावर टीका केली, ज्यामुळे त्याला राजकीय वळण मिळाले. लोकांनी आयसीसीकडून कारवाईची मागणी करण्यास सुरुवात केली. माफी मागण्यास नकार सना मीरच्या विधानामुळे खळबळ उडाली असली तरी तिने माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. टीकेला तोंड द्यावे लागल्यानंतर, सनाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून तिची भूमिका स्पष्ट केली. तिने म्हटले की तिच्या टिप्पण्या कोणालाही दुखावण्यासाठी नव्हत्या, तर त्या खेळाडूला तिच्या प्रदेशामुळे येणाऱ्या आव्हानांवर आणि तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी प्रगती केली यावर प्रकाश टाकण्यासाठी होत्या. सना मीरची सोशल मीडिया पोस्ट सना यांनी तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खेळाशी संबंधित साध्या गोष्टीही प्रमाणाबाहेर फेकल्या जातात हे दुर्दैवी आहे. मी नतालिया परवेझ आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील दोन इतर पाकिस्तानी खेळाडूंचा उल्लेख केला. खेळाडूंनी त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या परिस्थितीतून जावे लागले आहे हे अधोरेखित करणे हा समालोचनाचा एक भाग आहे. कृपया याचे राजकारण करू नका.” सना यांनी असेही म्हटले आहे की, समालोचक म्हणून तिचे काम खेळाडूंच्या प्रवास आणि कथांवर प्रकाश टाकणे आहे, राजकीय वाद निर्माण करणे नाही. तिने नतालिया परवेझच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती गोळा केलेली संशोधन सामग्री देखील शेअर केली. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी तणाव तर दुसरीकडे सना मीर यांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटवरून आधीच तणाव आहे. दोन्ही संघांमधील अलिकडच्या आशिया कप सामन्यादरम्यान राजकीय आणि क्रीडा वादांमुळे परिस्थिती आणखी चिघळली. 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या 2025 च्या महिला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. असे मानले जाते की हा सामना पुन्हा एकदा राजकारणाने व्यापला जाऊ शकतो. भारतीय महिला संघाची भूमिका वृत्तानुसार, पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट संघही सामन्यांनंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारत आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे क्रिकेट चाहते 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्याकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

Sana Mir Controversy : पाकिस्तान बांगलादेश सामना अन् “आझाद काश्मीर” चा उल्लेख; नवीन वादाला सुरुवात Read More »

raj thackeray

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत

Raj Thackeray: राज्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने पिके वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरत आहे. तर दुसरीकडे सरकारमधील अनेक मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत परिस्थिती जाणून घेत आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील रविवारपासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. मनसेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे या दौऱ्यात लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर काही जिल्ह्यात जाणार आहे. तर दुसरीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बीज बियाणे आणि खते मनसेकडून दिली जाणार. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण रविवारपासून मदत घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार. लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर भागातही मनसेची मदत पोहोचवली जाणार. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली बी-बीयाने आणि खते मनसेकडून दिली जाणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत Read More »

ajit pawar

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar: राज्यातील उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून रोजगार निर्मितीला शासन प्राधान्य देत आहे. उद्योजकांना संरक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य असून, पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनाने उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उद्योजकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आपले काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार हे पारनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीमधील विविध विषयासंबंधी आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीस आमदार काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी अशोक बेनके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उद्योगासाठी शासनाचे नेहमीच सकारात्मक धोरण राहिले आहे. पारनेर – सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी. उद्योजकांना वेठीस धरून दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. औद्योगिक वसाहतीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस विभागाने अधिक कार्यक्षम व दक्षतेने काम करावे. उद्योग टिकून राहावेत यासाठी उद्योजकांनीही कामगारांना उद्योगामध्ये सामावून घेण्याचे आवाहन केले. सुपा – पारनेर औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे उद्योजकांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या तक्रारीवर तातडीने उपाययोजना करून उद्योगक्षेत्राला अखंडित वीज पुरवठा तसेच पाणी पुरवठा सुनिश्चित केला जावा. औद्योगिक क्षेत्रात कामगार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाने साध्या वेषातील पोलिसांमार्फत गस्त वाढवावी. उद्योगांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. तसेच, औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण राखले जावे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी उद्योगांनी खबरदारी घेण्यास निर्देशही त्यांनी दिले. कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात असून, कौशल्य विकास विभागामार्फत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सी ट्रिपल आय.टी. च्या माध्यमातून उद्योगासाठी उपयुक्त मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. जर्मन भाषा अवगत असलेल्या बेरोजगारांना सुमारे दहा लाख रोजगार उपलब्ध असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीत उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या अडचणी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी व उद्योजक देखील उपस्थित होते.

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले Read More »

pt chhannulal mishra death

Pt Chhannulal Mishra Death: पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pt Chhannulal Mishra Death : शास्त्रीय गायक आणि पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे गुरुवारी पहाटे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पहाटे 4.15 वाजता त्यांची मुलगी नम्रता मिश्रा हिच्या मिर्झापूर येथील घरी अखेरचा श्वास घेतला. ते काही काळापासून आजारी होते आणि बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) वैद्यकीय विज्ञान संस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. नंतर त्यांची मुलगी त्यांना मिर्झापूर येथील त्यांच्या घरी घेऊन गेली, जिथे ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिले. छन्नूलाल मिश्रा यांनी त्यांच्या शास्त्रीय संगीताद्वारे लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांचे “खेले मसाने में होली…” हे गाणे अजूनही सर्वांच्या ओठांवर आहे. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार छन्नूलाल मिश्रा यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर केले जातील. पंडित छन्नूलाल मिश्रा गेल्या सात महिन्यांपासून अनेक आरोग्य समस्यांशी झुंजत होते. बीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, त्यांना अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) होता, जो त्यांच्या फुफ्फुसांमध्ये तीव्र जळजळ होण्यामुळे उद्भवणारा आजार होता. त्यांना टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, ऑस्टियोआर्थरायटिस आणि वाढलेले प्रोस्टेट यासारख्या समस्या देखील होत्या. अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त होते 11 सप्टेंबर 2025 रोजी, मिर्झापूर येथील त्यांच्या मुलीच्या घरी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत दुखण्याची तक्रार केल्यानंतर, त्यांना ताबडतोब मिर्झापूर येथील रामकृष्ण सेवाश्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. 13 सप्टेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना बीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयात हलवण्यात आले. 17 दिवसांच्या रुग्णालयात उपचारानंतर, त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना 27 सप्टेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते त्यांच्या मुलीसह मिर्झापूर येथील त्यांच्या घरी गेले, जिथे ते डॉक्टरांच्या जवळच्या देखरेखीखाली राहिले. त्यांनी गुरुवारी पहाटे शेवटचा श्वास घेतला. बनारस घराण्याचे एक अनमोल रत्न पंडित छन्नुलाल मिश्रा यांचा जन्म 3 ऑगस्ट 1936 रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील हरिहरपूर येथे झाला. ते भारतीय शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्यातील सर्वात प्रमुख गायकांपैकी एक होते. त्यांच्या गायनात बनारसच्या गंगा-जमुनी संस्कृतीचे स्पष्ट प्रतिबिंब होते. ठुमरी, दादरा, कजरी, चैती आणि भजन यासारख्या शास्त्रीय आणि अर्धशास्त्रीय गायन शैलींवर त्यांचे प्रभुत्व अतुलनीय होते. त्यांच्या आवाजात एक अनोखी जादू होती जी श्रोत्यांना मोहित करते.

Pt Chhannulal Mishra Death: पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Read More »