DNA मराठी

हायलाईट

devendra fadnavis

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग

Maharashtra News : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग Read More »

fb img 1760715802412

Shivajirao Kardile : आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Shivajirao Kardile : राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला‌. सात्वंनपर भावना व्यक्त करतांना सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब , कष्टकऱ्यांच्या पाठिशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार , प्रेम व स्नेह होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व” होते. त्यांचा पिंड समाजकारण व राजकारणाचा होता. ते नेहमीच लोकांमध्ये वावरले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून त्यांना सावरण्याचे बळ मिळो, ही प्रभू चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात जिल्हावासिय‌ सहभागी आहेत. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे,आमदार अमोल खताळ,आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी जंगले महाराज, आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अंत्यसंस्कारास राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. जुलै २००२ ते जुलै २००४ या काळात ते मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे राज्यमंत्री होते, तर जुलै २००४ ते ऑक्टोबर २००४ या काळात त्यांनी जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप, पुनर्वसन आणि मदतकार्य या विभागांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. २००४ मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तसेच, त्यांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले असून २००७ पासून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि २००८-०९ तसेच मार्च २०२३ पासून चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केले. राज्य शासकीय समित्यांमध्ये त्यांनी रोहयो, पंचायतराज व सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायत बु-हाणनगरच्या सरपंचपदापासून झाली, जिथे ते १९८४ ते १९९६ या काळात कार्यरत होते.

Shivajirao Kardile : आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Read More »

shivaji kardile

Shivajirao Kardile : भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन

Shivajirao Kardile : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव भानुदास कर्डीले यांचं निधन झाले असून वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या धक्क्याने कर्डीले यांचे निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.

Shivajirao Kardile : भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मतदार यादीत घोळ असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच राज्यात पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आणि आणखी सहा महिने झाले नाहीतर काही फरक पडणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर जेव्हापर्यंत मतदार यादीमध्ये असलेला घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते असा टोला लावला आहे. सोलापुरात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते. आगामी निवडणुकीत पराभव दिसत असल्याने आधीच नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच विरोधकांमध्ये सर्वात समजदार हे शरद पवार आहेत. मतदार यादीत सुधारणा करण्यास माझा पाठिंबा आहे असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: इतके कंफ्यूज विरोधक जीवनात कधी पहिले नव्हते ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

st co operative bank

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत. आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली.त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये अक्षरशा फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली. संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडला,कपडे फाडले,लाथा बुक्क्यांनी तुडवले. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशन पर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे. अशा संचालकांच्या हाती एसटी बँक देऊन एसटीचे सभासद आता पश्चाताप करत आहेत.

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस Read More »

cidco lottery

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर

Devendra Fadnavis: दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगार मेळाव्यात देण्यात आलं होतं मात्र सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे. सिडकोच्या लॉटरीत 22 हजारपेक्षा जास्त घरे काढणार आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना ह्या घरांच्या किमती न परवडणाऱ्या असल्याने वारंवार किमती कमी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडल्याने नागरिकांचे स्वप्न भंग झालं असंच म्हणायला हवं.

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर Read More »

eknath shinde

Eknath Shinde: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; मिळणार 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान

Eknath Shinde: राज्यातील एसटीच्या 85 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला. एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या आणि कृती समितीच्या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Eknath Shinde: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; मिळणार 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान Read More »

oplus 16908288

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

IMD Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता आहे. मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही काही भागात वातावरणात आर्द्रता आणि ढगाळपणा राहील त्यामुळे अचानक वादळी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात 18 ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके वाऱ्यापासून आणि पावसापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच उघड्यावर ठेवलेले धान, भुसा किंवा जनावरांचे खाद्य झाकून ठेवावे आणि हवामान खात्याच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता Read More »

crime

Crime News: आईने तिच्या दोन्ही मुलांना मारले नंतर केली आत्महत्या, नेमकं कारण काय?

Crime News: कर्नाटकातील बेंगळुरूमधील बागलागुंटे परिसरातील एका महिलेने प्रथम तिच्या दोन मुलांची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खडबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख 27 वर्षीय विजयालक्ष्मी अशी झाली आहे. विजयालक्ष्मीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या एक आणि चार वर्षांच्या दोन मुलांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयलक्ष्मी आणि तिचे कुटुंब मूळचे रायचूर जिल्ह्यातील होते. विजयालक्ष्मीचा पती बेंगळुरूमधील एका मॉलमध्ये काम करत होता आणि घटनेच्या वेळी तो कामावर होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी संध्याकाळी विजयालक्ष्मी घरी परतल्यावर त्याला त्याची पत्नी आणि दोन मुले फासावर लटकलेले आढळले. पोलिसांना घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढले, त्यांना ताब्यात घेतले आणि शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवले. घरगुती कलह हे कारण असू शकते प्राथमिक तपासानुसार, घरगुती कलहामुळे विजयालक्ष्मीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. तथापि, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. शिवाय, घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही, ज्यामुळे मृत्यूचे कारण अस्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आत्महत्या आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Crime News: आईने तिच्या दोन्ही मुलांना मारले नंतर केली आत्महत्या, नेमकं कारण काय? Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत

Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे आता मार्गी लागणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार आहे.

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत Read More »