DNA मराठी

हायलाईट

tejaswini lonari

Tejaswini Lonari : आईच्या आवडीचे दागिने अन् मराठमोळा साज अभिनेत्री निर्माती तेजस्विनी लोणारीच्या साखरपुड्याचा खास लूक

Tejaswini Lonari : नुकताच अभिनेत्री निर्माती तेजस्विनी लोणारी हीचा साखरपुडा पार पडला तिने सोशल मीडिया वर देखील तिच्या या खास क्षणाचे फोटो शेयर केले पण यात सगळयात लक्षवेधी ठरला तो तिचा लूक. पिवळ्या रंगाची पैठणी, मराठमोळा लूक आणि सोबतीला मराठमोळा साज. तेजस्विनी हिच्या साखरपुड्याच्या दागिन्यांची गोष्ट काही वेगळी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण कोणत्याही मुलीसाठी दागिने हा अगदीच जिव्हाळ्याच्या विषय असतो आणि लग्न समारंभ म्हणा किंवा साखरपुडा या खास क्षणासाठी घातलेलं दागिने खूप स्पेशल असतात अशी काही शी गोष्ट तेजस्विनी ची सुद्धा आहे. तेजस्विनी येवल्याची असल्याने तिच्या या खास दिवशी पैठणी नसेल अस होणार नाही आणि म्हणून तिने सुंदर पैठणी नेसली होती आणि त्याला साजेसा लूक केला होता. पारंपरिक अंदाजात तेजस्विनी अगदीच सुंदर दिसत होती पण खरी गंमत तिच्या या दागिन्यांची आहे. तेजस्विनी या बद्दल बोलताना सांगते ” माझ्या आयुष्यातल्या खास क्षणी मला आपलासा वाटणारा लूक हवा होता आणि म्हणून माझी पिवळी पैठणी आणि आईने हौशीने केलेलं दागिने हे सगळं हे खूप खास होत. आईने केलेली नथ आणि बाजूबंद गळ्यात असलेला एक सुंदर हार हे सगळं आईने माझ्यासाठी अगदी हौशीने केलेल्या दागिन्यां पैकी आहेत. प्रत्येक आईला आपल्या मुलीला तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करताना एक भेट द्यायची असते आणि ती या खास शृंगाररुपात आहे अस मला वाटत आणि म्हणून साखरपुड्याला मी हा मराठमोळा साज असलेला लूक केला होता” तेजस्विनी कायम तिच्या फॅशन लूक मधून वैविध्यपूर्ण लूक करताना बघायला मिळते आणि तिच्या या खास दिवशी तिने केलेला हा सुंदर देखणा आणि लक्षवेधी लूक देखील तितकाच सुंदर आहे.

Tejaswini Lonari : आईच्या आवडीचे दागिने अन् मराठमोळा साज अभिनेत्री निर्माती तेजस्विनी लोणारीच्या साखरपुड्याचा खास लूक Read More »

women world cup 2025

Women World Cup 2025 : विश्वविजेता होताच बीसीसीआयचा मोठा निर्णय; भारतीय संघाला 51 कोटी बक्षीस जाहीर

Women World Cup 2025 : भारतीय संघाने रविवारी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात बाजी मारत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. बीसीसीआयने कोटींच्या बक्षिस रकमेची घोषणा केली या ऐतिहासिक कामगिरीनंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला संघासाठी मोठ्या बक्षिस रकमेची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, संघाला 51 कोटी बक्षिस रक्कम मिळेल. आयसीसीकडून मिळालेल्या 4.48 दशलक्ष (अंदाजे 39.55 कोटी) बक्षिस रकमेव्यतिरिक्त ही रक्कम बोनस म्हणून दिली जाईल. बीसीसीआयचे हे पाऊल महिला खेळाडूंच्या समर्पणाचा आणि संघर्षाचा सन्मान करण्यासाठी आहे. तिसऱ्या प्रयत्नात ऐतिहासिक विजय भारतीय महिला क्रिकेट संघ यापूर्वी दोनदा आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता परंतु विजेतेपद जिंकण्यात त्यांना अपयश आले. अंतिम फेरीत संघाची ही तिसरी वेळ होती आणि अखेर त्यांनी त्यांचे स्वप्न साकार केले. घरच्या मैदानावरील हा विजय आणखी खास बनला. डीवाय पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरने दक्षिण आफ्रिकेची फलंदाज नदीन डी क्लार्कचा निर्णायक झेल घेतला तेव्हा संपूर्ण स्टेडियम आनंदाने उसळून उठले. भारतीय महिला संघ विश्वविजेता बनला होता आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावरील अभिमान आणि भावना खरोखरच उल्लेखनीय होती. हरमनप्रीत कौर: नवीन विश्वविजेती कर्णधार या विजयासह, हरमनप्रीत कौर आता भारतीय क्रिकेट इतिहासातील महान कर्णधारांच्या यादीत सामील झाली आहे. कपिल देव, एमएस धोनी आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांप्रमाणे तिनेही भारताला जागतिक जेतेपद मिळवून दिले आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली, संघाने अंतिम फेरीत उल्लेखनीय संयम आणि रणनीती दाखवली. तिच्या नेतृत्वाखाली, संघाने दमदार फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवले. महिला क्रिकेटसाठी एका नवीन युगाची सुरुवात या विजयामुळे भारतातील महिला क्रिकेटसाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की हे यश भावी महिला खेळाडूंना प्रेरणा देईल. शाळा आणि अकादमींमधील अधिक मुली आता क्रिकेटला करिअर म्हणून आकर्षित करतील.

Women World Cup 2025 : विश्वविजेता होताच बीसीसीआयचा मोठा निर्णय; भारतीय संघाला 51 कोटी बक्षीस जाहीर Read More »

josh hazlewood

Josh Hazlewood : टीम इंडियासाठी गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार गोलंदाज टी20 मालिकेतून बाहेर

Josh Hazlewood : पहिल्या आणि दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताविरोधात शानदार गोलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड टी 20 मालिकेतून बाहेर झाला आहे. तो या मालिकेतील पुढील तिन्ही सामने खेळणार नसल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बॉर्डकडून देण्यात आली आहे. जोश हेझलवूड मालिकेतून बाहेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी अ‍ॅशेस कसोटी मालिकेला लक्षात घेऊन जोश हेझलवूडला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठित कसोटी मालिकेसाठी हेझलवूडला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवणे संघ व्यवस्थापनासाठी प्राधान्य आहे. लांब आणि आव्हानात्मक पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत त्याचा अनुभव आणि तंदुरुस्ती आवश्यक असेल, म्हणून त्याला भारताविरुद्धच्या उर्वरित टी-20 सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. मेलबर्नमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात, हेझलवूडने चार षटकांत फक्त 13 धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याच्या घातक स्पेलमुळे टीम इंडिया सुरुवातीलाच अडचणीत आली. हेझलवूडच्या अनुपस्थितीत, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागाची नक्कीच परीक्षा होईल. संघ आता त्याच्या जागी झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस किंवा शॉन अ‍ॅबॉट सारख्या गोलंदाजांना निवडू शकतो. दुसरीकडे, भारतीय संघासाठी ही एक दिलासादायक बाब आहे की त्यांना उर्वरित सामन्यांमध्ये हेझलवूडच्या धोकादायक स्विंग आणि अचूक गोलंदाजीचा सामना करावा लागणार नाही.

Josh Hazlewood : टीम इंडियासाठी गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार गोलंदाज टी20 मालिकेतून बाहेर Read More »

navneet rana

Navneet Rana : दुकानदारी चालवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र; नवनीत राणा स्पष्टच म्हणाल्या

Navneet Rana : निवडणूक आयोगा विरोधात आज राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्र येत मुंबईत सत्याचा मोर्चा काढत मतदार यादी दुरुस्त करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे, विधानसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली अशी टीका माध्यमांशी बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले असल्याचा दावा देखील यावेळी नवनीत राणा यांनी केला. माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यापूर्वी राज ठाकरे म्हणायचे मज्जीद वरचे भोंगे काढा, हनुमान चालीसा म्हनायला लावत होते असं यावेळी नवनीत राणा म्हणाल्या. तसेच लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे, विधानसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली असं देखील यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.

Navneet Rana : दुकानदारी चालवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र; नवनीत राणा स्पष्टच म्हणाल्या Read More »

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू

Pune Crime: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने आता पुण्यातील कायदे सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाळात गणेश काळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या यानंतर गणेश काळे वर कोयत्याने वार करण्यात आला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी होता. आयुष कोमकर हत्याप्रकरणी दत्ता काळे याला अटक करण्यात आली होती.

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू Read More »

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी राज्य शासनाची विशेष मदत

Devendra Fadnavis: अहिल्यानगरसह राज्यातील पुणे, नाशिक व अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रति हेक्टरी १०,००० प्रमाणे (कमाल ३ हेक्टरपर्यंत) मदत DBT पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच बियाणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी सहाय्य एकूण मंजूर निधी १७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी राज्य शासनाची विशेष मदत Read More »

ajit pawar

Ajit Pawar: खेळाडूंवर क्रीडा मंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. सन २०१३ पासून आपण महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.या कालावधीत खेळाचा दर्जा सुधारावा, खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात,म्हणून सर्वांना सोबत घेऊन आपण काम केले. आम्ही कार्यभार घेण्याआधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या/ आठव्या स्थानावर होते.पण सलग मागील तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आता प्रथम क्रमांकावर आहे. या यशाबद्दल महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या पथकाचे आणि  पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सत्कारही झाले आहेत. प्रदीप गंधे,संजय शेटे, स्मिता शिरोळे, नामदेव शिरगावकर, धनंजय भोसले आधी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे हे सगळं शक्य झालं. अस असताना केवळ निवडणुकांवर डोळा ठेऊन काही राजकीय व्यक्ती,संघटनेच्या एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी विविध आरोप राजकीय हेतूने करत आहेत, हे वागणे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही. खेळाडूंची अशी कोणतीही तक्रार नसून,असे आरोप कोणत्याही खेळाडूने अद्याप केलेले नाहीत,असे अजित पवार स्पष्ट केले आहे.   उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की,१३ कोटीच्या भ्रष्टाचाराचा  राजकीय आरोप ज्या पदाधिकाऱ्यावर केला आहे,  तो पदाधिकारी खजिनदारही नाही.संघटनेकडे जो निधी येतो तो कोणा एका पदाधिकाऱ्याच्या हातामध्ये नसतो. संपूर्ण एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल त्याच्यावर देखरेख करत असते. तिच्या मान्यतेने तो खर्च होतो.या खर्चाचा हिशेब खजिनदार ठेवतात.संघटनेचे खजिनदार म्हणून धनंजय भोसले यांच्या अखत्यारीमध्ये त्याचे हिशोब होते. प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विविध खेळांसाठी महाराष्ट्राचे साधारणतः ८०० ते १०००  खेळाडू सहभागी होतात. या सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्या- येण्यासाठी विमान प्रवासाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली होती. महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेच्या रचनेनुसार संलग्न विविध खेळांच्या ३० संघटनांकडून देखील शासनाकडून आलेल्या निधीतील बराचसा  निधी वापरला जातो आणि त्याचा हिशोब त्यांच्याकडून आल्यानंतर तो एकत्रित करून क्रीडा विभागाला तो सादर करण्यात येतो. त्या संघटनांनी हिशेब दिल्याशिवाय ऑलिंपिक असोसिएशनला शासनाला एकत्रित हिशेब देणे शक्य होत नाही. तेव्हा खऱ्या दोषी या हिशेब न देणाऱ्या संघटना असतात.अशा दोषी संघटनांमध्ये मोहोळ यांची संघटना व त्यांना पाठिंबा देणाऱ्या ५/६ संघटना आहेत. त्यांनी त्वरित हिशेब द्यावेत. त्यांनी हिशेब न दिल्याने असोसिएशनला हिशेब देणे शक्य झाले नाही,हे विचारात घेऊनच शासनाने हिशेब सादर करण्यास दोन महिने मुदतवाढ दिली आहे. प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शासन चार ते पाच कोटी रुपयांचे अनुदान देते.हे अनुदान महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन त्यांच्या संलग्न ३० संघटनांच्या माध्यमातून खर्च करत असते.या सर्व हौशी,विश्वस्त संस्था असल्यामुळे त्यांच्याकडे शासकीय यंत्रणेप्रमाणे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे हिशोब येण्यास उशीर होतो. ही एक फार महत्त्वाची बाब आहे,याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.   ३६ व्या आणि ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा हिशोब क्रीडा विभागाला असोसिएशनकडून याआधीच सादर झालेला आहे. ३८ व्या स्पर्धेचा हिशोब मात्र वेगवेगळ्या टप्प्यावर प्रक्रियेमध्ये असून सदस्य संघटनांकडून तो अद्याप प्राप्त झालेला नाही. मोहळांच्या संघटनेकडून आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य पाच सहा संघटनांकडून देखील अद्याप हिशोब सादर करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर अन्य दहा-बारा संघटनांचा देखील हिशोब आलेला नाही. तो एकत्रित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रक्रिया सुरू असताना केवळ हिशेब सादर झाला नाही म्हणून त्यांनी भ्रष्टाचार केला, असे म्हणणे योग्य नाही.  महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन ही धर्मादाय संस्था आहे. तेव्हा या संस्थेविरुद्धच्या तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडे होणे आवश्यक होते.असे न करता,केवळ हिशेब सादर केले नाही म्हणून राजकीय दबावापोटी पहाटे तीन वाजता ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो.यात पोलिसांवर कोणी दबाव टाकला, हे संदीप जोशींनी सांगावं, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.   ही निवडणुक पुढे ढकलण्याचेही प्रयत्न झाले. ती पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयात एकूण सहा प्रकरणे दाखल झाली होती .पण न्यायालयाने ती सर्व फेटाळून लावली. जी प्रकरणे न्यायालयात फेटाळून लावली,त्यात ज्या गोष्टी,कारणे नमूद होती,ती सर्व कारणे न्यायालयाने फेटाळली असताना,त्याच गोष्टींसाठी पुन्हा तक्रारी,गुन्हे दाखल झाले. पोलीसांना  तक्रारी घेण्यास भाग पाडण्यात आले. पोलिसांमध्ये तक्रारी करून संबंधित पदाधिकाऱ्यांना त्रास देण्यास  सुरुवात केली.निवडणुकीसाठी नेमलेल्या निवडणूक अधिकारी,जे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत,त्यांना पोलिसांनी राजकीय तक्रारीवरून पोलिस स्टेशनमध्ये चौकशी साठी बोलावले.हे सर्व कोणाच्या दबावाने झाले, हे संदीप जोशींनी सांगावे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.  क्रीडा संघटनाच्या निवडणुकांमध्ये राजकारण नको म्हणून आपण हे सर्व सहन केलं. कुठलेही राजकीय भाष्य अद्याप पर्यंत केल नाही. पण आता तेच जर पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असतील,तर त्याला उत्तर देणे आवश्यक आहे,म्हणून आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दबाव टाकण्याची भाषा करतात असे ते म्हणतात. त्यांच्यासाठीही अनेक मंत्र्यांपासून केंद्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे फोन मतदारांना  येत आहेत. याला काय दबाव म्हणायचं ?मुख्यमंत्र्यांनीही बऱ्याच क्रीडा संघटनांना वर्षा बंगल्यावर अलीकडेच बोलावले होते. म्हणजे त्यांनी दबाव आणला असे आम्ही म्हणणार नाही. केवळ ऑलिंपिक असोसिएशन नाही,तर अनेक संघटनांनी अद्याप निधीच्या खर्चाचे हिशेब दिलेले नाहीत.   केंद्रीय मंत्री मुरलीधर  मोहोळ यांच्या संस्थेला राज्यस्तर कुस्ती स्पर्धेसाठी शासनाने अनुदान म्हणून सन २०२३- २०२४ साठी दिलेल्या १ कोटी एवढ्या रकमेचा हिशेब अद्याप शासनास सादर केलेला नाही.अजूनही बऱ्याच संघटनांना हिशेब सादर करणे शक्य झालेले नाही.म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला असे होत नाही.हिशेब सादर केले नाही, म्हणून या  सर्वांवर पोलीस केस दाखल करावी का ? वा भ्रष्टाचार केल्याचे आरोप करावेत का ? … असे करणे मला योग्य वाटत नाही. खेळात खिलाडूपणा पाहिजे.सुडाची भावना नको,या मताचे आम्ही आहोत. मोहोळांच्या संघटनेसह प्रत्येक संघटनेने आपापले हिशोब वेळेत द्यावेत,म्हणजे आमच्या असोसिएशनला वेळेत हिशेब सादर करता येतील,अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे राजकीय आरोप क्रीडा संघटनांच्या निवडणूक प्रक्रियेत होणं हे काहीस अस्वस्थ करणार आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये आपण गेली अनेक वर्षे कार्यरत आहोत. आमचे काम संघटनांना आवडत असेल तर संघटना आम्हाला निवडून देतील. आतापर्यंत माझ्यासह, माझ्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य पाहून पुन्हा आमच्या हातात पुन्हा ही सूत्र दिली जातील,असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Ajit Pawar: खेळाडूंवर क्रीडा मंत्र्यांकडून कोणताही दबाव नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण Read More »

scientific balloon flying from hyderabad

Ahilyanagar News : हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना

Ahilyanagar News :  हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या उड्डाणांना भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे सहकार्य लाभले आहे. ही बलून उड्डाणे हैदराबाद येथील ईसीआयएल परिसरातून केली जाणार असून, एकूण दहा बलून आकाशात झेपावतील. या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर असून ते हायड्रोजन वायूने भरलेले असतील. उड्डाणे रात्री ८ ते सकाळी ६.३० या वेळेत होतील. या बलूनमध्ये बसवलेली वैज्ञानिक उपकरणे सुमारे ३० ते ४२ किलोमीटर उंचीपर्यंत जातील आणि काही तास संशोधन करून पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर उतरतील. वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर येऊ शकतात. त्यामुळे ती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील भागांमध्ये उतरू शकतात. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर , बीड, नांदेड, धाराशिव , परभणी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर  या जिल्ह्यांमध्ये उपकरणे पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी ही उपकरणे सापडतील, ती हलवू नयेत, उघडू नयेत किंवा छेडछाड करू नये. त्या पॅकेजवर दिलेल्या पत्त्यावर त्वरित माहिती द्यावी तसेच जवळच्या पोलीस ठाण्याला व प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपकरणे सुरक्षित असली तरी त्यामध्ये संवेदनशील वैज्ञानिक साधने असल्याने छेडछाड झाल्यास माहिती नष्ट होऊ शकते. संशोधन संस्था अशा उपकरणांची माहिती दिलेल्या नागरिकांना योग्य बक्षीस आणि खर्चाची भरपाई देणार आहे. या प्रयोगांविषयीची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Ahilyanagar News : हैदराबादहून उड्डाणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना Read More »

bacchu kadu

Bachu Kadu : दीपक बोऱ्हाडे यांचा बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा…

Bachu Kadu : जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बळीराजा देशाचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणत बळीराजावरील हे सर्वात मोठं संकट असल्याचं बोऱ्हाडे यांनी म्हटलय. जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संकटाच्या काळात बळीराजासोबत राहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असं म्हणत सरकारने बळीराजाच्या संयमाचा अंत पाहू नये, असंही बोऱ्हाडे यांनी म्हटलय. दरम्यान, जालन्यात 1 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व धनगर आंदोलक, धनगर उपोषणकर्ते यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहितीही बोऱ्हाडे यांनी दिलीय. तसेच राज्यात ज्या दिवशी धनगर समाजाचा मेळावा होईल, त्यादिवशी आम्ही मुंबई जायची तारीख जाहीर करू, असं देखील बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केलंय.

Bachu Kadu : दीपक बोऱ्हाडे यांचा बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा… Read More »

Chandrashekhar Bawankule : जागा हडप करणाऱ्या लॉबीला महसूलमंत्र्यांचा दणका

Chandrashekhar Bawankule : माझगाव येथील जीजाभॉय ट्रस्टचा शासकीय भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामंजूर केला. तसेच, ट्रस्ट किंवा विकासकाने चुकीच्या पद्धतीने भरलेली रक्कम परत करावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. या संदर्भात महसूलमंत्र्यांच्या दालनात आज बैठक झाली. आमदार सचिन अहिर, आमदार अमोल मिटकरी आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबई शहर जिल्हाधिकारी, आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती अशी, माझगाव महसूल विभागातील भुकर क्रमांक ३६५ (क्षेत्र ७२५.७६ चौ. मी.) व भुकर क्रमांक ३६९ (क्षेत्र ९१५४.१० चौ. मी.) या मिळकतींचा भाडेपट्टा जे. पी. एम. जीजाभॉय ट्रस्ट यांच्याकडे होता. ट्रस्टने नूतनीकरणाची रक्कम भरण्यास विलंब केला होता. त्यानंतर, नूतनीकरणाची रक्कम ऐक्य रिॲलिटी प्रा.लिमिटेड या खासगी कंपनीकडून अनावधानाने शासनखाती भरणा करण्यात आली होती. महसूल विभागाने २४ सप्टेंबर २०२५ च्या अध्यादेशाद्वारे ही रक्कम परत करणे आणि भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार ही रक्कम परत करण्याची कार्यवाही सुरु आहे. आमदार सचिन अहिर यांनी या मिळकती तातडीने शासनाच्या ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करावा आणि त्यानंतर विकसित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. काही व्यापारी ट्रस्टच्या आडून शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याला तातडीने मज्जाव झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जमीनीचा भाडेपट्टा नुतनीकरण करु नये, तसेच भरलेली रक्कम तात्काळ परत करावी. तसेच जर ट्रस्टने नवीन अर्ज केल्यास शासन त्याबाबत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेईल असे स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule : जागा हडप करणाऱ्या लॉबीला महसूलमंत्र्यांचा दणका Read More »