DNA मराठी

ट्रेंडिंग

nilesh lanke

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, तूर कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या. विशेषतः शेवगांव तालुक्यातील खामगांव, हिंगणगांव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खा. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे की, शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. तातडीने पंचनामे करा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खा. लंके यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र Read More »

Eknath Shinde: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

Eknath Shinde: यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. ते शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.

Eknath Shinde: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय Read More »

james vince

The Hundred Tournament : इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास; धोनी-कोहलीला टाकले मागे

The Hundred Tournament : टी 20 क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या खेळाडूने नवीन इतिहास रचला आहे. जेम्स विन्सने द हंड्रेड लीगमध्ये खेळताना एक मोठा विक्रम मोडला आहे. विन्स आता कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. द हंड्रेड टूर्नामेंटमध्ये सदर्न ब्रेव्ह आणि वेल्स फायर यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात जेम्स विन्सने 26 चेंडूत 29 धावा करून फाफ डू प्लेसिसला मागे टाकले. आता तो या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, जिथे त्याच्या नावावर 6663 धावा आहेत. फाफ डू प्लेसिसचा विक्रम मोडला यापूर्वी, फाफ डू प्लेसिस कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. मेजर लीग क्रिकेट दरम्यान डू प्लेसिसने जुलैमध्ये विराट कोहलीला मागे टाकून हा विक्रम केला होता. तथापि, आता जेम्स विन्सने त्याचा विक्रम मोडला आहे आणि तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. विन्स आता टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 6663 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. या आकडेवारीसह, त्याला फाफ डू प्लेसिससोबत धावांमधील अंतर आणखी वाढवण्याची उत्तम संधी आहे, कारण त्याची टी-20 कारकीर्द अजूनही सुरू आहे. द हंड्रेड लीगमध्ये या हंगामात जेम्स विन्स सदर्न ब्रेव्हचे नेतृत्व करत आहे आणि या स्पर्धेत त्याचा अनुभव खूप मौल्यवान ठरत आहे. टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू जेम्स विन्स – 6663 धावा (206 डावांमध्ये) फाफ डू प्लेसिस – 6634 धावा (203 डावांमध्ये) विराट कोहली – 6564 धावा (188 डावांमध्ये) एमएस धोनी – 6283 धावा (289 डावांमध्ये) रोहित शर्मा – 6064 धावा (224 डावांमध्ये) जेम्स विन्सची कारकीर्द जेम्स विन्सची टी-20 कारकीर्द खूप यशस्वी झाली आहे. जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळताना त्याने अनेक विक्रम केले आहेत. आतापर्यंत विन्सने 449 सामने खेळले आहेत आणि 437 डावांमध्ये फलंदाजी करताना 32.11 च्या सरासरीने 12557 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने 7 शतके आणि 80 अर्धशतके देखील झळकावली आहेत, जी त्याच्या शानदार कारकिर्दीचे प्रतिबिंब आहेत.

The Hundred Tournament : इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास; धोनी-कोहलीला टाकले मागे Read More »

Donald Trump: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर 50% कर; व्हाईट हाऊसचा मोठा खुलासा

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध आणखी वाढू नये म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आर्थिक दबाव वाढवला असल्याचा खुलासा व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केला. व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेले शुल्क दुप्पट करून 50 टक्के केले आहे. रशियावर अतिरिक्त दबाव आणण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. लेविट यांच्या मते, भारतावर लादलेले हे आर्थिक निर्बंध अप्रत्यक्षपणे रशियावर परिणाम करतील आणि युद्ध संपवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा प्रयत्न ठरतील असे अध्यक्ष ट्रम्प यांचे मत आहे. पत्रकार परिषदेत कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, निर्बंधांचा उद्देश रशियावर आणखी दबाव वाढवणे आहे. राष्ट्रपतींनी हे युद्ध संपवण्यासाठी भारतावर दबाव आणला आहे. भारतावर निर्बंध आणि इतर पावले देखील उचलण्यात आली आहेत. कारण ट्रम्प यांनी स्वतः हे स्पष्ट केले आहे की त्यांना हे युद्ध संपवायचे आहे. झेलेन्स्की-ट्रम्प बैठक या निर्णयापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या दरम्यान झेलेन्स्कीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली. ट्रम्प यांनी ही बैठक यशस्वी झाली असे म्हटले, तर झेलेन्स्की म्हणाले की ही आतापर्यंतची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबतची सर्वोत्तम चर्चा होती. शांतता पुनर्संचयित करण्यावर ट्रम्प यांचा भर लेविट यांनी असेही म्हटले की ट्रम्प शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करून पुढे जाऊ इच्छितात आणि नाटो सरचिटरी जनरलसह सर्व युरोपीय नेते व्हाईट हाऊसमधून निघून गेले आहेत आणि हे एक उत्तम पहिले पाऊल आहे यावर सर्वजण सहमत आहेत. अमेरिका रशिया आणि युक्रेनसोबत एकत्र काम करत आहे कॅरोलिन लेविट यांनी आश्वासन दिले की अमेरिका रशिया आणि युक्रेन दोघांसोबत वाटाघाटीची प्रक्रिया पुढे नेत आहे. ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमुळेच युरोपीय नेते पुतिन यांच्याशी भेट झाल्यानंतर 48 तासांच्या आत व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. पुतिन-ट्रम्प बैठकीनंतर युरोपीय नेत्यांचा सहभाग लेविट म्हणाल्या की पुतिन आणि ट्रम्प यांच्या अमेरिकन भूमीवर झालेल्या भेटीनंतर 48 तासांच्या आत अनेक युरोपीय नेते व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. आणि पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर लगेचच या युरोपीय नेत्यांना देण्यात आलेली माहिती इतकी जलद होती की त्यातील प्रत्येकजण विमानात चढला आणि 48 तासांनंतर अमेरिकेला रवाना झाला.

Donald Trump: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर 50% कर; व्हाईट हाऊसचा मोठा खुलासा Read More »

jalna rainfall subsidy scam

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल

Jalna Rainfall Subsidy Scam : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अंबड पोलीस ठाण्यात 28 जणांविरुद्ध बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी परस्पर हडप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्तावेज तयार करून शासकीय निधीचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीसमोर आली आहे. तर दुसरीकडे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करणं बाकी आहे. प्रकरण काय? आरोपींनी 2022 ते 2024 दरम्यान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी राज्य सरकार कडून आलेला 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी बोगस खात्यात वळवून हडप केल्याचं चौकशी समितीच्या चौकशीत उघड झालंय. दरम्यान आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे गणेश ऋषींदर मिसाळ कैलास शिवाजीराव घारे विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर बाळु लिंबाजी सानप पवनसिंग हिरालाल सुलाने शिवाजी श्रीधर ढालके कल्याणसिंग अमरसिंग बमनावत सुनिल रामकृष्ण सोरमारे मोहित दत्तात्रय गोषिक चंद्रकांत तुकाराम खिल्लारे रामेश्वर नाना जाधव डिगंबर गंगाराम कुरेवाड किरण रविंद्रकुमार जाधव रमेश लक्ष्मण कांबळे सुकन्या श्रीकृष्णा गवते कृष्णा दत्ता मुजगुले विजय हनुमंत जोगदंड निवास बाबुसिंग जाधव विनोद जयराम ठाकरे प्रविण भाऊसाहेब शिनगारे बप्पासाहेब रखमाजी भुसारे सुरज गोरख बिक्कड सुशिल दिनकर जाधव (सहायक महसूल अधिकारी) वैभव विश्वंभरराव आडगांवकर (नेटवर्क इंजिनियर) विजय निवृत्ती भांडवले (तत्कालिन संगणक परिचालक) रामेश्वर गणेश बारहाते (महसूल सेवक) आशिष प्रमोदकुमार पैठणकर (सहायक महसूल अधिकारी) दिनेश बेराड (सहायक महसूल अधिकारी)

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल Read More »

Maharashtra Government: तरुणांनो इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Maharashtra Government: तरुण-तरुणींसाठी इस्त्राईल देशात “गृह-आधारित आरोग्य सेवा कर्मचारी” म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पाच हजार उमेदवारांना ही संधी मिळेल. इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले आहे. या नोकरीसाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात कौशल्य आणि अनुभव असणे महत्त्वाचे आहे. यासाठी भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त आणि किमान 990 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, नर्सिंग, फिजिओथेरपी, किंवा नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. जीडीए (GDA), एएनएम (ANM), जीएनएम (GNM), बीएससी नर्सिंग (B.Sc. Nursing), किंवा पोस्ट बीएससी नर्सिंग (Post B.Sc. Nursing) याशिवाय, उमेदवाराला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. या नोकरीसाठी दरमहा 1 लाख 61 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. निवड प्रक्रिया आणि सुविधा इस्त्राईलमध्ये नोकरी मिळवण्यासाठीची निवड प्रक्रिया महाराष्ट्रातच पार पडेल. यासाठी नियुक्ती, आरोग्य तपासणी, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत दिली जाईल. तसेच, इस्त्राईलमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय विमा, राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल. या संधीबद्दल अधिक माहिती https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असेही पंतम यांनी सांगितले.

Maharashtra Government: तरुणांनो इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शासकीय कर्मचारी या गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. तर दुसरीकडे कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत. तसेच रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.  

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

mbbs

MBBS प्रवेशातील आरक्षण 50% वरून 25% वर; विद्यार्थ्यांचा संताप, सरकारवर टीका

Maharashtra Government : महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील निजी अनएडेड (Unaided) मेडिकल महाविद्यालयांमधील MBBS प्रवेशासाठी राखीव जागांचे प्रमाण 50 टक्क्यांवरून थेट 25 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या मुळे विध्यार्थी आक्रमक झाले आहे. या मुळे आरक्षणातील कपातीमुळे एकूण 766 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी हुकणार आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी संघटनांनी केला आहे. याबाबत डॉ. सिद्धांत भारणे यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देत म्हटले की, “हा निर्णय पूर्णपणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून हे एक नियोजित षडयंत्र असल्यचे बोलले आहे” राज्यातील विविध भागातील विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचा तीव्र विरोध सुरू केला आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबईसह अनेक शहरांमध्ये आंदोलने होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांना या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पूर्वी 50 टक्के आरक्षणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात आपला वाटा निश्चित करता येत होता. मात्र आता तो हिस्सा अर्ध्यावर आल्याने सामाजिक समतेच्या तत्त्वाला धक्का बसल्याची टीका होत आहे. आधीच महागडी फी व आर्थिक अडचणींच्या कचाट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हा निर्णय सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते, परंतु यामागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करेल अशी अपेक्षा आहे. या निर्णयाने आता राजकीय वादाला देखील तोंड फुटले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ला चढवला असून, “शैक्षणिक संधी कमी करून सामाजिक न्यायाचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

MBBS प्रवेशातील आरक्षण 50% वरून 25% वर; विद्यार्थ्यांचा संताप, सरकारवर टीका Read More »

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन

IMD Rain Alert – अहिल्यानगरसह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज १९ ऑगस्ट रोजी देखील नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आज जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. भिमा नदी (दौंड पूल) -३०४४ क्युसेक, सीना नदी (सीना धरण) २६९ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे मेघगर्जना, वीजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे. मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे. जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे. धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे, घाटरस्त्याने प्रवास टाळावा. शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० उपलब्ध आहेत.

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन Read More »

img 20250819 wa0001

Raghuji Bhosle Sword : रघूजी भोसलेंची तलवार मुंबईत दाखल

Raghuji Bhosle Sword : 18व्या शतकातील प्रसिद्ध मराठा सेनानी रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर मुंबईत दाखल झाली आहे. तब्बल दोन शतकांनंतर या अमूल्य वारशाचा परतावा होत असून, मराठा साम्राज्याच्या शौर्यगाथेची ही तलवार पुन्हा एकदा लोकांसमोर येणार आहे. या तलवारीचे मुंबईत मोठ्या जल्लोषात व कलात्मक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी विविध कलासंस्थांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तलवारीसोबतच भोसले घराण्याच्या वारशाशी संबंधित दुर्मीळ वस्तूंचा समावेश होता. इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या मते, रघूजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा प्रभाव विदर्भापासून मध्य भारतापर्यंत विस्तारला. त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ही तलवार आजही मराठ्यांच्या शौर्याचा दुर्मिळ पुरावा मानली जाते. या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक व्याख्याने आणि प्रदर्शन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते, मराठा इतिहास रसिकांसाठी हा उपक्रम एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

Raghuji Bhosle Sword : रघूजी भोसलेंची तलवार मुंबईत दाखल Read More »