DNA मराठी

ट्रेंडिंग

mns

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी…

Raj Thackeray: पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाडिया कॉलेज परिसरात ABVP ने ‘बायकॉट मनविसे’ अशी पोस्टर्स लावल्याचा आरोप करत मनविसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या निषेधार्थ मनविसे कार्यकर्त्यांनी टिळक रोडवरील ABVP च्या पुणे कार्यालयावर धडक देत कुलूप ठोकले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार आंदोलन केले. मनविसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ABVP जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ABVP कार्यकर्त्यांनीही त्यांच्या बंद कार्यालयाबाहेर प्रतिउत्तरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुण्यात दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षाचे वातावरण चिघळले आहे. दरम्यान आता यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली असून पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती कृषिकेश रावले,पोलीस उपायुक्त झोन-1 यांनी दिली.

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी… Read More »

oplus 16908288

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

IMD Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता आहे. मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही काही भागात वातावरणात आर्द्रता आणि ढगाळपणा राहील त्यामुळे अचानक वादळी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात 18 ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके वाऱ्यापासून आणि पावसापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच उघड्यावर ठेवलेले धान, भुसा किंवा जनावरांचे खाद्य झाकून ठेवावे आणि हवामान खात्याच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता Read More »

ranji trophy

Ranji Trophy 2025 मुंबई संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफी 2025-26 साठी मुंबईने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मुंबईने मोठा निर्णय घेत अष्टपैलू शार्दुल ठाकूरकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. या रणजी ट्रॉफी हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने मुंबईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या, रहाणे आणि सरफराज खान यांनी खेळाडू म्हणून संघात स्थान निश्चित केले आहे. 42 वेळा विजेता मुंबई 15 ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी हंगामाच्या पहिल्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरचा सामना करेल. सरफराज व्यतिरिक्त, अष्टपैलू शिवम दुबेनेही मुंबई संघात स्थान निश्चित केले आहे. कार अपघातामुळे 2024-25 च्या स्थानिक हंगामातील बहुतेक खेळांना मुकावे लागलेल्या मुशीर खानलाही 16 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आयुष म्हात्रे, ज्याने अलीकडेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व केले होते, त्याला मुंबई संघात स्थान देण्यात आले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे रेड-बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यामुळे श्रेयस अय्यर मुंबई संघाचा भाग नाही. गेल्या हंगामात मुंबई संघात स्थान न मिळालेला पृथ्वी शॉ आता महाराष्ट्रात सामील झाला आहे. गेल्या हंगामात विदर्भाविरुद्ध रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीत खेळणारा सूर्य कुमार यादव देखील संघाचा भाग नाही. मुंबई संघ शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूझा, इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.

Ranji Trophy 2025 मुंबई संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत

Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे आता मार्गी लागणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार आहे.

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत Read More »

vivo v60e

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त…

Vivo V60e : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी एक जबरदस्त कॅमेरा फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी विवोने एक शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने Vivo V60e या नावासह भारतीय बाजारात 200 मेगापिक्सलसह स्मार्टफोन लॉन्च केलाय. कंपनीने दावा केला की हा 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला सर्वात परवडणारा फोन आहे. हा मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो सुरळीत कामगिरी आणि मल्टीटास्किंग करण्यास मदत करतो. किंमत आणि व्हेरियंट Vivo V60e तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. बेस मॉडेल 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो आणि त्याची किंमत ₹29,999 आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह दुसरा प्रकार ₹31,999 मध्ये उपलब्ध आहे. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह टॉप मॉडेलची किंमत ₹33,999 आहे. हा स्मार्टफोन एलिट पर्पल आणि नोबल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक ते Amazon, Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑर्डर करू शकतात. याव्यतिरिक्त, निवडक बँक कार्ड ऑफरवर 10% पर्यंत सूट उपलब्ध असेल. उत्कृष्ट डिस्प्ले आणि डिझाइन या फोनमध्ये 6.77-इंचाचा क्वाड कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1600 निट्स आहे, ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट होते. हे डायमंड शील्ड ग्लासने संरक्षित आहे, जे टिकाऊपणा वाढवते आणि स्क्रॅचची शक्यता कमी करते. कॅमेरा या फोनमध्ये 200 एमपी प्रायमरी सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ऑरा फ्लॅशसह 8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये फोटो आणि व्हिडिओ कॉलिटी वाढवणारी अनेक एआय फिचर्स आहेत. बॅटरी आणि चार्जिंग फोनमध्ये 90 वॅट फास्ट चार्जिंगसह 6500 एमएएच बॅटरी आहे. याचा अर्थ बॅटरी लवकर चार्ज होईल आणि दीर्घकाळ टिकणारा बॅकअप मिळेल. सॉफ्टवेअर आणि इतर फिचर्स विवो व्ही60ई हा अँड्रॉइड 15 वर आधारित आहे, ज्यामध्ये कंपनीने अनेक स्मार्ट आणि कस्टमाइज्ड फीचर्स जोडले आहेत. एकंदरीत, हा फोन स्टायलिश डिझाइन, शक्तिशाली कामगिरी आणि प्रीमियम कॅमेरा हवा असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त… Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले

Asaduddin Owais: अहिल्यानगर शहरात एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेपूर्वी पोलिसांनी खासदार ओवैसी यांना सभेसाठी काही अटी आणि शर्ती घातल्याने सभेत बोलताना ओवैसी यांनी फक्त मलाच लव्ह लेटर का? असा प्रश्न विचारत पोलिसांचा भरपूर समाचार घेतला. या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता येतो, जेव्हा ठाकरे गटाचा नेता येतो, जेव्हा आरएसएसची सभा असते आणि जेव्हा भाजपचा नेता येतो तेव्हा पोलीस त्यांना लव्ह लेटर देत नाही. फक्त आम्हालाच लव्ह लेटर मिळतो कारण पोलिसांना देखील माहिती मर्द फक्त एकच आहे. अश्या शब्दात खासदार ओवैसी यांनी पोलिसांचा समाचार घेतला. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मी भारताचा नेतृत्व दुसऱ्या देशामध्ये केलं. कतरचे एक शेख पॅलेस्टाईन संबंधी भारताविषयी बोलत होते तेव्हा माझ्या डेलिगेशनने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्या शेख ला उत्तर दिलं की भारतापेक्षा तर तुमचा हा कतर पॅलेस्टाईनच्या अगदी जवळ आहे मग तुम्ही का नाही पहिले मदत पोहोचवत आणि भारत याने आपला एक हिस्सा हा पॅलेस्टाईन साठी ठेवलेला आहे. असं मी कतर मध्ये भारताची साईट घेऊन सांगितलं आज मी भारतासाठी दुसऱ्या देशांशी लढत आहे तरी देखील जिथे मी जातो तिथे मला लव्ह लेटर दिला जातो आणि त्यात सांगितलं जातं की मी काय बोलावं आणि काय नाही ? बीजेपी पार्टीचे नेते येतात, शिंदे पार्टीचे नेते येतात, अजित पवार पार्टीचे नेते येतात तेव्हा त्यांना का हा लव्हलेटर दिला जात नाही. मी एकटाच मर्द पोलिसांना दिसतो का? आणि ज्या कलमान्वये मला हा लेटर देण्यात आला तो कलमला रद्द करण्यासाठी मीच 35 मिनिट सादनात भाषण केलं आहे. कदाचित पोलीस हे विसरले. पोलिसांनी दिलेला हा लव्ह लेटर मी रिजेक्ट करतो असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले Read More »

imtiaz jaleel

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap : अहिल्यानगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगर शहरात चिकनी चमेली राहत असून काम न करता फक्त हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आमदार जगताप यांच्यावर केली आहे. या सभेत बोलताना आम्ही पंतप्रधान मोदींना उत्तर देतो तर तू कोण? तू तर चिल्लर आहे असा टोला देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना लावला. तर दुसरीकडे त्यांनी नगर – औरंगाबाद रस्त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान करत मी 20 हजार रुपये देतो तुम्ही एकदा नगर – औरंगाबाद रस्त्यावर प्रवास करा असं म्हटले आहे. तसेच आमच्या पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो मात्र मी जेव्हा आमदार आणि नंतर खासदार झालो तेव्हा मी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता अशी आठवण देखील जलील यांनी विरोधकांना करून दिली. तर दुसरीकडे नगर शहरात एक विषारी साप असून तो दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या विष मध्ये दम नाही अशी टीका फारुख शाब्दी यांनी आमदार जगताप यांच्यावर केली.

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: मोठी बातमी, खासदार ओवैसी नगर शहरात दाखल

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे अहमदनगर शहरात आगमन झाले असून आज संध्याकाळी 7 वाजता मुकुंदनगरमधील सीआयव्ही ग्राउंड येथे ओवैसी जाहीर सभा घेणार आहे. या सभेत ओवैसी यांच्याकडून कोणते मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार ओवैसी यांच्यासोबत नगर शहरात एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह मुंबई प्रदेशाध्यक्ष फारुक शाब्दी, माजी आमदार वारीस पठाण आज नगर शहरात येणार आहे. खासदार ओवैसी पहिल्यांदाच नगर शहरात जाहीर सभा घेत असल्याने सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा सभेच्या ठिकाणी दाखल झाला आहे.

Asaduddin Owais: मोठी बातमी, खासदार ओवैसी नगर शहरात दाखल Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस

Nilesh Ghaywal : कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या परदेशवारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.घायवळविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला विशिष्ट अटींवर २०२२ मध्ये न्यायालयीन जामीन मंजूर करण्यात आला होता. या अटींमध्ये पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश होते. मात्र न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही हा प्रश्न उपस्तित होतो. तसे झाले असते तर घायवल देशाबहेर जाण्याचा प्रश्न च उद्भवला नसता. परिणामी घायवळ याला २०१९ मध्ये तत्काळ (तत्काळ) योजनेतून मिळवलेला पासपोर्ट वापरून परदेशात जाणे शक्य झाले. तत्काळ योजना आणि पडताळणी तत्काळ योजनेत अर्जदाराला जलद पासपोर्ट मिळतो. या प्रक्रियेत पासपोर्ट आधी दिला जातो आणि नंतर काही दिवसांत पोलिस पडताळणी केली जाते. पडताळणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढे पासपोर्ट एक्ट नुसार पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करता येते. पोलिसांचा पडताळणी अहवाल विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, घायवळने २०१९ मध्ये तत्काळ योजनेतून मिळवलेल्या पासपोर्टसाठी झालेल्या पोलिस पडताळणी (पीव्ही) अहवालात त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच घरावर भेट दिली असता तो “उपलब्द नाही (नॉट अव्हेलेबल)” असल्याची नोंद करण्यात आली होती. वास्तविक पाहता पोलिसांनी गुन्हयाची माहिती अवहालात देणे अपेक्षित होते परंतु तसे झालेले दिसत नाही. यामुळे त्याचा पासपोर्ट कायम ठेवण्यात अडचण आली नाही. पासपोर्टविषयी पुढील कारवाई घायवळने पासपोर्ट अर्ज करताना स्वतःविरुद्ध असलेले गुन्हे लपवून चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करुण 2019 मध्ये पासपोर्ट मिळवला होता. पोलिसांनी आरोपी देशा बाहेर गेल्यानंतर हा प्रकार पासपोर्ट कार्यालयला निदर्शनास आणून दिला. त्या नंतर त्याचा पासपोर्ट जप्तीबाबत कारणे दाखवा नोटीस (एससीएन) जारी करण्यात आली आहे. तसेच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट करण्यात आले आहे.

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस Read More »

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही

Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य दिव्य कार्यक्रमात विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी स्वत:ची स्तुती केली. काम पूर्ण न झालेल्या विमानतळाचे उद्घाटन सोहळ्यातही त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यातच धन्यता मानली. पण नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. नवी मुंबई विमानताळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने त्यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. वर्षाला २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचं वचन, १०० स्मार्ट सिटी उभा करण्याचे आश्वासन याचे काय झाले ते मात्र पंतप्रधानांनी सांगितले नाही. पंतप्रधानानी काँग्रेसवर टीका केली पण याच काँग्रेसच्या सरकारने पाकिस्तानचे दोन टुकडे केले होते. काँग्रेस सरकारने मुंबई हल्ल्याच्या आरोपींना फाशी दिली. पण मोदी सरकारने पाकिस्तानच्या आयएसआयला पठाणकोठ हल्ल्याच्या तपासासाठी देशात बोलावले होते. ३०० किलो आरडीक्स घेऊन अतिरेक्यांनी पुलवामात हल्ला केला, मोदी सरकार त्यांना पकडू शकले नाही. पहलगाम हल्ला सर्वांना माहित आहेच त्यामुळे मोदींनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी अमेरिकेला घाबरून ऑपरेशन सिंदूर का थांबवले याचे उत्तर द्यावे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलावे आणि वागावे अशी अपेक्षा असते पण मोदी बेजबाबदार पणे बोलून आणि वागून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करून पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग करतात हा अधर्म आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. १० वर्षापूर्वी पंतप्रधानांनी बिहार निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत येऊन इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते, त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. २०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते त्याचे कामही अद्याप सुरु नाही. उद्घाटन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने उद्घाटनाची घाई केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही Read More »