DNA मराठी

ट्रेंडिंग

aditi tatkare

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मंत्री आदिती तटकरेंची ग्वाही

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नसल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहिण योजनेला यशस्वी वर्षपूर्ती होत आहे. सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांना आम्ही या योजनेचा लाभ देत आहोत. दोन दिवसांपूर्वीच जुलै महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक योजना ही दरवर्षी एक प्रक्रियेतून जात असते. पात्रतेचे काही नियम या योजनेसाठी आहेत.माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काही डेटा आम्हाला दिला आहे.त्यांनी दिलेल्या डेटानुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ चालू राहणार, अपात्र असणाऱ्यांचा लाभ कमी होईल. 2100 रुपये देण्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री व  दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ योग्य वेळी घेईल. मात्र आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत. ही योजना बंद होणार नाही. असं माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी पिंक रीक्षा ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापुरात 700 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना रिक्षा वाटप केले जात आहे. यावर्षी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी 400 पिंक रिक्षाचे उद्दिष्ट असल्याचीही माहिती दिली.

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मंत्री आदिती तटकरेंची ग्वाही Read More »

img 20250809 wa0001

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व”

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलणे, आमदार फोडणे आणि सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच रचणे हे काही नवीन राहिले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्याला एक वेगळे आणि अधिक धोकादायक दिशा मिळालेली दिसते. शरद पवारांसारख्या थोर राजकारण्यांनीही भूतकाळात पक्ष फोडला, नवा पक्ष उभारला, सत्ता मिळवली. पण त्या काळात पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्याचा फोटो यावर असा थेट दावा कुणी केला नव्हता. तात्पर्य, राजकीय भूक होती, पण तिची एक मर्यादा होती. पण आज ती मर्यादा धूसर होत चालली आहे. “मी निवडून आलोय, म्हणजे माझीच मक्तेदारी,” असा अहंकार काही निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या वागण्यात दिसतो. जनतेने मतदान पेटीतून ज्यांना विश्वासाने निवडलं, तेच प्रतिनिधी निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षांनाच कमी लेखतात. हीच का लोकशाही असा प्रश्न पडतो? या सगळ्या घडामोडींचा एक सकारात्मक पैलूही आहे. आज या अस्थिर आणि अस्वस्थ राजकारणात दोन तरुण नेते उभे राहताना दिसतात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे. या दोघांनीही आपल्या राजकीय प्रवासात पक्ष फोडणे, दबाव तंत्र, आमदारांची खरेदी-विक्री, विश्वासघात, एकनाथ शिंदें व अजित पवारांसारखे बंड आणि सत्तापालट यांचे साक्षीदार झाले आहेत. हे राजकारण त्यांनी बाहेरून पाहिलं नाही अनुभवलं आहे. आज हे दोघंही नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना, पक्ष रचनेचा गाभा कसा मजबूत करायचा, कार्यकर्त्यांशी नातं कसं टिकवायचं, जनतेचा विश्वास कसा जपायचा, आणि राजकारणात नैतिकता जिवंत कशी ठेवायची याचा धडा घेऊन पुढे येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांचा वारसा आणि ठाकरे बाणा जपण्याचा प्रयत्न केला. तर रोहित पवार यांनी शरद पवारांच्या परंपरेचा अभ्यास केला, तरुणाचे प्रश्न कसे हाताळायची आणि ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क कास रहायचं “शरद पवार जसे आज बहुतांशी गाडीने प्रवास करताय. असं रोहित पण काकांचा वारसा जपतानी दिसतंय, ग्रामीण भागात नाळ जुळून घेण्याचे त्याचे कौशल्य त्यांच्यात दिसते. हे दोघेही आज सत्तेच्या खेळात नाहीत, पण राजकारणाच्या अभ्यासातून आणि प्रत्यक्ष संघर्षातून त्यांनी आपले राजकीय स्थान मजबूत केले आहेत. म्हणूनच भविष्यकाळाकडे पाहताना वाटते आजच्या फोडाफोडीच्या राजकारणातूनच उद्याचं ठाम आणि विचारधारेशी बांधिल नेतृत्व उगम पावू शकतं आणि या बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे ही नावं नजरेआड करणं अशक्य आहे.

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व” Read More »

Asia Cup 2025: भारताला धक्का, ‘हा’ खेळाडू आशिया कपमधून अन् वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून बाहेर

Asia Cup 2025 : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप 2025 पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत आशिया कप 2025 मध्ये दिसणार नाही. तसेच तो ऑक्टोबर महिन्यात वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत देखील खेळताना दिसणार नाही. याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे. नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला झालेल्या दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आशिया कपचा 17 वा हंगाम 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळला जाईल. त्यानंतर काही दिवसांनीच भारताला वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची घरच्या कसोटी मालिका खेळायची आहे, जी 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल. पंतच्या अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापनाला नवीन रणनीती बनवावी लागेल. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये दुखापत मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान पंतला हा धक्का बसला, जेव्हा क्रिस वोक्सचा यॉर्कर त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला लागला. त्यावेळी पंत फलंदाजी करत होता आणि दुखापत इतकी गंभीर होती की त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेण्यात आले. स्कॅनमध्ये पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आणि डॉक्टरांनी किमान सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर दुखापतीमुळे पंत अंतिम सामन्यात म्हणजेच ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. या सामन्यात भारताने इंग्लंडला रोमहर्षक पद्धतीने सहा धावांनी पराभूत केले आणि पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवट 2- 2असा केला. वृत्तानुसार, पंतची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. भारताची आशिया कप मोहीम भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल. संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळण्याची शक्यता आहे. भारताला पाकिस्तान, यूएई आणि ओमानसह ग्रुप ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाईल, जेणेकरून आगामी टी-20 विश्वचषकाची तयारी करता येईल.

Asia Cup 2025: भारताला धक्का, ‘हा’ खेळाडू आशिया कपमधून अन् वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून बाहेर Read More »

raju shetty

माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला; राजू शेट्टी यांनी मानले अंबानी परिवार आभार

Raju Shetty : कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात, खास करून कोल्हापूरच्या जवळच नांदणी परिसरात हत्तींसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. वनताराने प्रस्तावित केलेल्या या केंद्रात महादेवीसाठी सर्व अत्याधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील. ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल. लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींचा आदर करत वनताराने हा एक अनोखा तोडगा काढला काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका जाहीर केली आहे. राजू शेट्टी यांनी अंबानी परिवार आणि विशेषतः अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. आम्ही जैन समाजाचे असून जिओ और जिने दो या तत्वाने जगत असतो. माधुरी हत्तीची काळजी घेत नसल्याचा व तिचा छळ करण्याचा आरोप पेटाने आमच्यावर लावला. हा आरोप आम्हाला सहन नाही झाला. जीव, जंतू आणि जनावर यांच्यावर प्रेम असल्यामुळे आम्हाला त्रास झाला. यामुळे थोडा रोष निर्माण झाला होता. मात्र आता शेवट छान होत असून यामध्ये अनंत अंबानींची विशेष भूमिका राहिल्याने राजू शेट्टी यांनी अंबानी परिवाराचे आभार मानले.

माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला; राजू शेट्टी यांनी मानले अंबानी परिवार आभार Read More »

the demonic form of the teacher in pathardi

शिक्षकाचं राक्षसी रूप l चौथीतील विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप, गावात आर्थिक तडजोडीच्या चर्चेने खळबळ

अहिल्यानगर | प्रतिनिधी – पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात गावातील सरपंचपतीने मध्यस्थी करत कथितपणे आर्थिक तडजोड घडवून आणल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. पीडित मुलगी परप्रांतीय असल्याची माहिती असून, तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या मोबदल्यात मौन बाळगण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, सरपंचपतीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, पीडिता अल्पवयीन असल्यामुळे हा प्रकार ‘पॉक्सो कायद्या’च्या (Protection of Children from Sexual Offences Act) चौकटीत येतो. मात्र, अद्यापही या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, तसेच पोलिसांकडूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. स्थानिक पातळीवर दबाव आणि राजकीय हस्तक्षेपामुळे संपूर्ण प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पीडितेला न्याय मिळावा, आरोपी शिक्षकाला निलंबित करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. दरम्यान, महिला व बालकल्याण विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषदेने या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. प्रमुख मुद्दे:

शिक्षकाचं राक्षसी रूप l चौथीतील विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप, गावात आर्थिक तडजोडीच्या चर्चेने खळबळ Read More »

Vijay Wadettiwar on Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्या ; विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन नसणार अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिल्यानंतर विरोधक याचा विरोध करत आहे. एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागेल आणि मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिले आहे. तर आता निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी VVPAT ची आवश्यकता आहे. मतदाराने कुणाला मत दिले हे त्यांना समजले पाहिजे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशीन शिवाय घेऊ नये, या मशीन नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी हे सरकार जैन समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. भाजप आमदाराने कबुतरखाने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, मुंबई महापालिकेने कारवाई केली. जैन समाज रस्त्यावर उतरला तेव्हा भाजपचे मंत्री या निर्णयाविरोधात जातात. म्हणजे निर्णय हेच सरकार घेणार आणि मग यू टर्न पण घेणार. नसलेले प्रश्न आणि समस्या हे सरकार निर्माण करत आहे आणि जैन समाजाचे तारणहार हे सरकार आहे असा दिखावा तयार करत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका समोर ठेवून मतांसाठी भाजप आपली राजकीय पोळी भाजत आहे ,भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. आपल्या देशाबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे. चीनच्या आक्रमणाबाबत त्यांनी प्रश्न विचारले तर न्यायाधीशांनी सच्चा भारतीय अस विधान करू शकत नाही, अशी टिपण्णी केली, हे योग्य नाही. देशात घडणाऱ्या घटनांबाबत सरकारला प्रश्न विचारण्याचे कर्तव्य विरोधी पक्ष नेत्यांचे आहे. पण कोण खरा भारतीय, कोण नाही याचे प्रशस्तीपत्रक न्यायाधीशांनी देऊ नये अशी स्पष्ट भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. एकीकडे भाजप प्रवक्तेपदी असलेली व्यक्ती उच्च न्यायालयात न्यायाधीश होणार दुसरीकडे न्यायाधीश विरोधी पक्ष नेते यांच्यावर टिपण्णी करतात याने न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडून जाईल. त्यामुळे देशातील लोकशाहीला गालबोट लागेल अशी विधान किमान न्यायाधीशांनी करू नये, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar on Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्या ; विजय वडेट्टीवार Read More »

माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले

Devendra Fadnavis: माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये आणण्याचे कोर्ट आदेश देईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात माधुरी हत्तीण आणि वनतारा मुद्दा गाजत असताना आता पुन्हा एकदा माधुरी हत्तीण राज्यात परतणार आहे. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते, त्यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितले की, माधुरी हत्तीणीवर हक्क सांगायची आमची कुठलीही इच्छा नाही. आम्हाला कोर्टाने सांगितल्यामुळे आम्ही हे सर्व केले आहे. त्यानंतर मी त्यांना सांगितले जर असे असेल, तर तुम्ही देखील आमच्यासोबत सुप्रीमकोर्टमध्ये जॉईन झाल पाहिजे, आपण जॉईंटली कोर्टाला विनवणी करू की, माधुरी हत्तीण तेथेच कोल्हापूरमध्ये नागणी मठ मध्ये एक रेस्क्यू सेंटर तयार करून ठेवू. हायपावर कमिटीने जे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या सोयी तेथेच करू, तेथेच तो माधुरी हत्तीणीला आणू, तुम्ही त्याला समर्थन द्या. अशी मागणी केली. त्याला त्यांनी समर्थन दिले आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जर कोर्टाने तसा निर्णय दिला, कोर्ट तसा निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर सर्व तयार करून द्यायला तयार आहेत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर कबूतरखाना प्रकरणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे वाटते की तिकडे आस्था आहे, लोकभावना आहे. आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे, दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहे.ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची जी परंपरा आहे. तीदेखील खंडित होणार नाही, आणि आरोग्याचे ही प्रश्न निर्माण होणार नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले Read More »

img 20250807 wa0001

Sharad Pawar: राजकारणात अजूनही पवारांचा ‘सेंटर स्टेज’

Sharad Pawar : राजकीय पटावर मातब्बर नेता म्हणून चार दशके आपली बुद्धिमत्ता, व्यूहरचना आणि निर्णयक्षमता सिद्ध केलेल्या शरद पवार यांच्यासाठी गेले काही महिने विशेषतः आव्हानात्मक ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे जुने, कणखर आणि चाणाक्ष सहकारी पक्षातून बाहेर पडले, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन फाट्यांमध्ये विभागला गेला. साहजिकच, ‘पवारांचे युग संपले’ अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र, शरद पवार हे नजरेआड झाले तरी मन:पटलावरून अदृश्य झाले नाहीत, हे त्यांनी आपल्या शांत पण निश्चित पावलांमधून पुन्हा सिद्ध केले. “कुस्ती अजून संपलेली नाही, फड अजून मांडायचा आहे,” हा त्यांचा ठाम संदेश होता. आणि याचे प्रत्यंतर मिळाले ते नुकत्याच काही महिन्यांतील घडामोडींमध्ये विशेषतः आमदार रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेमुळे. रोहित पवारांनी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर ज्या आक्रमकतेने भूमिका मांडल्या, त्या केवळ विरोधकांना अडचणीत आणणाऱ्या नव्हत्या, तर सत्ताधाऱ्यांच्या गोंधळलेल्या रणनीतीलाही तडाखा देणाऱ्या होत्या. मंत्र्यांना थेट जाब विचारण्याची त्यांची शैली, शेतकरी प्रश्नांपासून ते महागाई, भ्रष्टाचार, आणि जलव्यवस्थापनाच्या विषयांवर आवाज उठवण्याची तळमळ पाहता, ‘पवारांची नवी फळी तयार झाली आहे,’ अशी जाणीव राजकीय विश्लेषकांना होऊ लागली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार केवळ शरद पवारांचे नातू म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र, अभ्यासू आणि खंबीर व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येताना दिसत आहेत. ही घडामोड केवळ एक पिढीगत बदल न राहता, एक नव्या राजकीय लढाईची नांदी ठरत आहे. शरद पवार यांचे बलस्थान नेहमीच संकटात संधी शोधण्याचे राहिले आहे. ऐन अडचणीच्या काळातही संयम न सोडता, भक्कम पर्याय उभा करणे हा त्यांचा राजकीय स्वभाव आहे. त्यामुळेच आज जेव्हा अनेक जुन्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली, तेव्हा पवारांनी तरुण नेतृत्वाला पुढे करून, नव्या स्वरूपातील विरोधी भूमिका घडवण्यास प्रारंभ केला. ही भूमिका, केवळ सत्तेच्या विरोधातील नकारात्मक मानसिकतेतून नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या प्रेरणेवर आधारित आहे. शरद पवारांचे राजकारण नेहमीच दीर्घदृष्टी असलेले राहिले आहे. एका बाजूला ते स्वतःची भूमिका सांभाळत आहेत, तर दुसरीकडे नव्या नेतृत्वाला तयार करत आहेत. ‘मोठे नेते गेले तरी पक्ष संपत नाही,’ हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आणि हीच आहे त्यांची नवी खेळी शांत, पण प्रभावी. राजकीय रंगमंचावरून पवारांचा पडदा कधीच खाली जाणार नाही, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. “पवार संपले” असं म्हणणाऱ्यांना त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, “खेळ अजून बाकी आहे!”

Sharad Pawar: राजकारणात अजूनही पवारांचा ‘सेंटर स्टेज’ Read More »

controversy over the film khalid ka shivaji

Khalid Ka Shivaji Movie | ‘खालिद का शिवाजी’ मराठी सिनेमा प्रदर्शनाआधी वादात, हिंदू महासंघ आक्रमक

मुंबई | प्रतिनिधी – Khalid Ka Shivaji – ‘खालिद का शिवाजी’ या नव्याने प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे कथित अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप केला आहे,  हिंदू महासंघाने राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. यामुळे काही शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यानही याचे पडसाद उमटले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर शहरांत महासंघाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते,  “छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देत, चित्रपटावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी आंदोलनं चिघळू नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, प्रशासनाने शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले कि  “शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान होऊ दिला जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे, ही निवडणूकपूर्व औपचारिक प्रतिक्रिया आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान, ‘खालिद का शिवाजी’ या  वादग्रस्त ठरलेल्या या चित्रपटाचे निर्माते पुढे येत, “चित्रपटाचा उद्देश कोणत्याही समाजगटाला दुखावण्याचा नाही. अशी भूमिका घेतली आहे, कृपया संपूर्ण चित्रपट पाहिल्यावरच निष्कर्ष काढावा,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. थोडक्यात:

Khalid Ka Shivaji Movie | ‘खालिद का शिवाजी’ मराठी सिनेमा प्रदर्शनाआधी वादात, हिंदू महासंघ आक्रमक Read More »

sawadi land scam dna marathi

Sawedi land scam – सावेडीतील ‘सत्य’ कुणाला नकोय?

Sawedi land scam –सदर प्रकरणातील १९९१ सालचा खरेदीखत, फेरफार क्रमांक ७३१०७ आणि त्यातील कथित गैरव्यवहारांची चौकशी जर पारदर्शक असेल, तर ती थांबवली का जातेय? २३ जुलै रोजी DNA मराठीनेही यासंदर्भात ‘दोषीना वाचवण्याचा प्रयत्न?’ या आशयाची गंभीर बातमी प्रसिद्ध केली. तरीही यंत्रणा गप्प का? Sawedi land scam अहिल्यानगर – सावेडी येथील सर्वे नं. २४५/ब२ संदर्भातील वाद दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. खरेदीखत, करारनामा, साठेखत, हिबानामा असे विविध दावे आणि प्रतिदावे समोर येत आहेत. एकीकडे काहीजण साठेकर असल्याचा दावा करताहेत, तर दुसरीकडे मूळ खरेदी दस्ताऐवजच अवैध असल्याची ठाम भूमिका घेण्यात येत आहे. एवढे असूनही, प्रशासनाची संथ गती आणि विलंबित कारवाई, या प्रकरणात ‘दोषींना वाचवण्याचा प्रयत्न’ सुरु आहे की काय, असा दाट संशय निर्माण करत आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे यासंदर्भातील तक्रार २३ जून २०२५ रोजी दाखल झाली. त्यांनी लगेचच “त्वरित अहवाल द्या” असा स्पष्ट आदेशही दिला. मात्र, पंधरा दिवस उलटून गेले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप अहवाल सादर केलेला नाही. या टाळाटाळीचे नेमके कारण काय? एखाद्या साध्या फेरफार प्रकरणात, विशेषतः जेव्हा जुने दस्तावेज उपलब्ध आहेत, तेव्हा इतका वेळ का लागत आहे असा सवाल उपस्थित होत आहे? सवाल एवढाच आहे की, हा खरोखर दस्तऐवजावर आधारित प्रशासकीय निर्णय आहे की कोणाचे तरी वाचवण्यासाठी करण्यासाठी रचलेली योजना? सदर प्रकरणातील १९९१ सालचा खरेदीखत, फेरफार क्रमांक ७३१०७ आणि त्यातील कथित गैरव्यवहारांची चौकशी जर पारदर्शक असेल, तर ती थांबवली का जातेय? २३ जुलै रोजी DNA मराठीनेही यासंदर्भात ‘दोषीना वाचवण्याचा प्रयत्न?’ या आशयाची गंभीर बातमी प्रसिद्ध केली. तरीही यंत्रणा गप्प का? सूत्रांच्या माहितीनुसार महसूल प्रशासनातील काही कर्मचारी, सहाय्यक निबंधक कार्यालय आणि कथित भूमाफिया यांच्यात ‘संगनमत’ झाल्याची चर्चा आहे. जर हे खरे असेल, तर केवळ सरकारी कारभारच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात येत आहे. या प्रकरणात लक्ष वेधण्यासारखी बाब म्हणजे, खरेदीखत योग्य ठरवण्यासाठी आणि फेरफार कायम राहावा यासाठीच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव निर्माण केल्याचेही वृत्त आहे. इतकंच नव्हे, तर नाविंन काहीतरी कट होत आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणावरून पुढील महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात: या प्रश्नांची उत्तरं तातडीने मिळणं गरजेचं आहे. अन्यथा, “दोषींना वाचवण्यासाठीच चौकशीचा दिखावा?” हे लोकांचे समज सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही.प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आता ‘नीटनेटकेपणाने’ काम करत, पारदर्शक चौकशी करून खरे आणि खोटे ठरवायला हवं. अन्यथा, ‘सावेडी प्रकरण’ हा केवळ मालमत्तेचा नाही, तर जनतेच्या विश्वासाचा गंभीर वाद ठरेल.

Sawedi land scam – सावेडीतील ‘सत्य’ कुणाला नकोय? Read More »