DNA मराठी

ट्रेंडिंग

somnath suryavanshi

Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण अखेर एसआयटी स्थापन

Somnath Suryavanshi : परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना ८ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली आहे. या विशेष तपास पथकात खालील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या एसआयटीचे अध्यक्ष म्हणून ― १. सुधीर हिरेमठ, (सीबीआयवरून नुकतेच महाराष्ट्रात रुजू झालेले विशेष पोलीस महानिरीक्षक, सीआयडी, पुणे) २. अभिजीत धाराशिवकर – सदस्य, (पोलीस अधीक्षक, सीआयडी, नागपूर) ३. अनिल गवाणकर, सदस्य ( पोलीस उप अधीक्षक, सीआयडी, नांदेड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तपास पथकात परभणी जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. SIT चे अध्यक्ष हे प्रत्यक्ष अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे काम पाहणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी त्यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते, त्याविरोधात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र, सर्वोच्च न्यायालयात पीडितांच्या बाजूने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती, त्यानुसार न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. आगामी काळात ही एसआयटी काय चौकशी करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण अखेर एसआयटी स्थापन Read More »

truck

Pratap Sarnaik : मोठी बातमी! जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत क्लिनर गरज नाही

Pratap Sarnaik : आता जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर ) गरज नसणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दिली आहे.या बाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर 29 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहाय्यक (क्लिनर) देण्याची अट शिथिल करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मते सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन निर्मिती होत असल्यामुळे सहाय्यकाची (क्लिनर) शक्यतो गरज पडत नाही. त्यामुळे त्याचा विनाकारण खर्च वाढतो. तो खर्च कमी करण्यासाठी चालकासह सहाय्यक देण्याची अट शिथिल करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 96 (2) (xxxii) अन्वये शासनाला दिलेल्या अधिकारांनुसार या नियमांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, 29 ऑगस्ट 2025 नंतर शासनाकडून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. या मसुद्यावर कोणत्याही व्यक्तीने हरकती किंवा सूचना असल्यास त्या परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, 5 वा मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डिंग, क्र. 2, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – 400 001 येथे पाठवाव्यात. नियोजित तारखेपूर्वी प्राप्त झालेल्या हरकती व सूचना शासनाच्या विचारार्थ घेतल्या जातील. मसुदा नियम 1. हे नियम महाराष्ट्र मोटार वाहन (प्रथम सुधारणा) नियम, 2025 म्हणून ओळखले जातील. 2. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 249 मध्ये खालील तरतूद जोडण्यात येईल: जड मालवाहतूक वाहनामध्ये (Heavy Goods Vehicle) सहाय्यक (attendant) असणे बंधनकारक राहणार नाही, परंतु ही सवलत केवळ अशा वाहनांसाठी लागू राहील जे ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम (Driver Assist System) ने सुसज्ज असतील. ड्रायव्हर असिस्ट सिस्टीममध्ये 360 अंश दृश्य कॅमेरा, सर्व ब्लाइंड स्पॉट व मागील भागाचे थेट दृश्य (live feed) उपलब्ध करून देणारी सुविधा, तसेच ध्वनी आणि दृश्य स्वरूपात इशारे देणारी प्रॉक्सिमिटी अलार्म प्रणाली असणे आवश्यक आहे. ही प्रणाली वाहन रिव्हर्समध्ये असताना मागून येणाऱ्या वाहनचालकांना व इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांना पुरेशी पूर्वसूचना देईल व चालकाला सुरक्षिततेसाठी आवश्यक इशारे देईल. ही अधिसूचना राज्यातील सर्व वाहनधारक, वाहतूक व्यवसायिक व सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी प्रकाशित करण्यात आली आहे.

Pratap Sarnaik : मोठी बातमी! जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत क्लिनर गरज नाही Read More »

sachin sawant

Sachin Sawant : खड्डे कोण बुजवणार यावरून सरकारमध्ये गोंधळ; सचिन सावंत आक्रमक

Sachin Sawant : मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत नसल्याने तिकडमबाजीचा वापर हे तिकडम सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने मुंबईतील टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्याची अंमलबजावणी कशी करावी याबाबत पुढे कोणताही निर्णय घेतला नाही. ३ जून २०२५ रोजी शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत एसएसआरडीसीला नुकसान भरपाई शासन देईल असा निर्णय घेतला परंतु शासनाकडे ठणठण गोपाळ असल्याने टोल गोळा करणाऱ्या आयआरबी कंपीनाला २०२९ पर्यंत जड वाहनांकडून टोल वसूली करण्याची परवानगी देण्यात आली. हा कालावधी संपल्यानंतर खरे तर मुंबई महानगरपालिकडे हे सर्व उड्डाणपुल वर्ग केले जाणार होते आणि तोपर्यंत आयआरबी कंपनीने त्याची देखभाल करावी असे अपेक्षित होते. परंतु या कंपनीने टाळाटाळ सुरु ठेवली आणि आर्थिक नियोजनाचे कारण देऊन मुंबईकरांना अद्यापही खड्ड्यांमध्ये जाण्यास भाग पाडले आहे. आता सरकारने मुदतीआधीच मुंबई महानगरपालिकेकडे मुंबईतील १९ उड्डाणपुल व काही रस्ते वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टोल वसुलीच्या माध्यमातून येणारा निधी मात्र रस्ते विकास महामंडळच घेईल आणि मुंबई महापालिका देखभालीचा खर्च स्वतः करून रस्ते विकास महामंडळाकडे झालेल्या खर्चाची भरपाई मागेल असे ठरले आहे. आता यापुढे जाऊन टोलवसुलीचा कालावधी कमी करण्याचा विचार असल्याचे समजते. ही सर्व तिकडमबाजी पाहता सरकारकडे कोणतेही नियोजन नाही, आर्थिक तरतूद, प्रशासकीय कामकाजातील सुसुत्रता तसेच संपूर्ण विचार न करता मनाला वाटेल तसे निर्णय घेतले जात आहेत व त्यात बदल करण्यात येत आहेत याचे हे उदाहरण आहे. टोल वसुलीचा कालावधी वाढवणे वा कमी करणे यामागे मनमानी कारभाराचे दर्शन सरळ सरळ दिसत आहे. अद्यापही मुंबई महापालिकेने एमएसआरडीसी कडून रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी स्विकारलेली नसल्याने मुंबईकरांना मात्र खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरी म्हणतात दोन वर्षात अमेरिकेसारखे रस्ते बनवू. तर मुख्यमंत्री म्हणतात दुबईसारखे शहर बनवू, आता फडणविसांनी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेसारखी ‘मुख्यमंत्री अमेरिका दुबई दर्शन योजना’ राबवावी जेणेकरून मुंबईतील SPACE TECHONOLOGY चे हे रस्ते अमेरिका किंवा दुबईत कुठे असतात तसेच महायुतीसारखा धोरण लकवा दुबई व अमेरिकेत आहे का, हेही जनतेला कळू शकेल, असेही सचिन सावंत म्हणाले.

Sachin Sawant : खड्डे कोण बुजवणार यावरून सरकारमध्ये गोंधळ; सचिन सावंत आक्रमक Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, तूर कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या. विशेषतः शेवगांव तालुक्यातील खामगांव, हिंगणगांव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खा. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे की, शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. तातडीने पंचनामे करा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खा. लंके यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र Read More »

Eknath Shinde: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

Eknath Shinde: यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. ते शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.

Eknath Shinde: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय Read More »

james vince

The Hundred Tournament : इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास; धोनी-कोहलीला टाकले मागे

The Hundred Tournament : टी 20 क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या खेळाडूने नवीन इतिहास रचला आहे. जेम्स विन्सने द हंड्रेड लीगमध्ये खेळताना एक मोठा विक्रम मोडला आहे. विन्स आता कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. द हंड्रेड टूर्नामेंटमध्ये सदर्न ब्रेव्ह आणि वेल्स फायर यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात जेम्स विन्सने 26 चेंडूत 29 धावा करून फाफ डू प्लेसिसला मागे टाकले. आता तो या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, जिथे त्याच्या नावावर 6663 धावा आहेत. फाफ डू प्लेसिसचा विक्रम मोडला यापूर्वी, फाफ डू प्लेसिस कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. मेजर लीग क्रिकेट दरम्यान डू प्लेसिसने जुलैमध्ये विराट कोहलीला मागे टाकून हा विक्रम केला होता. तथापि, आता जेम्स विन्सने त्याचा विक्रम मोडला आहे आणि तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. विन्स आता टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 6663 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. या आकडेवारीसह, त्याला फाफ डू प्लेसिससोबत धावांमधील अंतर आणखी वाढवण्याची उत्तम संधी आहे, कारण त्याची टी-20 कारकीर्द अजूनही सुरू आहे. द हंड्रेड लीगमध्ये या हंगामात जेम्स विन्स सदर्न ब्रेव्हचे नेतृत्व करत आहे आणि या स्पर्धेत त्याचा अनुभव खूप मौल्यवान ठरत आहे. टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू जेम्स विन्स – 6663 धावा (206 डावांमध्ये) फाफ डू प्लेसिस – 6634 धावा (203 डावांमध्ये) विराट कोहली – 6564 धावा (188 डावांमध्ये) एमएस धोनी – 6283 धावा (289 डावांमध्ये) रोहित शर्मा – 6064 धावा (224 डावांमध्ये) जेम्स विन्सची कारकीर्द जेम्स विन्सची टी-20 कारकीर्द खूप यशस्वी झाली आहे. जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळताना त्याने अनेक विक्रम केले आहेत. आतापर्यंत विन्सने 449 सामने खेळले आहेत आणि 437 डावांमध्ये फलंदाजी करताना 32.11 च्या सरासरीने 12557 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने 7 शतके आणि 80 अर्धशतके देखील झळकावली आहेत, जी त्याच्या शानदार कारकिर्दीचे प्रतिबिंब आहेत.

The Hundred Tournament : इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास; धोनी-कोहलीला टाकले मागे Read More »

Donald Trump: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर 50% कर; व्हाईट हाऊसचा मोठा खुलासा

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध आणखी वाढू नये म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आर्थिक दबाव वाढवला असल्याचा खुलासा व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केला. व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेले शुल्क दुप्पट करून 50 टक्के केले आहे. रशियावर अतिरिक्त दबाव आणण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. लेविट यांच्या मते, भारतावर लादलेले हे आर्थिक निर्बंध अप्रत्यक्षपणे रशियावर परिणाम करतील आणि युद्ध संपवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा प्रयत्न ठरतील असे अध्यक्ष ट्रम्प यांचे मत आहे. पत्रकार परिषदेत कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, निर्बंधांचा उद्देश रशियावर आणखी दबाव वाढवणे आहे. राष्ट्रपतींनी हे युद्ध संपवण्यासाठी भारतावर दबाव आणला आहे. भारतावर निर्बंध आणि इतर पावले देखील उचलण्यात आली आहेत. कारण ट्रम्प यांनी स्वतः हे स्पष्ट केले आहे की त्यांना हे युद्ध संपवायचे आहे. झेलेन्स्की-ट्रम्प बैठक या निर्णयापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या दरम्यान झेलेन्स्कीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली. ट्रम्प यांनी ही बैठक यशस्वी झाली असे म्हटले, तर झेलेन्स्की म्हणाले की ही आतापर्यंतची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबतची सर्वोत्तम चर्चा होती. शांतता पुनर्संचयित करण्यावर ट्रम्प यांचा भर लेविट यांनी असेही म्हटले की ट्रम्प शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करून पुढे जाऊ इच्छितात आणि नाटो सरचिटरी जनरलसह सर्व युरोपीय नेते व्हाईट हाऊसमधून निघून गेले आहेत आणि हे एक उत्तम पहिले पाऊल आहे यावर सर्वजण सहमत आहेत. अमेरिका रशिया आणि युक्रेनसोबत एकत्र काम करत आहे कॅरोलिन लेविट यांनी आश्वासन दिले की अमेरिका रशिया आणि युक्रेन दोघांसोबत वाटाघाटीची प्रक्रिया पुढे नेत आहे. ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमुळेच युरोपीय नेते पुतिन यांच्याशी भेट झाल्यानंतर 48 तासांच्या आत व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. पुतिन-ट्रम्प बैठकीनंतर युरोपीय नेत्यांचा सहभाग लेविट म्हणाल्या की पुतिन आणि ट्रम्प यांच्या अमेरिकन भूमीवर झालेल्या भेटीनंतर 48 तासांच्या आत अनेक युरोपीय नेते व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. आणि पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर लगेचच या युरोपीय नेत्यांना देण्यात आलेली माहिती इतकी जलद होती की त्यातील प्रत्येकजण विमानात चढला आणि 48 तासांनंतर अमेरिकेला रवाना झाला.

Donald Trump: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर 50% कर; व्हाईट हाऊसचा मोठा खुलासा Read More »

jalna rainfall subsidy scam

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल

Jalna Rainfall Subsidy Scam : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अंबड पोलीस ठाण्यात 28 जणांविरुद्ध बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी परस्पर हडप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्तावेज तयार करून शासकीय निधीचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीसमोर आली आहे. तर दुसरीकडे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करणं बाकी आहे. प्रकरण काय? आरोपींनी 2022 ते 2024 दरम्यान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी राज्य सरकार कडून आलेला 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी बोगस खात्यात वळवून हडप केल्याचं चौकशी समितीच्या चौकशीत उघड झालंय. दरम्यान आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे गणेश ऋषींदर मिसाळ कैलास शिवाजीराव घारे विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर बाळु लिंबाजी सानप पवनसिंग हिरालाल सुलाने शिवाजी श्रीधर ढालके कल्याणसिंग अमरसिंग बमनावत सुनिल रामकृष्ण सोरमारे मोहित दत्तात्रय गोषिक चंद्रकांत तुकाराम खिल्लारे रामेश्वर नाना जाधव डिगंबर गंगाराम कुरेवाड किरण रविंद्रकुमार जाधव रमेश लक्ष्मण कांबळे सुकन्या श्रीकृष्णा गवते कृष्णा दत्ता मुजगुले विजय हनुमंत जोगदंड निवास बाबुसिंग जाधव विनोद जयराम ठाकरे प्रविण भाऊसाहेब शिनगारे बप्पासाहेब रखमाजी भुसारे सुरज गोरख बिक्कड सुशिल दिनकर जाधव (सहायक महसूल अधिकारी) वैभव विश्वंभरराव आडगांवकर (नेटवर्क इंजिनियर) विजय निवृत्ती भांडवले (तत्कालिन संगणक परिचालक) रामेश्वर गणेश बारहाते (महसूल सेवक) आशिष प्रमोदकुमार पैठणकर (सहायक महसूल अधिकारी) दिनेश बेराड (सहायक महसूल अधिकारी)

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल Read More »

Maharashtra Government: तरुणांनो इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Maharashtra Government: तरुण-तरुणींसाठी इस्त्राईल देशात “गृह-आधारित आरोग्य सेवा कर्मचारी” म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पाच हजार उमेदवारांना ही संधी मिळेल. इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले आहे. या नोकरीसाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात कौशल्य आणि अनुभव असणे महत्त्वाचे आहे. यासाठी भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त आणि किमान 990 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, नर्सिंग, फिजिओथेरपी, किंवा नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. जीडीए (GDA), एएनएम (ANM), जीएनएम (GNM), बीएससी नर्सिंग (B.Sc. Nursing), किंवा पोस्ट बीएससी नर्सिंग (Post B.Sc. Nursing) याशिवाय, उमेदवाराला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. या नोकरीसाठी दरमहा 1 लाख 61 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. निवड प्रक्रिया आणि सुविधा इस्त्राईलमध्ये नोकरी मिळवण्यासाठीची निवड प्रक्रिया महाराष्ट्रातच पार पडेल. यासाठी नियुक्ती, आरोग्य तपासणी, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत दिली जाईल. तसेच, इस्त्राईलमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय विमा, राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल. या संधीबद्दल अधिक माहिती https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असेही पंतम यांनी सांगितले.

Maharashtra Government: तरुणांनो इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शासकीय कर्मचारी या गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. तर दुसरीकडे कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत. तसेच रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.  

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »