DNA मराठी

ट्रेंडिंग

st co operative bank

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत. आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली.त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये अक्षरशा फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली. संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडला,कपडे फाडले,लाथा बुक्क्यांनी तुडवले. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशन पर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे. अशा संचालकांच्या हाती एसटी बँक देऊन एसटीचे सभासद आता पश्चाताप करत आहेत.

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस Read More »

img 20251015 wa0014

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी, वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊसतोड मजुरांच्या प्रलंबित विमा व मजुरीतील फरकाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. युनियनचे गहिनीनाथ थोरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनात या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १४ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फत २००३ पासून उसतोड कामगारांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत सुरू होता आणि त्यातून राज्यभरातील हजारो कामगारांना जवळपास १४०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, २०२२ नंतर शासनाने साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये दराने विमा कपात केली असून, सुमारे १७८ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु ही रक्कम विमा कंपनीकडे जमा न झाल्याने कामगारांना एकही लाभ मिळालेला नाही, असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. तसेच, ४ सप्टेंबर २०२४ रोजी उसतोड मजुरीत ३४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र अद्याप या वाढीचा फरक कामगारांना मिळालेला नाही. शासनाने विमा व मजुरी फरकाचा प्रश्न तातडीने सोडवून कामगारांचे देणे द्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत शासन, विमा कंपनी आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा संप अपरिहार्य होईल, असा इशारा थोरे पाटील यांनी दिला आहे. या संपामुळे ऊस तोडणी हंगाम ठप्प होण्याची शक्यता असून, सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही तर साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहू शकते, असा इशारा युनियनने दिला आहे.

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा Read More »

cidco lottery

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर

Devendra Fadnavis: दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगार मेळाव्यात देण्यात आलं होतं मात्र सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे. सिडकोच्या लॉटरीत 22 हजारपेक्षा जास्त घरे काढणार आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना ह्या घरांच्या किमती न परवडणाऱ्या असल्याने वारंवार किमती कमी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडल्याने नागरिकांचे स्वप्न भंग झालं असंच म्हणायला हवं.

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर Read More »

eknath shinde

Eknath Shinde: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; मिळणार 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान

Eknath Shinde: राज्यातील एसटीच्या 85 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला. एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या आणि कृती समितीच्या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Eknath Shinde: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; मिळणार 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान Read More »

mns

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी…

Raj Thackeray: पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाडिया कॉलेज परिसरात ABVP ने ‘बायकॉट मनविसे’ अशी पोस्टर्स लावल्याचा आरोप करत मनविसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या निषेधार्थ मनविसे कार्यकर्त्यांनी टिळक रोडवरील ABVP च्या पुणे कार्यालयावर धडक देत कुलूप ठोकले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार आंदोलन केले. मनविसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ABVP जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ABVP कार्यकर्त्यांनीही त्यांच्या बंद कार्यालयाबाहेर प्रतिउत्तरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुण्यात दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षाचे वातावरण चिघळले आहे. दरम्यान आता यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली असून पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती कृषिकेश रावले,पोलीस उपायुक्त झोन-1 यांनी दिली.

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी… Read More »

oplus 16908288

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

IMD Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता आहे. मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही काही भागात वातावरणात आर्द्रता आणि ढगाळपणा राहील त्यामुळे अचानक वादळी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात 18 ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके वाऱ्यापासून आणि पावसापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच उघड्यावर ठेवलेले धान, भुसा किंवा जनावरांचे खाद्य झाकून ठेवावे आणि हवामान खात्याच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता Read More »

ranji trophy

Ranji Trophy 2025 मुंबई संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफी 2025-26 साठी मुंबईने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मुंबईने मोठा निर्णय घेत अष्टपैलू शार्दुल ठाकूरकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. या रणजी ट्रॉफी हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने मुंबईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या, रहाणे आणि सरफराज खान यांनी खेळाडू म्हणून संघात स्थान निश्चित केले आहे. 42 वेळा विजेता मुंबई 15 ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी हंगामाच्या पहिल्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरचा सामना करेल. सरफराज व्यतिरिक्त, अष्टपैलू शिवम दुबेनेही मुंबई संघात स्थान निश्चित केले आहे. कार अपघातामुळे 2024-25 च्या स्थानिक हंगामातील बहुतेक खेळांना मुकावे लागलेल्या मुशीर खानलाही 16 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आयुष म्हात्रे, ज्याने अलीकडेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व केले होते, त्याला मुंबई संघात स्थान देण्यात आले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे रेड-बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यामुळे श्रेयस अय्यर मुंबई संघाचा भाग नाही. गेल्या हंगामात मुंबई संघात स्थान न मिळालेला पृथ्वी शॉ आता महाराष्ट्रात सामील झाला आहे. गेल्या हंगामात विदर्भाविरुद्ध रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीत खेळणारा सूर्य कुमार यादव देखील संघाचा भाग नाही. मुंबई संघ शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूझा, इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.

Ranji Trophy 2025 मुंबई संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत

Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे आता मार्गी लागणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार आहे.

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत Read More »

vivo v60e

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त…

Vivo V60e : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी एक जबरदस्त कॅमेरा फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी विवोने एक शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने Vivo V60e या नावासह भारतीय बाजारात 200 मेगापिक्सलसह स्मार्टफोन लॉन्च केलाय. कंपनीने दावा केला की हा 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला सर्वात परवडणारा फोन आहे. हा मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो सुरळीत कामगिरी आणि मल्टीटास्किंग करण्यास मदत करतो. किंमत आणि व्हेरियंट Vivo V60e तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. बेस मॉडेल 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो आणि त्याची किंमत ₹29,999 आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह दुसरा प्रकार ₹31,999 मध्ये उपलब्ध आहे. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह टॉप मॉडेलची किंमत ₹33,999 आहे. हा स्मार्टफोन एलिट पर्पल आणि नोबल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक ते Amazon, Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑर्डर करू शकतात. याव्यतिरिक्त, निवडक बँक कार्ड ऑफरवर 10% पर्यंत सूट उपलब्ध असेल. उत्कृष्ट डिस्प्ले आणि डिझाइन या फोनमध्ये 6.77-इंचाचा क्वाड कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1600 निट्स आहे, ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट होते. हे डायमंड शील्ड ग्लासने संरक्षित आहे, जे टिकाऊपणा वाढवते आणि स्क्रॅचची शक्यता कमी करते. कॅमेरा या फोनमध्ये 200 एमपी प्रायमरी सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ऑरा फ्लॅशसह 8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये फोटो आणि व्हिडिओ कॉलिटी वाढवणारी अनेक एआय फिचर्स आहेत. बॅटरी आणि चार्जिंग फोनमध्ये 90 वॅट फास्ट चार्जिंगसह 6500 एमएएच बॅटरी आहे. याचा अर्थ बॅटरी लवकर चार्ज होईल आणि दीर्घकाळ टिकणारा बॅकअप मिळेल. सॉफ्टवेअर आणि इतर फिचर्स विवो व्ही60ई हा अँड्रॉइड 15 वर आधारित आहे, ज्यामध्ये कंपनीने अनेक स्मार्ट आणि कस्टमाइज्ड फीचर्स जोडले आहेत. एकंदरीत, हा फोन स्टायलिश डिझाइन, शक्तिशाली कामगिरी आणि प्रीमियम कॅमेरा हवा असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त… Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले

Asaduddin Owais: अहिल्यानगर शहरात एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेपूर्वी पोलिसांनी खासदार ओवैसी यांना सभेसाठी काही अटी आणि शर्ती घातल्याने सभेत बोलताना ओवैसी यांनी फक्त मलाच लव्ह लेटर का? असा प्रश्न विचारत पोलिसांचा भरपूर समाचार घेतला. या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता येतो, जेव्हा ठाकरे गटाचा नेता येतो, जेव्हा आरएसएसची सभा असते आणि जेव्हा भाजपचा नेता येतो तेव्हा पोलीस त्यांना लव्ह लेटर देत नाही. फक्त आम्हालाच लव्ह लेटर मिळतो कारण पोलिसांना देखील माहिती मर्द फक्त एकच आहे. अश्या शब्दात खासदार ओवैसी यांनी पोलिसांचा समाचार घेतला. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मी भारताचा नेतृत्व दुसऱ्या देशामध्ये केलं. कतरचे एक शेख पॅलेस्टाईन संबंधी भारताविषयी बोलत होते तेव्हा माझ्या डेलिगेशनने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्या शेख ला उत्तर दिलं की भारतापेक्षा तर तुमचा हा कतर पॅलेस्टाईनच्या अगदी जवळ आहे मग तुम्ही का नाही पहिले मदत पोहोचवत आणि भारत याने आपला एक हिस्सा हा पॅलेस्टाईन साठी ठेवलेला आहे. असं मी कतर मध्ये भारताची साईट घेऊन सांगितलं आज मी भारतासाठी दुसऱ्या देशांशी लढत आहे तरी देखील जिथे मी जातो तिथे मला लव्ह लेटर दिला जातो आणि त्यात सांगितलं जातं की मी काय बोलावं आणि काय नाही ? बीजेपी पार्टीचे नेते येतात, शिंदे पार्टीचे नेते येतात, अजित पवार पार्टीचे नेते येतात तेव्हा त्यांना का हा लव्हलेटर दिला जात नाही. मी एकटाच मर्द पोलिसांना दिसतो का? आणि ज्या कलमान्वये मला हा लेटर देण्यात आला तो कलमला रद्द करण्यासाठी मीच 35 मिनिट सादनात भाषण केलं आहे. कदाचित पोलीस हे विसरले. पोलिसांनी दिलेला हा लव्ह लेटर मी रिजेक्ट करतो असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले Read More »