DNA मराठी

ट्रेंडिंग

affair

Panvel Crime : पत्नीशी अनैतिक संबंध अन् सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या

Panvel Crime: पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर 7 परिसरात सख्ख्या भावाने भावाचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ तपासादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृत दत्तु काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. म्हणून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दत्तु काळे यांचा मुलगा दिपक याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी नागेश काळे यास अटक करण्यात आली आहे.

Panvel Crime : पत्नीशी अनैतिक संबंध अन् सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या Read More »

modi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पूरग्रस्तांसाठी मागितली मदत

Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधीकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार करीत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली. गडचिरोली पोलाद सिटी गडचिरोली येथे पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून, हे स्टील ग्रीन स्टील असणार आहे. चीनपेक्षाही कमी किंमतीत हे स्टील उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीत सुमारे 1 लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक यापूर्वीच आलेली आहे. हा जिल्हा नक्षलमुक्त करुन विकासाच्या अमाप संधी यातून निर्माण होणार आहेत. 3 संरक्षण कॉरिडॉर संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र हा एक भक्कम भागिदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात 10 ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. भारताला लागणार्‍या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी 30 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात एक तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. यातील पहिला कॉरिडॉर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा कॉरिडॉर अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक-धुळे असा असेल. या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठा रोजगार सुद्धा निर्माण होईल. राज्य सरकारने यासंदर्भात 60,000 कोटींचे सामंजस्य करार यापूर्वीच केले आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पूरग्रस्तांसाठी मागितली मदत Read More »

asia cup 2025 final

Asia Cup 2025 Final : 41 वर्षांत प्रथमच, आशिया कपच्या फायनलमध्ये भारत – पाकिस्तान; कोण मारणार बाजी?

Asia Cup 2025 Final : आशिया कपच्या इतिहासात प्रथमच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात भिडणार आहे. सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने एकही सामना न गमावता फायनलमध्ये शानदार प्रवेश केला आहे. सुपर फोर टप्प्यात बांगलादेशला हरवून पाकिस्तानने आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सुपर फोरच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान तीन सामन्यांपैकी दोन विजय आणि एका पराभवासह दुसऱ्या स्थानावर आहे. अंतिम फेरीत पहिला सामना आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी, तीनपेक्षा जास्त संघांचा समावेश असलेल्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन्ही संघ पाच वेळा अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक उत्सव असेल. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना 25 सप्टेंबर रोजी सुपर 4 सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने आले. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या डावात 135 धावा केल्या. मोहम्मद हरिसने 23 चेंडूत 31 धावा केल्या, तर मोहम्मद नवाजने 25 धावा जडून संघाला चांगली सुरुवात दिली. लक्ष्य पाठलाग करताना बांगलादेश फलंदाजीत कमकुवत ठरला. सलामीवीर परवेझ हुसेन इमॉन शून्यावर बाद झाला, तर तौहिद हृदयॉयने फक्त पाच धावा जोडल्या. शमीम हुसेनने 30 धावा केल्या, परंतु संघ अखेर 124 धावांवर गुंडाळला गेला. पाकिस्तानने सामना 11 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

Asia Cup 2025 Final : 41 वर्षांत प्रथमच, आशिया कपच्या फायनलमध्ये भारत – पाकिस्तान; कोण मारणार बाजी? Read More »

shahrukh khan

Shahrukh Khan : शाहरुख खान विरोधात मानहानीचा खटला; समीर वानखेडे यांची हायकोर्टात धाव

Shahrukh Khan : समीर वानखेडे यांची नेटफ्लिक्सच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसिरीज विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. नेटफ्लिक्स आणि शाहरुख खान यांच्या रेड चिलीस इंटरटेनमेंटच्या विरोधात समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसिरीजमध्ये समीर वानखेडे यांच्याशी सबंधित पात्र दाखवून एनसीबी आणि त्यांची मानहानी केल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबरच त्या पात्राच्या तोंडून सत्यमेव जयते या डायलॉगनंतर आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याच म्हणत सत्यमेव जयतेची विटंबना केल्याचाही याचिकेत आरोप समीर वानखेडे यांनी केले आहे. जवळपास 2 कोटींची ही मानहानीची याचिका असून ती वसूल झाल्यास कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणार असल्याचे याचिकेत म्हणण्यात आलेल आहे.

Shahrukh Khan : शाहरुख खान विरोधात मानहानीचा खटला; समीर वानखेडे यांची हायकोर्टात धाव Read More »

buldhana

Buldhana News : आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा

Buldhana News : राज्यात सध्या मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. यातच आता हैदराबाद गॅझेटीयर आणि सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावा अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव, भगिनी, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. आपला पारंपारिक पोशाख, नृत्य आणि मागण्या संदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज, रायसिंग महाराज, समाजाचे नेते हरिभाऊ राठोड, संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला. ज्या पद्धतीने मराठा आंदोलनादरम्यान “एक मराठा लाख मराठा” असे घोषवाक्य पाहायला मिळाले, त्याच पद्धतीने “एक गोर, सव्वा लाखेर जोर” हे घोषवाक्य देखील पाहायला मिळालं. सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Buldhana News : आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा Read More »

maharashtra rain

Maharashtra Rain Alert : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा टाहो

Maharashtra Rain Alert: जालना जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेल्या सोयाबीन, मका, कपाशी या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके हे पूर्ण पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि या नुकसानीची पाहणी काल महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्या आदेशावरून अधिकारी जालना जिल्ह्यातील सामनगाव येथे शेत शिवारात आले असता, या अधिकाऱ्यांसमोरच एका वयोवृद्ध शेतकऱ्याने गुडघ्या इतक्याला पाण्यात बुडालेल्या सोयाबीनच्या शेतात बसून या अधिकाऱ्यांसमोर टाहो फोडला आहे व अधिकाऱ्यांना व सरकार आम्हाला वाचवा कारण आमचे पूर्ण पीके पाण्यात बुडाली आहे, कर्ज काढून आम्ही हे खरिपाचे पिके पेरणी केली आता काढणीला आली होती. मात्र, पूर्ण पिके गेली आहे, असा टाहो या शेतकऱ्याने फोडला. तर शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे. फक्त फसवे आश्वासन देऊ नका कृषी मंत्री काल आले व गेले त्यांनी ठोस भूमिका घेत तात्काळ आर्थिक मदत देण्याची घोषणा किंवा आदेश द्यायची होती. मात्र, तसे न करता त्यांनी आम्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत पंचनामे करण्याचे आदेश दिले असे म्हणत कृषीमंत्र्यावर सुद्धा शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संपूर्ण पीक पाण्यात बुडाली आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश वरिष्ठांच्या आदेशावरून आले असून आम्ही रितसर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहोत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Maharashtra Rain Alert : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा टाहो Read More »

team india

Asia Cup 2025 टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 41 धावांनी पराभव

Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ च्या फायनलमध्ये भारतीय संघाने शानदार एन्ट्री केली आहे. भारताने सुपर ४ च्या सामन्यात बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करत आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताच्या या विजयानंतर श्रीलंका अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील विजेता भारताविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर, बांगलादेशचा कर्णधार झहीर अलीने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाची सुरुवात पुन्हा एकदा स्फोटक झाली, अभिषेक शर्माने पाचव्यांदा २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक झळकावले. २० षटकांत, भारतीय संघाने ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. १६९ धावांच्या प्रत्युत्तरात, बांगलादेश १९.३ षटकांत १२७ धावांवर ऑलआउट झाला आणि सामना ४१ धावांनी गमावला. बांगलादेशची सुरुवात खराब १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बांगलादेशची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने तन्झिद हसनला १ धावात ४ बळी घेऊन बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना परवेझ हुसेन इमोनने सलामीवीर सैफ हसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. परवेझ २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर नियमित अंतराने विकेट पडल्या. सतत विकेट पडताना सलामीवीर सैफ हसनने ५१ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांसह ६९ धावा केल्या. सैफ आणि परवेझ व्यतिरिक्त, इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. संपूर्ण संघ १९.३ षटकांत १२७ धावांतच संपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली, ४ षटकांत १८ धावांत २ बळी घेतले. कुलदीप यादवने ४ षटकांत १८ धावांत ३ बळी घेतले आणि वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत २९ धावांत २ बळी घेतले. अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने सहा विकेट गमावून १६८ धावा केल्या. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली, त्यांनी ६.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. अभिषेक शर्माने ३७ चेंडूत ७५ धावा केल्या, ज्यात पाच षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. हार्दिक पंड्याने २९ चेंडूत ३८ धावा केल्या आणि गिलने १९ चेंडूत २९ धावा केल्या. शिवम दुबे दोन धावांवर बाद झाला, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने पाच आणि तिलक वर्मा पाच धावांवर बाद झाला. अक्षर पटेल १० धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून तन्झीम हसन सकीब, मुस्तिफुझ रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीनने प्रत्येकी एक बळी घेतला, तर रिशाद हुसेनने दोन बळी घेतले.

Asia Cup 2025 टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 41 धावांनी पराभव Read More »

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार

Sunil Tatkare : महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी मंत्र्यांसह पूरग्रस्त जिल्हयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत शिवाय नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले. दरम्यान शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य जनतेच्या दु:खाच्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगतानाच आगामी काळात आणखीही मदत व दिलासा देणार्‍या उपाययोजना जाहीर करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार Read More »

uddhav thackeray

Uddhav Thackeray: ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांना मदत करा; उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड,, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती. पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी , चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. अतिशय तुटपुंजी मदत दिली. शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला ही सरकार शेतकऱ्यांना देतंय पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत आहेत एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला सापत्न वागणूक देताय. साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सीएम आणि DCM ना वेळ नाही. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे आणि टेबल न्यूज तयार करणे सुरू आहे. कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता. जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार? केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावे शेतकऱ्यांच्या बाबतीतही पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. पहिल्यांदा छान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या. ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या.

Uddhav Thackeray: ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांना मदत करा; उद्धव ठाकरे Read More »

om raje nimbalkar

Om Raje Nimbalkar : खासदार ओम राजे निंबाळकर यांनी पुरामध्ये अडकलेल्या दहा जणांची केली सुटका

Om Raje Nimbalkar : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता रात्रीच्या अंधारात घरावर अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतल्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हणण्याची पाळी आली आहे. त्यांच्या या धाडस आणि तत्परतेमुळे 10 जणांचा जीव वाचला आहे. वडणेर ता. परांडा येथील पाण्यात अडकलेल्यांच्या बचाव कार्याचा रात्रीच्या अंधारातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात वाहत्या खोल पाण्यात सर्वात पुढे जाऊन, पाईप झाडात अडकवताना, दोर ओढताना धाराशिवचे खासदार निंबाळकर दिसत आहेत. 22 सप्टेंबर ची ही संध्याकाळ, रेस्क्यू केलेले 4 नागरिक आणि बचाव पथकातील 6 जणांसाठी काळरात्र ठरली असती. पण खासदार ओम राजेंनी गावातील तरुणांनासोबत घेऊन केलेलं धाडस आणि समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. सोमवार 22 सप्टेंबर संध्याकाळच्या 7 ते 8 च्या दरम्यानची ही घटना आहे. वडणेर (ता परांडा) येथील पाण्यात अडकलेल्या 4 जणांना घेऊन बचाव पथकाची बोट वापस निघाली होती. पण बोटीचे इंजिन प्रवाहात अचानक बंद पडले. त्यामुळे रेस्क्यू केलेले 4 जण आणि बचाव पथकातील 6 जणांना घेऊन निघालेली ही बोट पुराच्या प्रवाहात, पाण्याच्या वेगामुळे वाहत चालली. त्यावेळी तिथं एकच गोंधळ उडाला. पण त्याचवेळी तिथे बचाव कार्यात सहभागी असलेले खासदार ओम राजे निंबाळकर आणि स्थानिक युवकांनी क्षणाचाही विलंब न लावता वाहत्या पाण्यात उड्या मारल्या आणि दुसरा दोरखंड बोटीच्या दिशेने फेकून, वाहत जाणारी बोट एका झाडांला दोरखंडाने अडकवण्यात यश मिळवले. त्यानंतर दुसऱ्या दोरखंडाने बोट ओढून काढत मागील 24 तासापासून पाण्यात अडकलेल्या 4 जणांना आणि बचाव पथकातील 6 जणांना सुखरूप पणे बाहेर काढले. त्यामुळे खूप मोठी दुर्घटना टळली.

Om Raje Nimbalkar : खासदार ओम राजे निंबाळकर यांनी पुरामध्ये अडकलेल्या दहा जणांची केली सुटका Read More »