DNA मराठी

ट्रेंडिंग

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Maharashtra BJP :  आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या सहा महत्त्वाच्या विभागांसाठी नवीन समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि विभागवार कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही या नियुक्त्यांमागची मुख्य भूमिका आहे. या नव्या निवडीनुसार, मुंबई विभागाच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते मुंबई भाजप समन्वयक म्हणून काम पाहतीलच, शिवाय त्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाच्या समन्वयाचीही अतिरिक्त जबाबदारी असेल. ठाणे-कोकण विभागासाठी आमदार योगेश सागर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार प्रमोद जठार संयोजक म्हणून, तर संजय वाघुले सहसंयोजक म्हणून कार्यभार सांभाळतील.पश्चिम महाराष्ट्रात आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे समन्वयाची धुरा देण्यात आली आहे. त्यांना विक्रम पावसकर (संयोजक) आणि विक्रम देशमुख (सहसंयोजक) यांची साथ लाभणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या जबाबदारीत प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक समन्वयक असतील. त्यांच्या सोबतीला विजय चौधरी संयोजक म्हणून आणि आमदार मंगेश चव्हाण सहसंयोजक म्हणून काम पाहतील. मराठवाडा विभागासाठी प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या पथकात अ‍ॅड. नितीन काळे संयोजक, तर राहुल लोणीकर सहसंयोजक म्हणून कार्यरत राहतील. विदर्भासाठी आमदार संजय कुटे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, प्रा. दिनेश सूर्यवंशी संयोजक आणि आमदार प्रवीण दटके सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडतील. या सर्व नियुक्त्या 5 मे 2026 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांमुळे आगामी काळात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्यास आणि कार्यकर्त्यांचे जाळे अधिक घट्ट होण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय Read More »

img 20260506 wa0003

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात 3000 हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार Read More »

aditi tatkare

Aditi Tatkare : बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देऊ नका; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Aditi Tatkare : बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येवू नये, अशी तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना यासंदर्भात आवश्यक कायदेशीर तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून या पार्श्वभूमीवर, अशा गुन्ह्यांतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देण्यात येवू नये, अशी कायद्यात तरतूद करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाऊन व्यवस्थेबाबत विश्वास निर्माण होईल.महिलांच्या सुरक्षेबाबत कडक धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Aditi Tatkare : बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देऊ नका; मंत्री आदिती तटकरेंची मागणी Read More »

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार

Ahilyanagar Accident : काही कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील हे कुटुंब मुंबईच्या दिशेने जात असताना वैशाखरे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एसेटी बसशी त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात अविनाश रामचंद्र काकडे, अभिषेक भाऊसाहेब मोटे (दोघे रा. वडाळा, ता. नेवासा), निता अशोक धुरे आणि मीना कल्याण मडके (दोघी रा. भेंडा, ता. नेवासा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनिका अभिषेक मोटे, आराध्या अभिषेक मोटे, वेदांश अभिषेक मोटे आणि मनीषा रामदास बहक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिली. ‘कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. गेल्याच महिन्यात १३ एप्रिल रोजी रायते पुलावर झालेल्या अपघातात ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेला महिना उलटत नाही तोच आज पुन्हा चौघांचा बळी गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात कशामुळे झाला, नेमकी चूक कुणाची हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार Read More »

congress

Rahul Gandhi: काँग्रेसचे हिंदू उमेदवार मतदार नाकारतात? आसाम, केरळ आणि बंगालच्या निकालांनी उडवली झोप!

Rahul Gandhi: २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल केवळ काँग्रेसच्या पराभवाचे पुरावे नसून, पक्षाच्या सामाजिक ढासळत्या पायाचे सर्वात भीषण चित्र समोर आणणारे ठरले आहेत. आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमधील आकडेवारी पाहिली तर एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या राज्यांत हिंदू मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहेच, पण काँग्रेसने उभे केलेले हिंदू उमेदवारही सपशेल नाकारले गेले आहेत. जिथे काँग्रेसचे हिंदू उमेदवार निवडून आले आहेत, तिथेही त्यांच्या विजयाची दोरी ही ‘अल्पसंख्याक’ मतदारांच्या हातात असल्याचे दिसून येते. गौरव गोगोईंचा पराभव आसाममध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या, पण त्यातील १८ आमदार मुस्लिम आहेत. सर्वात मोठा धक्का म्हणजे आसाम काँग्रेसचे अध्यक्ष आणि पक्षाचा मुख्य चेहरा गौरव गोगोई यांचा स्वतःच्या हिंदू बहुल मतदारसंघातून झालेला पराभव. एकमेव हिंदू आमदार काँग्रेसचे एकमेव हिंदू आमदार प्रदीप सरकार हे अभयपुरी दक्षिण (Abhayapuri South) मतदारसंघातून निवडून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हा मतदारसंघ बोंगाईगाव जिल्ह्यात येत असून येथे मुस्लिम मतदारांची संख्या ६०% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या एकमेव हिंदू आमदारालाही निवडून आणण्यासाठी मुस्लिम मतदारांच्या कौलाची गरज भासली. तर दुसरीकडे जनेइया, धुब्री, जलेश्वर आणि गौरिपूर यांसारख्या पूर्णतः मुस्लिम बहुल (८०% हून अधिक लोकसंख्या) पट्ट्यातूनच काँग्रेसचे उर्वरित १८ उमेदवार विधानसभेत पोहोचले आहेत. केरळ: ‘ख्रिश्चन-मुस्लिम’ जोरावर विजय केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफ (UDF) ला ६३ जागा मिळाल्या असल्या तरी, विजयाचा चेहरा हिंदू उमेदवारांसाठी चिंतेचा आहे. ६३ पैकी ४६ ख्रिश्चन आणि १२ मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. तर ९२ पैकी तब्बल ८७ हिंदू मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे हिंदू उमेदवार सपशेल फेल ठरले आहेत. पक्षाचे केवळ ५ हिंदू आमदार विधानसभेत पोहोचू शकले. हिंदू मतदारांनी काँग्रेसच्या हिंदू उमेदवारांना डावलून एकतर डाव्या आघाडीला (LDF) किंवा भाजपच्या वाढत्या प्रभावाकडे कल दिला आहे. पश्चिम बंगाल: काँग्रेसचे अस्तित्व ‘मुर्शिदाबाद’पुरते मर्यादित बंगालमध्ये भाजपने २०६ जागांसह सत्ता मिळवली असताना, काँग्रेसच्या वाटेला आलेल्या २ जागांचे वास्तव अधिक दाहक आहे. राणीनगर (Raninagar) येथून काँग्रेसचे झुल्फिकर अली विजयी झाले आहेत. हा मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यात असून येथे मुस्लिम लोकसंख्या ८०% च्या आसपास आहे. फराक्का (Farakka) येथून काँग्रेसचे मोताब शेख विजयी झाले आहेत. येथेही मुस्लिम मतदारांचे प्रमाण ६८% हून अधिक आहे. हिंदू मतदारांचा ‘शून्य’ कौल: बंगालच्या हिंदू मतदारांनी काँग्रेसला पूर्णपणे नाकारले असून, पक्षाचा एकही हिंदू उमेदवार विधानसभेत पाय ठेवू शकलेला नाही.

Rahul Gandhi: काँग्रेसचे हिंदू उमेदवार मतदार नाकारतात? आसाम, केरळ आणि बंगालच्या निकालांनी उडवली झोप! Read More »

atul save osd

Atul Save OSD : पत्नीच्या खुनाचा प्रयत्न अन्मा मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर गुन्हा दाखल…

Atul Save OSD : पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरात कौटुंबिक वादातून गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न आणि मुलावर हल्ला केल्याच्या आरोपावरून एका शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. विजय धुलचंद कारंडे असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने (वय ३०) रविवारी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कारंडे हे मूळ नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत असून सध्या मुंबईतील मंत्रालयात मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, ३० एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या क्वीन्स गार्डन येथील घरात हा प्रकार घडला. पत्नीने कारंडे यांच्या मोबाईलमधील काही चॅट्सबाबत विचारणा करत पासवर्ड मागितल्याने वाद झाला. त्यातून संतापलेल्या कारंडे यांनी पत्नीला बॅटने मारहाण केली आणि तिचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या वेळी आईला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मुलावरही त्यांनी बॅटने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र प्रसंगावधान राखत संबंधित महिलेनं कारंडे यांना दूर ढकलले आणि मुलासह घराबाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. यानंतर महिलेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी विजय कारंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १०९(१) (खून करण्याचा प्रयत्न), ११८(१) (जाणीवपूर्वक दुखापत) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) यांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Atul Save OSD : पत्नीच्या खुनाचा प्रयत्न अन्मा मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर गुन्हा दाखल… Read More »

missing link

Missing Link : ‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची 24 × 7 नजर राहणार

Missing Link : यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक ( मिसिंग लिंक ) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनी रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंक अर्थात मिसिंग लिंकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे.तसेच बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे. सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Missing Link : ‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची 24 × 7 नजर राहणार Read More »

solapur triple murder

Solapur Crime: सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांड; जमीन वादातून आई, मुलगी आणि 17 वर्षीय मुलाचा तलवारीने खून

Solapur Crime: सोलापूर जिल्ह्यातील बोरामणीजवळील मस्के वस्तीत जमीन वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत आई, मुलगी आणि १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री मस्के (३६), त्यांची मुलगी प्रियंका मस्के (२०) आणि मुलगा शिवराज मस्के (१७) हे उन्हाळ्यामुळे घराच्या गच्चीवर झोपले होते. याचाच फायदा घेत मध्यरात्री अज्ञात हल्लेखोर गच्चीवर चढले आणि तिघांवर तलवारीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गायत्री आणि प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शिवराजने आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न करत हल्लेखोरांना प्रतिकार केला. मात्र हल्लेखोरांनी त्याच्या हातावर वार करत त्याचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी तो खाली पळाला, पण आरोपींनी त्याला घरात गाठून त्याच्यावर पुन्हा वार करत त्याचा खून केला. नेमकं कारण काय? प्राथमिक माहितीनुसार, मस्के कुटुंबाची सुमारे दीड एकर जमीन असून तिची किंमत अंदाजे ७५ लाख रुपये आहे. याच जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात गायत्री मस्के यांचा दीर पप्पू मस्के हा संशयित असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सोलापूर तालुका पोलिसांनी सहा पथके तयार केली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Solapur Crime: सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांड; जमीन वादातून आई, मुलगी आणि 17 वर्षीय मुलाचा तलवारीने खून Read More »

child marriages

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

Ahilyanagar News : महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण ९ बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. ३ मे २०२६ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत नगर शहरात ३, अकोल्यात १, राहुरीत १, श्रीगोंद्यात १, पाथर्डीत १, नेवाशात १ आणि नगर तालुक्यात १ असे एकूण ९ बालविवाह थांबविण्यात आले.या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश Read More »

acb

Pune ACB : पुणे पोलीस महिला API ला 28 लाखांसह रंगेहाथ पकडले; पोलीस दलात खळबळ

Pune ACB : पुणे पोलीस आयुक्तालयातच एका महिला अधिकाऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लाचलुपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक (API) वैशाली तोटेवार असे अटक करण्यात आलेल्या या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या पुणे शहर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. पोलिस आयुक्तालयाच्या आवारातच लाच स्वीकारताना त्यांना जेरबंद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात तोटेवार यांनी 28 लाख रुपयांची लाच स्वीकारली. मात्र ही लाच नेमकी कोणासाठी किंवा कोणत्या प्रकरणात घेतली जात होती, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. ACB कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, तोटेवार यांची नुकतीच मुंबई येथील लोहमार्ग विभागात बदली झाली होती आणि त्यांना कार्यमुक्त देखील करण्यात आले होते. असे असताना त्यांनी लाच स्वीकारल्याने संशय अधिक गडद झाला आहे. दरम्यान, ACB कडून आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune ACB : पुणे पोलीस महिला API ला 28 लाखांसह रंगेहाथ पकडले; पोलीस दलात खळबळ Read More »