Manoj Jarang Patil: छगन भुजबळ गोरगरीब ओबीसीला वेड्यात काढतायत; जरांगे पाटील पुन्हा आक्रमक
Manoj Jarang Patil: आमचा जीआर मागे घेतला तर 16 टक्के आरक्षणही मागे घ्या अशी मागणी करत छगन भुजबळ गोरगरिब ओबीसीला वेड्यात काढतायत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली आहे. जालन्यात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षण आम्ही लोकशाही मार्गाने मिळवलं काय करायचं ते करा. जर आमचा जीआर मागे घेतला तर 16 टक्के आरक्षणही मागे घ्या. 180 जातीच्या साडेचारशे जाती झाल्या कशा. तु काय कमी पुढारलेला आहे का? तुला अकलिचा भाग राहिला नाही. गोरगरिब ओबीसीला वेड्यात काढतो आहे. जातीय तेढ निर्माण करतायत भुजबळांवर गुन्हे दाखल करावे. ते काय मंत्रीमंडळ आहे का? त्यांला मंत्रीपद नव्हतं तर ते दिसले पण नाही आमच्या विरोधात कोर्टात गेले तर आम्ही सगळं बाहेर काढणार. ओबीसीच्या उपसमितीत एक पण मराठा नाही. सरळ सरळ जातीवाद आहे असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.