जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा; संतुलित आहारासाठी तज्ज्ञांची जनजागृती मोहीम
मुंबई – वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या तणावामुळे महाराष्ट्रात असंतुलित आहार ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. फास्ट फूड, प्रोसेस्ड पॅकेट खाण्याचे पदार्थ आणि जास्त तेलकट-गोड पदार्थ यांच्या खाल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोषणतज्ज्ञ आणि आरोग्य विभागाने नागरिकांना “जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा” असा सल्ला देत एक व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे जागृती करून जमत नाही तर आपण स्वत होऊन काही कर्तनही तोपर्यंत काही होत नसते. का आवश्यक आहे भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य? तज्ज्ञांच्या मते, हंगामी भाज्या व फळे यामध्ये विटामिन, मिनरल्स, फायबर मोठ्या प्रमाणात असते, जे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील सूज कमी करते. संपूर्ण धान्य – जसे की गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, ब्राउन राईस – यात ‘कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स’ आणि भरपूर फायबर असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवते व जास्त वेळ पोट भरल्याची भावना देते. महाराष्ट्रातील आहाराची चिंता नाशिक, पुणे, कोल्हापूर,मुंबई, अहिल्यानगर, नागपूरसारख्या शहरांत फास्ट फूड संस्कृती झपाट्याने वाढते आहे. ग्रामीण भागातसुद्धा पॅकेट नाश्ता, गोड पेये आणि पॉलिश केलेले तांदूळ यांचा वापर वाढतोय. परिणामी, पारंपरिक पौष्टिक अन्न – उदा. ज्वारीची भाकरी, भाजी, डाळ, ताक – हळूहळू आहारातून गायब होत आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन सरकारची भूमिका आरोग्य मंत्रालयाने शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत स्तरावर ‘आरोग्यदायी आहार’ जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे. यामध्ये पाककला स्पर्धा, आरोग्य शिबिरे, तसेच ‘संतुलित आहार’ विषयक कार्यशाळा आयोजित करण्याची तयारी आहे. विश्लेषण आहारातील बदल हा फक्त वैयक्तिक सवय नसून सार्वजनिक आरोग्य धोरणाचा भाग असावा लागेल. महाराष्ट्राला कुपोषणापासून स्थूलतेकडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य आपल्या ताटात नसेल, तर उद्या रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागतील.