सावेडी जमीनप्रकरणात खरेदीखत आणि दुरुस्तीवर संशय; तरीही खरेदीची तयारी?
अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi Land Scam – सावेडी येथील (जुना हाडांचा कारखाना) सर्वे नंबर २७९ व त्यानंतर वाटपानुसार २४५/ब/१ व २४५/ब/२ या जमिनींच्या खरेदी व्यवहारात कायदेशीर आणि तांत्रिक बाबतीत गंभीर विसंगती समोर येत असताना, अद्यापही जमीन खरेदीची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, मूळ खरेदीखत व त्यानंतर करण्यात आलेल्या ‘चूक दुरुस्ती लेखा’वर संशयाची छाया असूनही, ही प्रक्रिया राबवली जात असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात रमाकांत सोनावणे यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यावर प्रांत अधिकारी यांनी अप्पर तहशीलदार यांच्याकडे अवाहाल मागितलं होता त्यांच्या अवाहालानंतर या प्रकरणात जिल्हधिकारी यांच्याकडे अवाहाल देण्यात आलाय, अजून यावर निर्णयाय येणे बाकी आहे तरीही या प्रकरणात परीसमल मश्रीमल शहा यांच्यकडून खरेदी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. मग प्रश्न हा पडतो. खरेदीखत आणि दुरुस्तीवर संशय आहे तर मग खरेदी व्यवहार कसा. नियम डावलून सह दुय्यम निबधक खरेदी व्यवहार करणार का हा गंभीर प्रश्न पडतो. १. अहवालांची मालिका, पण कारवाई शून्य २. शेतजमिनीचा वापर, पण परवानगी नाही ३. खरेदीवेळी शेतकरी पुरावा कुठे? ४. मयत व्यक्तीच्या नावावर खरेदीखत? ५. चूक दुरुस्ती लेख ‘अचानक’ सादर ६. कागदपत्रे गायब – हे फक्त योगायोग? ठळक मुद्दा: “खरेदीखत आणि चूक दुरुस्ती यावर गंभीर संशय असूनही, जमीन खरेदी पुढे रेटली जात आहे, ही बाब केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेची नव्हे, तर त्याच्या भूमिका संशयास्पद ठरणारी आहे.” ७. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा सावेडी प्रकरणात निव्वळ दस्तऐवजातील “कारखाना” शब्दाचा गैरफायदा घेत, बिगरशेतीचा बनावट वापर, शेतकरी नसताना जमीन खरेदी, आणि मयत व्यक्तीच्या नावावर नोंदणी हे सर्व प्रकार समोर येत असताना, संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई न करता ‘संशयास्पद’ वर्तन दाखवले आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार नव्या चौकशीचा विषय ठरू शकतो.
सावेडी जमीनप्रकरणात खरेदीखत आणि दुरुस्तीवर संशय; तरीही खरेदीची तयारी? Read More »









