DNA मराठी

क्राईम

sawedi land scam – documents missing, investigation continues, yet the buying and selling game continues; muhurat tomorrow

Sawedi land scam – दस्तावेज गायब, चौकशी सुरूच, तरीही खरेदी विक्रीचे खेळ सुरू; उद्या मुहूर्त

Sawedi land scam – अहिल्यानगर – सावेडी येथील गट क्रमांक 245 ब/1 मधील तब्बल बहात्तर गुंठे जमिनीच्या मालकीबाबत गंभीर गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या जमिनीवर अद्याप सातबारा उताऱ्यावर साजिद डायाभाई व अजिज डायाभाई यांचीच नावे आहेत. नुकतीच त्यांच्या वारसांनी वारस नोंदणीसाठी अर्ज दाखल केला असतानाच, त्याची नोंद पूर्ण होण्याआधीच खरेदी-विक्रीचे प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याच प्रकरणाशी संबंधित सूची क्रमांक 2 वरून खरेदीचे डावपेच रचले जात असल्याचे समोर येत असून, सर्वे नंबर 245 ब/2 संदर्भातील सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. यामध्ये प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयाने काही महत्त्वाचे दस्तावेज गायब असल्याचे लेखी मान्य केले असतानाही त्याबाबत कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही. तरीदेखील या संशयित जमिनीच्या खरेदी-विक्रीचे प्रयत्न सुरू असल्याने निबंधक कार्यालयाच्या भूमिकेवर संशय अधिकच गडद झाला आहे. सावेडीतील सर्वे नंबर 245 ब/1 (72 गुंठे) आणि 245 ब/2 (63 गुंठे) या दोन गटांबाबत अद्याप कोणताही प्लॅन मंजूर नाही. तरी 72 गुंठ्याची विक्री करण्याचे प्रयत्न सुरू असून, 63 गुंठ्याची जागा ॲमेनिटी व ओपन स्पेस म्हणून दाखवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. एवढ्या मोठ्या भूखंडाच्या व्यवहारावर सुनावणी सुरू असतानाही विक्रीची घाई का, असा सरळसरळ प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक वेळ काढूनपणा करून संशयास्पद खरेदीखताला वैधतेची छत्रछाया मिळवून देण्याचे डावपेच रचले, अशी चर्चा परिसरात आहे. विशेष म्हणजे 1990 ते 1993 या कालावधीतले महत्त्वाचे दस्तावेज रेकॉर्ड रूममधून गायब झाल्याचेही पुढे येत असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणात निबंधक कार्यालयाचा संशयास्पद कारभार उघड झाला असून, त्यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, हा प्रश्न शेतकरी व नागरिक विचारत आहेत. याबाबत सखोल चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तीव्र स्वरूपात केली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या जमिनीवरील संशयास्पद व्यवहार रोखले नाहीत, तर सावेडीतील भूखंड प्रकरण हा नगर जिल्ह्याचा आणखी एक गाजणारा घोटाळा ठरेल, यात शंका नाही. आणि याचा परिणाम येणाऱ्या कळात अहिल्यानगर मधील इतर जागेंचा विषय गंभीर होणारा आहे.

Sawedi land scam – दस्तावेज गायब, चौकशी सुरूच, तरीही खरेदी विक्रीचे खेळ सुरू; उद्या मुहूर्त Read More »

Solapur Crime : धक्कादायक, प्रेमसंबंधातून तरुणाने स्वतःवर घेतली गोळी झाडून

Solapur Crime : बार्शी तालुक्यातील सासुरे गावात एका कारमध्ये तरुणाचा गोळ्या झाडून स्वतः ला संपावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधातील वादातून ही धक्कादायक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, मृत तरुणाच्या नातेवाईकांची चौकशी तसेच घटनास्थळी सापडलेल्या शस्त्रच्या तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्राम पोलिस पाटील यांनी याबाबत वरा पोलिसांना माहिती दिली की, गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक लाल रंगाची कार बराच वेळ बंद अवस्थेत उभी आहे. कार पूर्णपणे लॉक असून, आत एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत आहे. कारच्या बाजूलाच पिस्तूल पडलेले असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक गावडे, एपीआय जगदाळे यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख गोविंद जगन्नाथ बरगे (रा. मसला, ता. गेवराई, जि. बीड) अशी पटली. चौकशीत समोर आले की, गोविंद बरगे आणि प्रशांत गायकवाड यांची बहीण पूजा यांच्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.मात्र अलीकडेच हे संबंध बिघडल्याने वाद सुरू होता. नातेवाईकांकडून डुप्लिकेट चावी मागवून कार उघडण्यात आली.आत गोविंद बरगे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत होता. त्याच्या डोळ्या कानाजवळ गोळ्यांच्या दोन जखमा होत्या.गोळ्या आरपार गेल्याने अगदी जवळून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. या प्रकरणाचा तपास एपीआय जगदाळे करीत आहेत. पिस्तुलावरील परवाना आहे की नाही, याची तपासणी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची व गायकवाड कुटुंबीयांची चौकशी केली आहे. प्रेमसंबंध तुटल्याने वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असला तरी इतर सर्व शक्य कोनातून तपास सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले. डीवायएसपी सायकर म्हणाले, “प्रेमसंबंधातील वादामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे; मात्र आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.” सध्या कोणालाही अटक झालेली नाही. बार्शी पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन अशोक सायकर उपविभागीय पोलीस अधिकारी,बार्शी यांनी केले आहे.

Solapur Crime : धक्कादायक, प्रेमसंबंधातून तरुणाने स्वतःवर घेतली गोळी झाडून Read More »

beed

Beed News: बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक प्रताप, शिक्षा झालेल्या कैद्याकडून करून घेतले वैयक्तिक कामे

Beed News : बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एकेक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट, अनाधिकृत वृक्षतोड, यानंतर आता शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेलरचे वाहन धुतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून घरातील कामे, वाहनही धुवून घेतले असल्याचे उघड झाले आहे. त्याचाच एक व्हिडिओ समोर आला असून कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेतल्याने गायकवाड अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही गायकवाड यांचे जळगावला असताना निलंबन झाले होते. कैद्यांचे हक्क आणि संरक्षणाचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Beed News: बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक प्रताप, शिक्षा झालेल्या कैद्याकडून करून घेतले वैयक्तिक कामे Read More »

Mumbai Crime: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: चोरट्यांच्या टोळीला गजाआड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मुंबई रेल्वे पोलिसांनी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांच्या बॅगा फाडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३१५.४६० ग्रॅम सोनं, रोकड अशा मिळून तब्बल २२ लाख २४ हजार ७६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीनंतर युनिट -३ गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांचा पद्धतशीर अभ्यास करून दोन आरोपींना अटक केली. वकार आलम तौकीर खान आणि जुगल किशोर ओमप्रकाश विश्वकर्मा या दोघांना कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून पकडण्यात आले असून चौकशीत त्यांनी साथीदारांसह गुन्ह्यांची कबुली दिली. या कारवाईमुळे कल्याण, कर्जत, डोबिवली आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील १६ प्रकरणांचा उलगडा झाला असून आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असल्याची माहिती विवेक कलासागर पोलीस आयुक्त GRP मुंबई यांनी दिली आहे.

Mumbai Crime: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई: चोरट्यांच्या टोळीला गजाआड, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

sawedi land case lost documents manipulation controversy and suspicious dealings

सावेडी जमीन प्रकरण: दस्तावेज हरवले, फेरफार वाद, आणि संशयास्पद कारभार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – सावेडी जमीन प्रकरणात अतिशय महत्त्वाचे दस्तावेज हरविल्याची कबुली नोंदणी विभागाने दिली असतानाही त्यावर आजपर्यंत कोणतीही गुन्हेगारी कारवाई झालेली नाही. उलट दुसऱ्या एका अर्जावर तातडीने कार्यवाही करून खालच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यामुळे “दस्तावेज हरविले आहेत, मग त्यावर कारवाई किवा गुन्हा का दाखल होत नाही?” हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. दस्तावेज हरवल्याचे पत्र, पण कारवाई शून्य सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर क्र.1 यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार 15/10/1991 रोजी झालेल्या दस्त क्रमांक 430/1991 संदर्भातील अभिलेख (खंड क्र.196) कार्यालयात आढळला असला तरी त्या दस्तावेजाशी संबंधित अन्य नोंदी जसे की सूची, अंगठे पुस्तक, पावती पुस्तक, डे-बुक इत्यादी अद्यापपर्यंत उपलब्ध नाहीत. त्यामुळे “हा दस्त प्रत्यक्षात नोंदवला गेला होता की नाही” याबाबत स्पष्ट अहवाल देणे शक्य नाही, असे पत्रातून नमूद करण्यात आले आहे. दुसऱ्या पत्रावर मात्र तातडीची कार्यवाही याउलट पारसमल मश्रीमल शाह यांच्या तर्फे दाखल केलेल्या अर्जावर (दि. 14/08/2025) सह जिल्हा निबंधक वर्ग-1 यांनी नोंदणी अधिनियम 1908 व महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 अन्वये तातडीने कारवाईसाठी पत्र पुढे पाठवले. यामुळे प्रकरणातील दुहेरी निकष ठळकपणे समोर आले आहेत. मूळ प्रश्न – गुन्हा का नाही दाखल? महत्त्वाचे दस्तावेज हरवल्याचे स्पष्ट असूनही त्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात आलेली नाही, याबाबत प्रशासन मौन बाळगत आहे. जमीन व्यवहारासारख्या गंभीर प्रकरणात दस्तावेज हरवणे ही मोठी गुन्हेगारी बाब असताना गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ पत्रव्यवहारावरच प्रकरण थांबले आहे. सावेडी जमीन प्रकरण आणि वरिष्ठांचे लागेबांधे सावेडी येथील सर्वे नंबर 245/2 मधील फेरफार व खरेदीखत प्रकरणात कुळकायद्याचा भंग करून बेकायदेशीररीत्या फेरफार करण्यात आल्याचे आरोप आहेत. मात्र, या प्रकरणाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळे पीडितांना न्याय मिळेल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. फेरफारातील विसंगती आणि संशय – रिव्हिजनम कि पुनर्विलोकन सावेडी येथील गट क्रमांक 225/2 व फेरफार क्रमांक 63107 या प्रकरणावरून सध्या चर्चा सुरू आहे. महसूल विभागातील दप्तर पाहता आणि खरेदी खताचा दस्त तसेच चूक दुरुस्ती यामधील विसंगती पाहता हा फेरफार चुकीचा असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याबाबत तत्कालीन तलाठी अधिकारी प्रमोद गायकवाड आणि तत्कालीन प्रभारी ग्राम महसूल अधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांनी चुकीच्या पद्धतीने भरलेला फेर रद्द करण्याचा अभिप्राय देत पुनर्विलोकन घेण्याचे मत नोंदवले आहे. तरीदेखील हे प्रकरण रिव्हिजनमध्ये घेण्यासाठी प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांनी सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीसाठी अब्दुल अजीज डायाभाई यांनाही पत्र पाठवले गेले आहे. प्रत्यक्षात पुनर्विलोकन करून तातडीने फेर रद्द करता आला असता, मात्र समोरच्यांना वेळ देण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात असल्याची चर्चा जोर धरत आहे. पुढील कार्यवाहीवर लक्ष नोंदणी व मुद्रांक विभाग, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथून जारी केलेल्या अधिकृत पत्रव्यवहारामुळे या प्रकरणातील दस्तावेज हरविल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या बाबतीत कायदेशीर चौकशी होऊन दोषींवर गुन्हा दाखल होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावेडी जमीन प्रकरण: दस्तावेज हरवले, फेरफार वाद, आणि संशयास्पद कारभार Read More »

sawedi land scam. a haven for fake documents, and a web of aadhaar document fraud.

बनावट दस्तांचे माहेरघर, आणि आधार–दस्त फसवणुकीचे जाळे.

अहिल्यानगर – अहिल्यानगर हे संशयास्पद मृत्युपत्र, खरेदीखत, साठेखत यांसारख्या बनावट दस्तनिर्मितीचे मोठे माहेरघर म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. गेल्या काही दशकांपासून येथे भूमाफियांचे जाळे रुजले आहे. विशेषत: 1990 ते 1993 या काळात पुणे व नगर जिल्ह्यातील अनेक प्रकरणांमध्ये अशा दस्तांची निर्मिती झाल्याचे पुढे आले आहे. अलीकडेच सावेडी जमीन खरेदी व्यवहाराच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा ठळक झाला आहे. सावेडी जमीन प्रकरणात आजही अशी अधिकारी बनावट दस्त खरा कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण कुठल्याही परिस्थितीत जमिनीची विक्री व्हावी, या मतावर माफिया आणि कनिष्ठ अधिकारी यांचे ठाम दिसत आहे. कारण समोर दस्तावेज बनावट आणि चुकीचे झालेलं असलेल्याच माहित असूनही त्यावर नैसर्गिक न्याय” (Natural Justice) दिला पाहिजे म्हणत वेळ काढण्याचे काम सुरु आहे,  हा प्रकार केवळ प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे करणारा नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारा आहे. या फसवणुकीचा पॅटर्न जवळजवळ एकसारखाच. प्रॉपर्टीचा खरा मालक मृत्युमुखी पडल्यानंतर अचानक एखादं मृत्युपत्र वा खरेदीखत बाहेर काढलं जातं. साक्षीदार म्हणून उभे राहणाऱ्यांचा त्या मालमत्तेशी काहीही संबंध नसतो. बनावट आधार कार्डे व ओळखपत्रे जोडली जातात आणि दस्तांना वैधतेचा आव आणला जातो. या प्रक्रियेत दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचारी व तथाकथित वकिलांच्या हाताखाली काम करणारे स्वयंघोषित वकील यांच्या संगनमताने काम करत असल्याचा संशय अधिक गडद होत आहे. यामध्ये प्रमुख कारण पुढे येते ते म्हणजे आधार कार्ड. आपण आधारला राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून स्वीकारले आहे. कुठलाही व्यवहार तो नसताना होत नाही. परंतु बनावट आधार तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूदच नाही. इतक्या महत्त्वाच्या कागदपत्राला राष्ट्रीय ओळख मानून जर त्याचं बनावट स्वरूप ग्राह्य धरलं जात असेल, तर ती देशाची व नागरिकांची फसवणूकच ठरते. दुर्दैव म्हणजे, आधारसारख्या कागदपत्रावर मोठ्या शिक्षा होत नाहीत. अहिल्यानगरमधील वास्तव तर आणखीच धक्कादायक आहे. येथे अनेक आधार केंद्रांच्या काही मालकांवर अधिकाऱ्यांचे बनावट सही व शिक्के तयार करण्याचे गंभीर गुन्हे दाखल असूनही त्यांच्याकडेच आधार केंद्रांची जबाबदारी सोपवली जाते. महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याने ही केंद्रे अजूनही सुरू आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वा बनावट दस्तनिर्मितीत अडकलेल्या व्यक्तींना आधारसारख्या संवेदनशील जबाबदाऱ्या देणे हे दुर्दैवीच नव्हे, तर थेट लोकांच्या विश्वासघाताचे प्रतीक आहे. म्हणूनच अशी मागणी पुढे येत आहे की, अशा व्यक्तींना आधार केंद्र चालवण्याची परवानगी दिलीच जाऊ नये. या कारवायांचा बळी ठरतो तो सर्वसामान्य माणूस. न्यायालयीन प्रक्रिया वर्षानुवर्षे लांबत राहते; निकाल लागेपर्यंत दोन पिढ्या संपतात. शेवटी मूळ मालकाला तडजोड करूनच जगावं लागतं. या गुन्ह्यांत रक्तपात नसतो; पण कागदोपत्री फसवणूकही तेवढीच जीवघेणी ठरते. आजची मोठी गरज म्हणजे या “व्हाईट कॉलर क्राईम”वर कठोर अंकुश. केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही; तर विशेष कायदेशीर तरतुदी करून बनावट दस्त व बनावट आधार करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. दस्त पडताळणी व आधार पडताळणी अधिक पारदर्शक व डिजिटल केली, तर फसवणुकीची शक्यता कमी होऊ शकते. अन्यथा, अहिल्यानगरासारखी ठिकाणे पुढेही “व्हाईट कॉलर माफियांचे माहेरघर” ठरत राहतील.

बनावट दस्तांचे माहेरघर, आणि आधार–दस्त फसवणुकीचे जाळे. Read More »

savedi land scam order on dhaba – revenue, guardian minister sir when will action be taken

नियम धाब्यावर – महसूल, पालकमंत्री साहेब कारवाई कधी?

Sawedi Land Scam – अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील मौजे सावेडी येथील स. नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या प्रकरणाने गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रमाकांत सोनवणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी चौकशी सुरू केली. सुनावणी प्रलंबित असतानाही व्यवहार खुला करण्याचा प्रयत्न झाल्याने बनावट दस्त वैध ठरवण्याचा संशय निर्माण झाला आहे. अधिकारी व प्रशासनाची भूमिका सदर प्रकरणात सावेडी सर्कल अधिकाऱ्यांनी वारसांना नोटिसा बजावल्या. सह-दुय्यम निबंधकांनी सुनावणी संपेपर्यंत व्यवहार थांबविण्याचे पत्र दिले. हा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 154 व 157 नुसार योग्य होता. कारण: मात्र, याच प्रक्रियेत अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांनी अचानक १४ ऑगस्ट रोजी व्यवहार खुला करण्याचे पत्र दिले. हा निर्णय कायद्याच्या तरतुदींशी विसंगत आहे. बनावट दस्ताचा संशय १४ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांकडे अर्ज गेला, त्याच दिवशी अप्पर तहसीलदारांचे पत्र! ही वेगवान कारवाई केवळ सामान्य व्यवहार नाही. यात बनावट दस्त कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न होता का? असा संशय निर्माण होतो.सामान्य नागरिकाला वर्षानुवर्ष फेरफारासाठी दार ठोठवावे लागते. पण येथे एका दिवसात पत्र – यामागे संशयास्पद संगनमत असल्याशिवाय हे शक्य नाही. अशी चर्चा आहे. महसूल विभागातील दुटप्पी भूमिका महसूल विभागाने स्वतःचेच पत्र नाकारून संशयित बनावट दस्त वैध ठरण्याचा मार्ग खुला केला. यावरून स्पष्ट होते की, कायद्याचे पालन न करता प्रशासकीय आदेश “व्यक्तिगत फायद्यासाठी” बदलले गेले.हे वर्तन केवळ गैरसोयीचे नाही तर कलम 165 (महसूल अधिकार्‍याची जबाबदारी) व कलम 174 (फसव्या नोंदींसाठी शिक्षा) यांचा भंग करणारे आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची भूमिका प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीस आहे. पालकमंत्र्यांनी खुलासा मागितला होता. पण त्यावर अद्याप निर्णय नाही. आश्चर्य म्हणजे—जिल्हाधिकारी व पालकमंत्री मौन बाळगतात, आणि अप्पर तहसीलदार एका दिवसात पत्र  देतात!यातून असा संशय निर्माण होतो की, वरिष्ठांना बगल देऊन बनावट दस्ताला आधार देणे हेच या घाईगडबडीचे खरे उद्दिष्ट होते. लोकशाही व कायदा धोक्यात कायद्याचे तत्त्व सरळ आहे – “जेव्हा जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी सुरू आहे, तेव्हा स्थिती कायम ठेवावी.” (कलम 157). पण या प्रकरणात उलटच घडले.सर्वसामान्य माणसाला नियमांचा डोंगर, पण काहींना बनावट दस्तासह एकाच दिवशी आदेश किवा पत्रहे केवळ भ्रष्टाचार नाही, तर कायद्याच्या राज्यावर थेट आघात आहे. निष्कर्ष – चौकशीची तातडीची गरज सावेडीतील हे प्रकरण केवळ फेरफाराची चूक नाही. हा प्रकार म्हणजे बनावट दस्त कायदेशीर ठरवण्याचा धाडसी प्रयत्न आहे. महसूलमंत्री आणि पालकमंत्री यांनी याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अपरिहार्य आहे. अन्यथा, अशा निर्णयांनी नागरिकांचा महसूल खात्यावर व न्यायव्यवस्थेवर विश्वास उडेल. 1. मंडळ अधिकाऱ्यांचे अधिकार 2. स्थिती कायम ठेवा, आदेश का देता येतात? 3. मंडळ अधिकाऱ्यांचे पत्र कायदेशीर का? 4. अप्पर तहसीलदारांचा विरोध चुकीचा का? थोडक्यात *मंडळ अधिकारी सुनावणीदरम्यान “नवीन व्यवहार होऊ नयेत” असे पत्र निबंधकांना देऊ शकतात. *कारण तो आदेश कलम 157 च्या आत्म्याशी सुसंगत आहे. *उलट, अप्पर तहसीलदारांनी ते पत्र रद्द करून व्यवहार मोकळे केले, ही कृती कायद्याच्या विरोधात जाते. मंडळ अधिकाऱ्यांचे पत्र पूर्णपणे कायदेशीर होते, पण अप्पर तहसीलदारांचे पत्र हा कलम 157 आणि Status Quo या तत्त्वांचा भंग आहे. आज प्रश्न एकच – बनावट दस्ताचा खेळ थांबवणार कोण? महसूल साहेब, पालकमंत्री साहेब… कारवाई कधी?

नियम धाब्यावर – महसूल, पालकमंत्री साहेब कारवाई कधी? Read More »

img 20250830 wa0020

Ahilyanagar Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 120 किलो गांजा जप्त

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ओडीसा राज्यातुन विक्री करता आणलेला 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464 रुपये किंमतीचे मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवुन अंमली पदार्थ विक्री व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोनि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांचे दोन विशेष पथकांनी ही कारवाई केली आहे. 29 ऑगस्ट 2025 रोजी पोनि. किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसमांनी ओडीसा राज्यातुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन त्यांचा हस्तक नवनाथ अंबादास मेटे रा. श्रीगोंदा व नवनाथ मेटे याचा एक साथीदार यांचेकडील ट्रक क्रमांक एम.एच. 14 जी. यु. 2111 हिमध्ये भरुन विक्री करण्याकरीता आणलेला असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कबाडी यांनी छाप्याचे नियोजन करुन वरील पथक, अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टिम सह शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. जाणारे रोडवर वडगांव गुप्ता गावचे शिवारातील हॉटेल किनाराजवळ सापळा रचुन थांबले असता बातमीतील ट्रक येतांना दिसल्याने नवनाथ अंबादास मेटे (वय 38 वर्षे, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय 31 वर्षे, रा. मळेगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे ताब्यातील ट्रकची पंच, फॉरेन्सिक टिम यांचे मदतीने झडती घेतली असता ट्रकचे केबीनवरील टपावर 6 गोण्यामध्ये 30,22,625-रुपये किमतीचा 120 किलो 905 ग्रॅम गांजासह एकुण 80,83,464 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 120 किलो गांजा जप्त Read More »

img 20250830 wa0006

Sawedi Land Scam : “पालकमंत्रीही थांबले, जिल्हाधिकारीही थांबले… पण अप्पर तहसीलदार धावले!”

Sawedi Land Scam : ” सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या वादग्रस्त प्रकरणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले चौकशी करा, जिल्हाधिकारी यांच्याकडेही चौकशी सुरू असताना अप्पर तहसीलदार यांनी मात्र निबंधकार्यालयाला पत्र देऊन टाकले, याचा अर्थ पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही मोठे पद अप्पर तहसीलदारांचे आहे का? अहिल्यानगर – शहरातील सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या वादग्रस्त प्रकरणाने महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सुनावणी प्रलंबित असताना व्यवहार थांबवण्याचे आदेश सह निबंधकांनी दिले होते. मात्र, आश्चर्यकारक घडामोडीत याच प्रकरणात अप्पर तहसीलदारांनी एका दिवसात उलट पत्र काढत व्यवहार सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनाही जे जमले नाही, ते अप्पर तहसीलदारांनी करून दाखवल्याने या प्रकरणामागे ” ₹” प्रभाव आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहेत. मौजे सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या प्रकरणाने जिल्हा प्रशासन आणि महसूल खात्याच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तक्रारदार रमाकांत सोनवणे यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुढे सरकले. कायद्याने सुनावणी सुरू असताना संबंधित जमिनीवर कुठलेही व्यवहार होऊ नयेत, असा नियम असतानाही व्यवहार रोखण्याऐवजी वेगळ्याच दिशेने हालचाली झाल्याने प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांविषयी संशय गडद होत आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सुरुवातीला याबाबतचा अहवाल अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांच्याकडे मागवला. त्यांनी तो सावेडी सर्कल अधिकाऱ्यांकडे पाठवून, वारस व इतर भागधारकांना नोटिसा बजावल्या. यानंतर सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर यांनी सुनावणी संपेपर्यंत कोणताही खरेदी-विक्री व्यवहार नोंदवू नये, असे स्पष्ट पत्र जारी केले. कायद्याच्या दृष्टीने ही भूमिका योग्य ठरत होती. मात्र, या पत्रामुळे नाराज झालेल्या पारसमल मश्रीमल शहा यांच्या वतीने गणेश शिवराम पाचर्णे यांनी उलट मागणी पुढे केली. अप्पर तहसीलदारांनीच अहवाल तयार करावा, असा आग्रह धरला. यानंतर प्रांत अधिकारी स्तरावर हा अहवाल पोहोचण्यास जाणीवपूर्वक 15 ते 20 दिवस उशीर लावण्यात आला, त्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी तो अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला आणि सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. याच दरम्यान पाचर्णे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली. पालकमंत्र्यांनी खुलासा मागवला, मात्र त्यावर कुठलीही सुनावणी झाली नाही. पण आश्चर्याची बाब म्हणजे, 14 ऑगस्ट रोजी पाचर्णे यांनी अप्पर तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांनी उपनिबंधकांना पत्र पाठवले. या पत्रात महसूल विभागाला खरेदी-विक्री थांबविण्याचा अधिकार नाही, तो फक्त दिवाणी न्यायालयाचा आहे, असे नमूद करण्यात आले. त्यामुळे या पत्राचा अर्थ असा निघतो की यावर खरेदी विक्री करण्यास कुठलाही अडचण महसूल ची नाही असे स्पष्ट होते, यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली की, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना जे जमले नाही ते अप्पर तहसीलदारांनी एका दिवसात कसे केले? सामान्य माणसाला साध्या पत्रासाठी महिनोन्‌महिने चकरा माराव्या लागतात, पण सावेडीच्या या वादग्रस्त जमिनीवर मात्र एका दिवसात अर्ज, त्यावर निर्णय आणि आदेशही निघाला. हा वेग “…₹….” (गाळलेली जागा तुम्ही भरा) च्या जोरावर आला की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. सावेडी सर्कल अधिकाऱ्यांनी दिलेले पहिले पत्र कायदेशीरदृष्ट्या अधिक भक्कम होते. कारण सुनावणी सुरू असताना कोणताही व्यवहार न होणे, हा कायद्याचा गाभा आहे. मात्र, अप्पर तहसीलदारांच्या तातडीच्या हालचालींनी संबंधित आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शंका लोकांमध्ये वाढली आहे. प्रश्न असे की पालकमंत्री यांच्या अर्जावर अद्याप सुनावणी किंवा निर्णय नाही? जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणी प्रलंबित असताना अप्पर तहसीलदारांनी एवढ्या घाईने आदेश का दिला? एखाद्या सामान्य अर्जदाराला महिनोनिमहिनो दार ठोठावावे लागते, मग या प्रकरणात एका दिवसात आदेश का? सुनावणी असतानाही व्यवहार मोकळे ठेवण्याचा निर्णय कसल्या आधारे घेतला गेला? या घडामोडीमुळे महसूल विभागाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये लक्ष्मीचा प्रभाव अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेवर मात करतोय का, असा संशय नागरिकांमध्ये बळावतो आहे. एकंदरीत, सावेडीतील जमीन वाद हा केवळ मालकीचा प्रश्न नसून ‘लक्ष्मी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत’ या गंभीर शंकेने ग्रासलेला आहे.

Sawedi Land Scam : “पालकमंत्रीही थांबले, जिल्हाधिकारीही थांबले… पण अप्पर तहसीलदार धावले!” Read More »

gadchiroli police

Gadchiroli Police : गडचिरोलीत मोठी कारवाई, आठ तासांच्या चकमकीनंतर 4 नक्षलवादी ठार

Gadchiroli Police : गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 नक्षलवादी ठार केले आहे. तब्बल आठ तास चाललेल्या चकमकीनंतर पोलिसांनी 4 नक्षलवादी ठार (01 पुरुष आणि 03 महिला) केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती. सदर भागात सुरू असणाऱ्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी सदर जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता एकूण 04 जहाल माओवाद्यांचे मृतदेह (01 पुरुष आणि 03 महिला) मिळाळे आहेत. याशिवाय घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल व 01 .303 रायफल जप्त करण्यात आले आहेत. सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू आहे.

Gadchiroli Police : गडचिरोलीत मोठी कारवाई, आठ तासांच्या चकमकीनंतर 4 नक्षलवादी ठार Read More »