DNA मराठी

ऑटोमोबाईल

img 20251104 wa0005

उभारणी तील ‘मध्यस्थां’ चा सुळसुळाट बंद करा Pratap Sarnaik यांचे आदेश

Pratap Sarnaik : धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्क्या उभारण्या चा उद्योग वेगाने विस्तारत आहे. पवनचक्की उभारणी साठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे! त्यासाठी कंपनी आणि शेतकरी यांच्यामधील ‘ मध्यस्थ ‘ या नावाखाली वाढलेला दलालांचा सुळसुळाट बंद करा. असे आदेश परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. ते या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते .या बैठकीला धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा, जिल्हा पोलीस अधीक्षक शफखत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या सह पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, पवन चक्क्या उभारणीमध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते, त्या शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी शासनाने मध्यस्थ म्हणून काम केले पाहिजे, शेतकरी आणि संबंधित कंपनी याच्यामध्ये तयार झालेले दलाल हे गुंडगिरी करून शेतकऱ्यांना धमकवतात, तसेच त्याला योग्य मोबदला मिळू देण्यापासून वंचित ठेवतात. अशा अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात तक्रार येण्याची वाट न पाहता सुमोटो (Suo Moto ) गुन्हे दाखल करावेत. अशा गुंडांच्या पासून जिल्ह्यात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. याबरोबरच संबंधित कंपनीला पवनचक्की उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ते सहकार्य करणे देखील आवश्यक आहे. पवनचक्की उभारणी उद्योगातून धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे हित जपले जावे, त्याची फसवणूक होणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्ष रहावे असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

उभारणी तील ‘मध्यस्थां’ चा सुळसुळाट बंद करा Pratap Sarnaik यांचे आदेश Read More »

anil ambani

ED Action on Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत; ED ची मोठी कारवाई, 40 मालमत्ता जप्त

ED Action on Anil Ambani : देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा अनिल अंबानी चर्चेत आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने त्यांच्या ₹ ३,०८४ कोटी (अंदाजे $३.८ अब्ज) किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. माहितीनुसार, ईडीने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम ५(१) अंतर्गत ही कारवाई सुरू केली. जप्त केलेल्या मालमत्तेत अनिल अंबानी यांचे पाली हिल, वांद्रे पश्चिम, मुंबई येथील राजवाड्यातील निवासस्थान समाविष्ट आहे. ईडीच्या जप्तीमध्ये अनिल अंबानी यांच्या समूहाच्या नवी दिल्लीतील रिलायन्स सेंटर आणि मुंबई, नोएडा, गाझियाबाद, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई (कांचीपुरमसह) आणि पूर्व गोदावरी येथील मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये कार्यालय परिसर, निवासी युनिट्स, औद्योगिक इमारती आणि अनेक भूखंडांचा समावेश आहे. ईडीने चार वेगवेगळ्या आदेशांनुसार ही मालमत्ता जप्त केली. 40 हून अधिक मालमत्ता जप्त रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) यांनी उभारलेल्या सार्वजनिक निधीच्या गैरवापराच्या कथित गैरवापराच्या मनी लाँडरिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने ही कारवाई केली. या कंपन्यांद्वारे उभारलेला निधी अनिल अंबानी समूहाच्या विविध संस्थांना वळवण्यात आला होता, असे तपासात आढळून आले. ईडीचे म्हणणे आहे की हे पैसे अप्रत्यक्षपणे येस बँकेद्वारे वळवण्यात आले. २०१७ ते २०१९ दरम्यान, येस बँकेने आरएचएफएलमध्ये २,९६५ कोटी आणि आरसीएफएलमध्ये २,०४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. डिसेंबर २०१९ पर्यंत, या गुंतवणुकीला नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए) घोषित करण्यात आले होते. आरएचएफएलकडे १,३५३.५० कोटी रुपयांची थकबाकी होती आणि आरसीएफएलकडे १,९८४ कोटी रुपयांची थकबाकी होती. तपासात रिलायन्स कम्युनिकेशन्सवर पकड घट्ट ईडीने आता आपला तपास रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) आणि त्याच्या संलग्न कंपन्यांपर्यंत वाढवला आहे. तपासात असे दिसून आले आहे की कंपनीवर १३,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज फसवणुकीचा आरोप आहे. यापैकी १२,६०० कोटी रुपये संबंधित पक्षांना हस्तांतरित करण्यात आले, तर १,८०० कोटी रुपये म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवींद्वारे इतर कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आले. ईडीच्या म्हणण्यानुसार, बिल डिस्काउंटिंगच्या नावाखाली फसवे व्यवहार आणि मनी लाँड्रिंगचे पुरावे सापडले आहेत. भ्रष्टाचाराशी संबंधित मालमत्ता परत मिळवण्यासाठी ही कारवाई सार्वजनिक हितासाठी असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. अनिल अंबानींच्या समूहावर ईडीने पकड घट्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ५ ऑगस्ट २०२५ रोजी ईडीने कर्ज फसवणूक प्रकरणासंदर्भात अनिल अंबानींना चौकशीसाठी बोलावले होते. याआधी २४ जुलै रोजी मुंबईत ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या छाप्यांमध्ये ५० व्यावसायिक संस्था आणि २५ व्यक्तींच्या मालकीच्या जागेची झडती घेण्यात आली. ऑक्टोबर २०२५ मध्ये, ईडीने रिलायन्स ग्रुपचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अशोक कुमार पाल यांना अटक केली, ज्यांच्यावर फसव्या बँक हमी आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ईडीची वाढती कारवाई सक्तवसुली संचालनालय अनिल अंबानी ग्रुपच्या आर्थिक कारवायांची सतत चौकशी करत आहे. एजन्सीने म्हटले आहे की ही कारवाई केवळ दंडात्मक नाही तर सार्वजनिक हितासाठी आर्थिक पारदर्शकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे.

ED Action on Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत; ED ची मोठी कारवाई, 40 मालमत्ता जप्त Read More »

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी

Chandshaili Ghat Accident : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. दिवाळीच्या दिवशी यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी Read More »

st co operative bank

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत. आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली.त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये अक्षरशा फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली. संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडला,कपडे फाडले,लाथा बुक्क्यांनी तुडवले. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशन पर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे. अशा संचालकांच्या हाती एसटी बँक देऊन एसटीचे सभासद आता पश्चाताप करत आहेत.

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस Read More »

img 20251015 wa0014

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी, वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊसतोड मजुरांच्या प्रलंबित विमा व मजुरीतील फरकाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. युनियनचे गहिनीनाथ थोरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनात या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १४ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फत २००३ पासून उसतोड कामगारांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत सुरू होता आणि त्यातून राज्यभरातील हजारो कामगारांना जवळपास १४०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, २०२२ नंतर शासनाने साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये दराने विमा कपात केली असून, सुमारे १७८ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु ही रक्कम विमा कंपनीकडे जमा न झाल्याने कामगारांना एकही लाभ मिळालेला नाही, असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. तसेच, ४ सप्टेंबर २०२४ रोजी उसतोड मजुरीत ३४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र अद्याप या वाढीचा फरक कामगारांना मिळालेला नाही. शासनाने विमा व मजुरी फरकाचा प्रश्न तातडीने सोडवून कामगारांचे देणे द्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत शासन, विमा कंपनी आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा संप अपरिहार्य होईल, असा इशारा थोरे पाटील यांनी दिला आहे. या संपामुळे ऊस तोडणी हंगाम ठप्प होण्याची शक्यता असून, सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही तर साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहू शकते, असा इशारा युनियनने दिला आहे.

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा Read More »

cidco lottery

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर

Devendra Fadnavis: दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगार मेळाव्यात देण्यात आलं होतं मात्र सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे. सिडकोच्या लॉटरीत 22 हजारपेक्षा जास्त घरे काढणार आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना ह्या घरांच्या किमती न परवडणाऱ्या असल्याने वारंवार किमती कमी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडल्याने नागरिकांचे स्वप्न भंग झालं असंच म्हणायला हवं.

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर Read More »

eknath shinde

Eknath Shinde: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; मिळणार 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान

Eknath Shinde: राज्यातील एसटीच्या 85 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला. एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या आणि कृती समितीच्या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Eknath Shinde: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; मिळणार 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान Read More »

vivo v60e

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त…

Vivo V60e : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी एक जबरदस्त कॅमेरा फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी विवोने एक शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने Vivo V60e या नावासह भारतीय बाजारात 200 मेगापिक्सलसह स्मार्टफोन लॉन्च केलाय. कंपनीने दावा केला की हा 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला सर्वात परवडणारा फोन आहे. हा मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो सुरळीत कामगिरी आणि मल्टीटास्किंग करण्यास मदत करतो. किंमत आणि व्हेरियंट Vivo V60e तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. बेस मॉडेल 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो आणि त्याची किंमत ₹29,999 आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह दुसरा प्रकार ₹31,999 मध्ये उपलब्ध आहे. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह टॉप मॉडेलची किंमत ₹33,999 आहे. हा स्मार्टफोन एलिट पर्पल आणि नोबल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक ते Amazon, Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑर्डर करू शकतात. याव्यतिरिक्त, निवडक बँक कार्ड ऑफरवर 10% पर्यंत सूट उपलब्ध असेल. उत्कृष्ट डिस्प्ले आणि डिझाइन या फोनमध्ये 6.77-इंचाचा क्वाड कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1600 निट्स आहे, ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट होते. हे डायमंड शील्ड ग्लासने संरक्षित आहे, जे टिकाऊपणा वाढवते आणि स्क्रॅचची शक्यता कमी करते. कॅमेरा या फोनमध्ये 200 एमपी प्रायमरी सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ऑरा फ्लॅशसह 8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये फोटो आणि व्हिडिओ कॉलिटी वाढवणारी अनेक एआय फिचर्स आहेत. बॅटरी आणि चार्जिंग फोनमध्ये 90 वॅट फास्ट चार्जिंगसह 6500 एमएएच बॅटरी आहे. याचा अर्थ बॅटरी लवकर चार्ज होईल आणि दीर्घकाळ टिकणारा बॅकअप मिळेल. सॉफ्टवेअर आणि इतर फिचर्स विवो व्ही60ई हा अँड्रॉइड 15 वर आधारित आहे, ज्यामध्ये कंपनीने अनेक स्मार्ट आणि कस्टमाइज्ड फीचर्स जोडले आहेत. एकंदरीत, हा फोन स्टायलिश डिझाइन, शक्तिशाली कामगिरी आणि प्रीमियम कॅमेरा हवा असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त… Read More »

upi

UPI New Rules: UPI युजरसाठी मोठा बदल; आता फिंगरप्रिंट अन् फेस रिकग्निशन करता येणार पेमेंट

UPI New Rules: देशात आता ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन नियम लागू केले आहे. ज्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होणार आहे. NPCI ने सांगितले की ही नवीन नियम वापरकर्त्यांना पेमेंट करताना अधिक पर्याय आणि सुरक्षितता प्रदान करतात, ज्यामुळे डिजिटल पेमेंटचा अवलंब करणे अधिक सुलभ होते. नवीन बायोमेट्रिक प्रमाणीकरण फीचर हे नवीन फीचर Google Pay, PhonePe, Paytm इत्यादी UPI अॅप्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या पारंपारिक UPI पिनऐवजी ऑन-डिव्हाइस बायोमेट्रिक तंत्रज्ञान, जसे की फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन, वापरण्याची परवानगी देते. सध्या, हे फीचर 5,000 पर्यंतच्या व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. NPCI ने सांगितले की वापरकर्त्यांच्या अभिप्राय आणि कामगिरीच्या आधारे भविष्यात ही मर्यादा वाढवली किंवा समायोजित केली जाऊ शकते. हे वैशिष्ट्य पर्यायी आहे, म्हणजे वापरकर्ते त्यांचा जुना UPI पिन किंवा इतर पारंपारिक पेमेंट पर्याय वापरणे सुरू ठेवू शकतात. सुरक्षा आणि तांत्रिक आवश्यकता जेलब्रोकन किंवा रूटेड डिव्हाइसेसवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण उपलब्ध होणार नाही. UPI अॅप्स आणि PSP बँकांनी ग्राहकाची स्पष्ट संमती घेतल्यानंतरच बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्षम करावे आणि ते कधीही अक्षम करण्याचा पर्याय प्रदान करावा. कोणत्याही नवीन डिव्हाइसवर व्यवहार करण्यापूर्वी नवीन ग्राहकांची संमती आवश्यक असेल. बँका आणि अॅप्ससाठी सूचना पात्रता तपासणी: बायोमेट्रिक्स सक्षम करण्यापूर्वी ग्राहक पात्रता आणि प्रमाणीकरण क्रेडेन्शियल्सची पुष्टी करणे आवश्यक आहे. ग्राहक संवाद: बायोमेट्रिक सक्षमीकरण आणि व्यवहार प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना अचूक माहिती आणि सूचना प्रदान केल्या पाहिजेत. पिन बदल: जर ग्राहकाने त्यांचा UPI पिन बदलला किंवा रीसेट केला, तर बँकेने सर्व अॅप्समध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरण अक्षम केले पाहिजे. ग्राहक नवीन संमती देत ​​नाही तोपर्यंत व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. निष्क्रियीकरण नियम: जर 90 दिवसांपर्यंत बायोमेट्रिक पद्धत वापरली गेली नाही, तर अॅप्स आणि बँका ती निष्क्रिय करतील. ती पुन्हा सक्रिय करण्यासाठी ग्राहक पुष्टीकरण आवश्यक असेल. वापरकर्त्यांना फायदे या नवीन उपक्रमामुळे UPI पेमेंट अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होतील. बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरकर्त्यांना पिन प्रविष्ट न करता पेमेंट करण्याची परवानगी देईल, ज्यामुळे डिजिटल व्यवहाराचा अनुभव अखंड होईल. भविष्यात मोठ्या व्यवहारांमध्ये हे वैशिष्ट्य विस्तारित करण्याचे NPCI चे उद्दिष्ट आहे.

UPI New Rules: UPI युजरसाठी मोठा बदल; आता फिंगरप्रिंट अन् फेस रिकग्निशन करता येणार पेमेंट Read More »

himachal pradesh accident

Himachal Pradesh Accident : भीषण अपघात, बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला; 18 जणांचा मृत्यू

Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील झंडुता भागात एका प्रवासी बसला भूस्खलनाचा धक्का बसला. बसवर डोंगराचा ढिगार कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि अनेक जण गंभीर जखमी आहेत. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक बचाव पथके ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुःखद अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनएरएफ) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनीही अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि बचाव कार्य जलदगतीने सुरू करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अपघाताच्या तीव्रतेबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अपघाताच्या तीव्रतेबद्दल दुःख व्यक्त केले आणि बचाव पथकांच्या परिश्रमाचे कौतुक केले.

Himachal Pradesh Accident : भीषण अपघात, बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला; 18 जणांचा मृत्यू Read More »