IMD Rain Alert: नगर जिल्ह्यासह गेल्या काही दिवसांपासून राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेकांना याचा फटका देखील बसला आहे. शेतकऱ्यांना लाखोंचा नुकसान झाला आहे. तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरात पाणी साचले आहे. यातच आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत.जनावरे व शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावे. मेघगर्जना होताना झाडाखाली/टॉवरजवळ थांबू नये. पर्यटनासाठी धरणे व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याची सूचना देखील हवामान विभागाने नागरिकांना दिली आहे.
याच बरोबर आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष टोल-फ्री 1077 0241-2323844 / 2356940 या नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.