OPPO Reno 17 Series : स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO आपली नवीन Reno 17 Series सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत OPPO Reno 17 आणि OPPO Reno 17 Pro असे दोन नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. उत्कृष्ट कॅमेरा, दमदार प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीमुळे या स्मार्टफोनकडे टेक्नॉलॉजीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
कंपनीने 16 नोव्हेंबर 2026 रोजी चीनमध्ये या स्मार्टफोनच्या लॉन्चची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेतील Pro मॉडेलमध्ये तब्बल 200 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळणार असल्याची अधिकृत पुष्टी कंपनीने केली आहे. तर सामान्य Reno 17 मॉडेलमध्ये चार 50 मेगापिक्सलचे कॅमेरे असण्याची खासियत आहे.
200MP कॅमेऱ्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव बदलणार?
OPPO Reno 17 Pro मधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा 200MP प्रायमरी कॅमेरा. या कॅमेऱ्यामुळे अधिक तपशीलवार फोटो काढता येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय 50MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आणि अल्ट्रावाइड कॅमेऱ्याची सुविधाही मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, OPPO Reno 17 मध्ये मुख्य कॅमेऱ्यासह चार 50MP कॅमेरे देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठीही 50MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
8000mAh पर्यंतची बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग
या नवीन स्मार्टफोनमधील आणखी एक महत्त्वाचे फिचर्स म्हणजे मोठी बॅटरी. समोर आलेल्या लीकनुसार, OPPO Reno 17 मध्ये तब्बल 8000mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते. तर Reno 17 Pro मध्ये 7200mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची माहिती आहे. त्यामुळे वारंवार फोन चार्ज करण्याची गरज कमी होऊ शकते. मात्र, बॅटरी आणि चार्जिंगचे अंतिम तपशील अधिकृत लॉन्चनंतर स्पष्ट होतील.
प्रोसेसरमध्येही मोठे अपग्रेड
परफॉर्मन्सच्या बाबतीतही OPPO ने या मालिकेत विशेष लक्ष दिले आहे.
– OPPO Reno 17: Qualcomm Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर.
– OPPO Reno 17 Pro: MediaTek Dimensity 8550 Super प्रोसेसर.
या प्रोसेसरमुळे मल्टिटास्किंग, गेमिंग आणि दैनंदिन वापरात चांगला अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.
डिस्प्ले आणि डिझाइन कसे असणार?
लीक झालेल्या माहितीनुसार, Reno 17 मध्ये जवळपास 6.5 ते 6.56 इंचांचा डिस्प्ले मिळू शकतो. तर Reno 17 Pro मध्ये 6.32 इंचांचा 1.5K डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या मालिकेच्या डिझाइनमध्येही कंपनीने वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, फोनच्या मागील बाजूस आकर्षक Cat Design असलेले Encounter Cat हे कलर व्हेरिएंट चर्चेत आहे. याशिवाय पांढरा आणि तपकिरी रंगांचे पर्यायही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Android 17 आणि ColorOS 17 चा सपोर्ट
दोन्ही स्मार्टफोन Android 17 आधारित ColorOS 17 वर चालण्याची अपेक्षा आहे. नवीन सॉफ्टवेअरमुळे वापरकर्त्यांना सुधारित इंटरफेस, चांगले फीचर्स आणि अधिक सुलभ वापराचा अनुभव मिळू शकतो.
भारतात कधी लॉन्च होणार? किंमत किती असेल?
OPPO Reno 17 आणि Reno 17 Pro हे स्मार्टफोन 16 नोव्हेंबर 2026 रोजी चीनमध्ये सादर होणार आहेत. भारतीय बाजारपेठेतील लॉन्चची तारीख आणि अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही.
काही टेक रिपोर्ट्सनुसार, हे स्मार्टफोन भारतात 2027 च्या सुरुवातीला दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.






