DNA मराठी

NCP Ajit Pawar : राज्यातील दुष्काळसदृश्य स्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबीर पुढे ढकलले

sunetra pawar

NCP Ajit Pawar : राज्यातील १९ जिल्ह्यात पावसाच्या अतिखंडामुळे दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणारे एक दिवसीय राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून हे शिबीर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

राज्यात सध्या सरकारच्या माध्यमातून दुष्काळाच्या संकटाचा आढावा घेतला जात आहे. १९ जिल्ह्यातील पीक व चारा पाणी परिस्थिती काळजीची असल्याने शेतकरी हवालदिल आहे. या संवेदनशील भावनेतून पक्षाचे राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सदरचे शिबीर घ्यावे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पक्षाचे मंत्री, नेते आणि पदाधिकारी यांनी आपापल्या परिसरातील दुष्काळाच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबत पुढाकार घेवून उपाययोजनांवर भर देण्याची गरज असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *