DNA मराठी

Nilesh Lanke: गुंड खोटे पोलीस व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिराडण्याचा प्रयत्न… खासदार लंकेचा आरोप

nilesh lanke

Nilesh Lanke: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती लाठी चार्ज होते हे अत्यंत लज्जस्पद आहे वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मात्र पेपर फुटीमुळे आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रात देखील टीईटी चा पेपर फुटला जे उद्या देशाचे भविष्य आहे मात्र पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावा लागत असेल तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे अशी तीव्र संतप्त प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली

नीट पेपर फुटी प्रकरणानंतर दिल्ली येथील जंतर मंतर वर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरू असून या आंदोलनाला अहिल्यानगर मध्ये खासदार निलेश लंके यांनी पाठिंबा दिला असून यावेळी लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांच्या समवेत आंदोलन सुरू केले

यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले सनम वांगचूंग असतील किंवा अभिजीत इतके असतील हे आंदोलन करत असताना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज झाला . दरोडेखोरांना देखील एवढ्या चुकीच्या पद्धतीने मारहाण केली जात नाही तेवढ्या चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण झाली असा यावेळी लंके म्हणाले

विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही

नीट पेपर कुठे प्रकरणानंतर थेट पुरावे घेऊन लंके जिल्हाधिकारी कार्यालयावर बसले यावेळी एका विद्यार्थिनीला उत्तर पत्रिकेवरती 500 हून अधिक मार्क दिसतात मात्र ऑनलाईन तिला केवळ 50 मार्क पडल्याचे दिसले आणि याबाबत विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यास त्यांना धुडकावून लावले जात आहे यामुळे विद्यार्थ्यांसमोर आत्महत्या सारखाच पर्याय उरला असल्याचा देखील यावेळी लंके यांनी नमूद केलं

तसेच लंके म्हणाले विद्यार्थ्यांच्या मागण्या देखील मापक आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 वर्षीचे स्वप्न दाखवले विद्यार्थ्यांकडे युवाशक्ती म्हणून पाहिले जायचे आणि त्याच युवाशक्ती वरती अन्याय होतो आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावे लागले त्यासंबंधीचा वरती मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा

हे हिटलर शाही व हुकूमशाही सरकार

हे मंगरूळ आणि हुकूमशाही सरकार आहे हे हिटलर सरकार आहे हिटलर चा अंत कसा झाला हे जगाला माहिती आहे की मी विद्यार्थ्यांना न्याय देण्यापेक्षा पोलीस बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली महिला भगिनींना मारहाण केली गुंड प्रवृत्तीचे लोक आंदोलनामध्ये आणले कारण हे आंदोलन चिरडले जावे. काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देखील आढळून आले असा सणसणीत आरोप खासदार निलेश लंके यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *