Bachchu Kadu : अमरावती जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांच्या तक्रारीनुसार माजी मंत्री बच्चू कडू व काही साथीदारांनी अभिजित तायडे यांचा अपघात घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी नोंदवला आहे.
तक्रारीनुसार डिसेंबर महिन्यात कुरळपूर्णा येथील निवासस्थानी हा कट आखण्याची चर्चा झाली होती. या संभाषणाचे गुप्त रेकॉर्डिंग एका साक्षीदाराने मोबाईलमध्ये केले. पोलिसांनी रेकॉर्डिंगची तपासणी केली असता प्राथमिकदृष्ट्या तथ्य आढळल्यामुळे चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे यांच्यासह इतरांवर भारतीय दंड संहिता कलम ५५, ५८, ६१ अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विशाल आनंद,पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे या घटनेमुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






