DNA मराठी

1st April Rules: आयकर कायद्यात बदल अन् शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का; 1 एप्रिलपासून देशात काय बदलणार?

1st april

1st April Rules: 1 एप्रिल 2026 पासून देशातील आयकर प्रणालीमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन कायदा, ITR च्या तारखा, TCS-STT दर आणि शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठीही खूप काही बदल होणार आहेत.

केंद्र सरकारने 2026 च्या अर्थसंकल्पात आयकर व्यवस्थेत अनेक महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य करदाते आणि गुंतवणूकदारांवर होणार आहे. चला तर मग पाहूया 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे 7 मोठे बदल.

नवीन आयकर कायदा लागू

सर्वात मोठा बदल म्हणजे आता 1961 चा जुना आयकर कायदा संपणार आहे.त्याऐवजी Income Tax Act 2025 लागू होणार आहे. मात्र दिलासा म्हणजेTax Slabs मध्ये कोणताही बदल नाही.

नवीन कायद्याचा उद्देश कर प्रणाली अधिक सोप्या भाषेत आणणे आणि कायदेशीर गुंतागुंत कमी करणे.

ITR भरण्याची अंतिम तारीख वाढली

सरकारने काही करदात्यांना दिलासा दिलेय. ITR-3 आणि ITR-4 भरण्याची अंतिम तारीख31 जुलै ऐवजी 31 ऑगस्ट करण्यात आली आहेय. पण ITR-1 आणि ITR-2 साठी अंतिम तारीख 31 जुलैच राहील. तसेच Tax Audit ची अंतिम तारीख 31 ऑक्टोबरच कायम राहील.

Revised Return साठी जास्त वेळ

जर ITR भरताना काही चूक झाली तर? आता Revised Return भरण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे. आधी अंतिम तारीख 31 डिसेंबर होती आता ती वाढवून 31 मार्च करण्यात आली आहेय मात्र 31 डिसेंबरनंतर Revised Return भरल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

TCS दरांमध्ये मोठे बदल

सरकारने काही व्यवहारांवरील TCS (Tax Collected at Source) वाढवले आहेत. मद्य विक्रीवर TCS – 1% वरून 2% करण्यात आलाये तर भंगार (Scrap) विक्रीवर – 1% वरून 2% टीसीएस भरावे लागणार आहेय. याचबरोबर कोळसा, लिग्नाइट आणि लोखंड खनिजांवर 2% टीसीएस असणार आहेय. मात्र दिलासा म्हणजे तेंदू पानांवरील TCS 5% वरून 2% करण्यात आलाय.

परदेश प्रवास करणाऱ्यांना दिलासा

परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी LRS अंतर्गत विदेशी टूर पॅकेजवर TCS आता फक्त 2% असेल.पूर्वी हा कर 5% ते 20% दरम्यान होता. तसेच शिक्षण आणि वैद्यकीय उपचारासाठी परदेशात पाठवलेल्या पैशांवरही TCS 5% वरून 2% करण्यात आलाय.

शेअर बाजारातील F&O ट्रेडर्सना धक्का

शेअर बाजारात Futures आणि Options मध्ये ट्रेड करणाऱ्यांसाठी खर्च वाढणार आहेय.

Futures वर STT 0.02% वरून 0.05% तर Options वर STT0.1% वरून 0.15% यामुळे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग महाग होणार आहे.

Buyback आणि Dividend वर नवीन नियम

शेअर बायबॅकवर आता नवीन कर प्रणाली लागू होणार आहेय.1 एप्रिल 2026 पासून Buyback मधील उत्पन्नावर Capital Gains Tax लागेल. पूर्वी ते Dividend मानले जात होते. तसेच Dividend मिळवण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची 20% वजावट आता मिळणार नाही. याचा अर्थ संपूर्ण Dividend रकमेवर कर भरावा लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *