DNA मराठी

Ahilyanagar Police : खंडणीखोराला भररस्त्यात बेड्या अन् उद्योजकांना दिलासा

Ahilyanagar Police: अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी थेट अ‍ॅक्शन मोडवर जात खंडणीखोर आरोपीची भररस्त्यात वरात काढली आहे. एमआयडीसी परिसरातील उद्योजकांकडून खंडणी उकळणाऱ्या आरोपीला पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालय परिसरापर्यंत बेड्या ठोकून फिरवण्यात आलं. या कारवाईमुळे संपूर्ण शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर शहरात. अखिल भारतीय कामगार सेनेचा नेता भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याची भररस्त्यात वरात काढत पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला.

काही दिवसांपूर्वी निंबळक एमआयडीसीतील सुयश मेटल प्रोसेसिंग या कंपनीत सदानंद सोनवणे, राजेश पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी बेकायदेशीर प्रवेश करत दहशत माजवली होती. कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश जनार्दन कोकाटे यांना काम बंद पाडण्याची धमकी देत, काम सुरू ठेवायचं असेल तर दरमहा एक लाख रुपये द्या, अन्यथा मालकाला जीवे मारू, अशी थेट धमकी देण्यात आली होती. याचवेळी 20 हजार रुपयांची खंडणीही उकळण्यात आली.

या गंभीर प्रकारानंतर संतप्त उद्योजकांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेत तक्रार दिली. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि मुख्य आरोपी सदानंद सोनवणे याला अटक केली.

यानंतर सायंकाळी पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालय परिसरापर्यंत आरोपीची बेड्या ठोकून वरात काढण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे उद्योजकांमध्ये समाधानाचं वातावरण असून गुन्हेगारांमध्ये मात्र भीतीचं सावट पसरलं आहे. उद्योजकांना दिलासा… गुन्हेगारांना स्पष्ट संदेश अहिल्यानगर पोलीस आता थांबणार नाहीत!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *