DNA मराठी

Nevasa News : नेवासा तालुक्यात अवैध वाळू तस्करांवर ‘प्रहार’ सुरूच; 44 तराफे व साहित्य जाळून खाक !

fb img 1770982696869

Nevasa News : जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपशाविरोधात उघडलेल्या मोहिमेअंतर्गत, नेवासा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी शसुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने प्रवरा नदीपात्रात विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध साहित्य नष्ट केले.

3 टप्प्यात केलेली कारवाई

नेवासा खुर्द (ज्ञानेश्वर मंदिर/लाडमोड टेकडी परिसर): प्रवरा नदीच्या काठावर 36 थर्माकोलचे चप्पू आणि 50 लाकडी बल्ल्या जप्त करून जागीच जाळून नष्ट करण्यात आल्या.

दुसरी कारवाई: नदीपात्रातील अन्य एका ठिकाणी 4 थर्माकोलचे चप्पू नष्ट करण्यात आले.

कापूर डोह: या भागात 4 चप्पू व 16 लाकडी बल्ल्या जाळून खाक करण्यात आल्या.

दिवसभरात एकूण 44 तराफे/चप्पू आणि मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्य नष्ट करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

कारवाई दरम्यान बोटीमध्ये तांत्रिक बिघाड (पंक्चर) झाल्यामुळे खोल पाण्यातील कारवाई पूर्ण करता आली नाही, तरीही नदीकाठावरील आणि उथळ पाण्यातील अवैध साधनांचा पूर्णपणे बिमोड करण्यात आला आहे.

अवैध गौण खनिज उत्खननावर प्रशासनाचा हा ‘वॉच’ असाच कायम राहणार असून दोषींवर कडक कारवाईचे सत्र सुरूच राहील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *