DNA मराठी

Champions Trophy 2025: भारताची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल झालेल्या न्युझीलँड विरुद्ध बांगलादेश सामन्यात न्युझीलँडने बांगलादेशचा पाच विकेटने पराभव केला आहे. या पराभवानंतर ग्रुप ए मधून न्युझीलँड आणि भारताने सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे तर पाकिस्तान आणि बांगलादेशच्या स्पर्धेतून बाहेर झाले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला एकामागून एक दोन मोठे पराभव पत्करावे लागले आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर मोठा पराभव केला तर 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला.

पाकिस्तानला 29 वर्षांत प्रथमच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. तो ग्रुप स्टेजच्या पुढे जाऊ शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान संघ त्यांचे प्रशिक्षक आकिब जावेद यांना पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच काढून टाकणार आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर संघाला अनुभवी खेळाडूंकडून तीव्र टीका सहन करावी लागली.

जावेद मियांदाद म्हणाले, “सिस्टम, निवडकर्त्यांना आणि या सर्वांना दोष देणे निरुपयोगी आहे. प्रश्न असा आहे की निवडलेल्या खेळाडूंमध्ये काही कमतरता आहे का? पीसीबी त्यांची काळजी घेत नाही का? त्यांना पुरेसे पैसे दिले जात नाहीत का? मग मोठ्या सामन्यांमध्ये आणि स्पर्धांमध्ये कामगिरी करण्याची आवड, उत्साह आणि व्यावसायिक वृत्ती कुठे आहे? सत्य हे आहे की सामना सुरू होण्यापूर्वीच आमचे खेळाडू दबावाखाली होते. भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याच्या मनःस्थितीत कोणीही दिसत नव्हते.”

बांगलादेशला हरवून न्यूझीलंड उपांत्य फेरीत
सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी विजय आवश्यक होता. रचिन रवींद्रच्या चौथ्या एकदिवसीय शतकामुळे न्यूझीलंडने बांगलादेशच्या कठीण आव्हानावर सहज मात केली. बांगलादेशने दिवसाची सुरुवात चमकदार केली पण मायकेल ब्रेसवेलने खेळाचा मार्ग बदलला. ब्रेसवेलने सलग 10 षटके गोलंदाजी केली आणि त्याच्या स्पेलमध्ये 26 धावा देऊन 4 बळी घेतले. बांगलादेशकडून नाझिमुल शांतोने सर्वाधिक 77 धावा केल्या तर जकार अलीने 45 धावा केल्या. त्यामुळे संघाने 50 षटकांत 9 बाद 236 धावा केल्या.

237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खूपच खराब झाली. विल यंग आणि केन विल्यमसन लवकर बाद झाले. यानंतर, रॅचिन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी 57 धावांची भागीदारी करून संघाचा कमबॅक केला.न्यूझीलंडच्या विजयासह बांगलादेशही स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *