DNA मराठी

Maharashtra Election: आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच बालमटाकळीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…..!

1000008370

Maharashtra Election:– भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून रविवार दि. 20 रोजी महाराष्ट्रातील 2024 साठी विधानसभेच्या 99 जागांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे आमदार मोनिका राजळे यांना पक्षाने तीसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करताच शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील भारतीय जनता पार्टीचे समर्थक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष कासमभाई शेख, माजी सरपंच अशोकराव खिळे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब जिजा वाघुंबरे, नशीरभाई शेख, आफसर शेख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *