Dnamarathi.com

OTT Apps : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने एक मोठी कारवाई केली आहे. सरकारने मोठा निर्णय घेत देशातील तब्बल 18 OTT प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले आहे. 

हे ॲप्स अश्लील कंटेन देत असल्याने सरकारने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ॲप्सवर ओटोटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सादर केले जात होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही बंदी जाहीर केली आहे.

 बंदी का घालण्यात आली?

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि 67A, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292 आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा, 1986 च्या कलम 4 चे उल्लंघन केल्याबद्दल OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचे कारण देताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की या प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेला कंटेन अश्लील होता आणि त्यात महिलांना अपमानास्पद रीतीने दाखवण्यात आले होते. यात नग्नता आणि लैंगिक कृत्ये दाखवण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध कलंकित झाले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 12 फेसबुक अकाऊंट, 17 इंस्टाग्राम अकाऊंट, 16 एक्स अकाऊंट आणि 12 यूट्यूब अकाऊंटवरही सरकारने बंदी घातली आहे.

या ॲप्सवर बंदी

Dreams Films

Voovi

Yessma

Uncut Adda

Tri Flicks

X Prime

Neon X VIP

MoodX

Besharams

Hunters

Rabbit

Xtramood

Nuefliks

Mojflix

Hot Shots VIP

Fugi

Chikooflix

Prime Play

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *