Maharashtra IMD Alert : गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
अकोला जिल्ह्य़ात व बाळापूर, तेल्हारा, अकोट, पातुर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. काही शेतकऱ्यांना अवकाळी दिलासा मिळाला तरी काही शेतकऱ्यांची निराक्षा झाली आहे.
अकोल्या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. टरबूज, संत्रा, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात सायंकाळी वादळी पावसासह काही भागात गारपीट झाली आहे.
राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.
तरी यांकडे अकोला जिल्हाअधिकारी अजित कुंभार यांनी लक्ष देऊन नुकसान झालेल्या गहू, हरभरा, ज्वारी,कादा संञा, या पिकांचे सर्वे करण्याचे आदेश तलाठी यांना द्यावे व नुकसान झालेल्या अकोल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या बाळापूर तालुक्यांमध्ये हरभरा, कादा काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे लोहारा ,कवठा,बहादूरा, निंबा, हाता,जानोरी,वझेगाव, अंदुरा या परिसरात काल झालेल्या अवकाळी पाऊसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत.