Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्टे बाळगणाऱ्या 02 आरोपींना 2 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते.
या आदेशानुसार दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदाराकडून 03 फेब्रुवारी रोजी विकास सुधाकर सरोदे आणि त्याचा साथीदारासह शेंडी बायपास या ठिकाणी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट व त्याचा साथीदारासह नागरदेवळे गावचे शिवारात कापुरवाडी गावाकडे जाणारे रोडवर गावठी कट्टे (अग्निशस्त्र) विकण्यासाठी येणार असल्याची महिती मिळाली.
पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे दोन स्वंतत्र पथके नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर ते छ. संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावुन आरोपी विकास सुधाकर सरोदे, (वय – 23 वर्षे, रा. गुंजाळे ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले. तर त्याचा साथीदार लखन सुधाकर सरोदे (रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर) हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.
दरम्यान मिळालेल्या बातमीतील ठिकाणी नागरदेवळे गावाचे शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणारे रोडवरुन आरोपी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट, (वय – 33 वर्षे, रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेवुन त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार भैया शेख (रा. कुकाणा, ता. नेवासा, जि. अहमदनगर )हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.
दोन्ही ठिकाणावरुन आरोपी विकास सुधाकर सरोदे व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांचे कब्जामध्ये 02 गावठी बनावटीचे कट्टे (अग्निशस्त्रे) 04 जिवंत काडतुस असा एकुण 62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे आणि भिंगार कॅम्प पोलीस
ठाण्यात आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.