Ahmednagar News: काही दिवसांपूर्वी राहुरी शहरातील वकील दांपत्यांच्या निर्घृण हत्या करण्यात आली होती ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली व तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
त्यानंतर यातील पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात असून 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आज या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी रामेश्वर निमसे, अमोल हुंबे, अनिकेत आवारे, राम जरांगे, श्रीकांत भामरे, गिरीश भामरे, एडवोकेट गजेंद्र दांगट, एडवोकेट स्वप्निल दगडे, किशोर शिंदे, योगेश देशमुख, विलास तळेकर, अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.