DNA मराठी

Ahmednagar News: 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या! कुणाल भंडारी 

Kunal Bhandari

Ahmednagar News : 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा बजरंग दल संयोजक कुणाल भंडारी यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. 

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी भागात अत्यंत गरीब मागासवर्गीय कुटूंबातील 6 वर्षाच्या लहान मुलीवर निर्दयीपणे एका सराईत आरोपीने लैंगिक अत्याचार केला.

 त्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावा. 

तसेच सदर पिडीत मुलीला व तिच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे आणि शासनाच्या वतीने मुलीच्या पुनर्वसनासाठी व तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *