Dnamarathi.com

Upcoming Cars In India: या नवीन वर्षात भारतीय बाजारामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्ससह नवीन कार्स लॉन्च होणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला 2024 मध्ये रेनॉल्ट लॉन्च करणाऱ्या कार्सबद्दल माहिती देणार आहोत. 

भारतीय  बाजारपेठेमध्ये रेनॉल्ट 4 नवीन कार लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. चला मग जाणून घेऊया या कार्सबद्दल सविस्तर माहिती.

2024 Renault Duster

भारतीय बाजारपेठेमध्ये कंपनी लवकरच 2024 Renault Duster लॉन्च करणार आहे. ग्राहकांना या कारमध्ये डिझेल इंजिनशिवाय जबरदस्त डिझाइन, केबिन आणि फिचर्स मिळणार आहे. नवीन डस्टरची किंमत 10 लाख ते 15 लाख दरम्यान असण्याची अपेक्षा आहे

Renault Jogger MPV

मारुती XL6 आणि Kia Carens शी टक्कर देण्यासाठी रेनॉल्ट 3- रो सीटर कार Renault Jogger MPV लवकरच लॉन्च होणार आहे. या MPV मध्ये केबिन, फीचर सेट आणि अंडरपिनिंग्स नवीन डस्टरसोबत देण्यात येणार आहे. ही कार बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च होणार आहे.

Renault Kwid Electric

कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार देखील यावर्षी लॉन्च करणार आहे. कंपनी Renault Kwid Electric यावर्षी लॉन्च करु शकते. बाजारात ही कार 10-12 लाखांमध्ये लॉन्च होऊ शकते. बाजारात ही कार eC3, Tiago आणि Tigor EV सारख्या कार्सना टक्कर देणार आहे.

 2024 Renault Kiger And Triber

2024 मध्ये, कंपनी किगर आणि ट्रायबर या लोकप्रिय कार्सना अनेक मोठया बदलासह पुन्हा लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जर तुम्ही बजेट सेगमेंटमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आणखी काही दिवस प्रतीक्षा करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *