Dnamarathi.com

Maharashtra News: समोर कोणीही उमेदवार असला तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन  येणारी लोकसभा निवडणूक लढणारच असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी स्पष्ट केले आहे.

 शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ मोहटादेवी गडावरून आज करण्यात आला. यानंतर पाथर्डी इथे पत्रकार परिषदेत बोलताना राणी लंके यांनी मला उमेदवारी करावी लागली तर मी लोकसभा निवडणुक नक्कीच लढवणार असे स्पष्टपणे सांगितले.

लोकसभेला आ.निलेश लंके उमेदवार असणार का आपण, आपली तयारी आहे का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राणी लंके यांनी येणारी लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही तयार आहोत हे सांगत नगर दक्षिणेतून आ.निलेश लंके अथवा आपण स्वतः निवडणूक लढवणारच असे सांगण्याचा प्रयत्न केला. 

राणी लंके यांच्या वक्तव्यावरून समोर कोण उमेदवार असेल याची चिंता नसून कोणीही उमेदवार असला तरी लंके दांपत्यापैकी एकजण निवडणुकीच्या रिंगणात असेल असे आता स्पष्ट होत आहे.

 शिवस्वराज्य यात्रा नगर दक्षिण मतदारसंघात असून सर्व सातही तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार असून यासाठी पाच शिवस्वराज्य रथ तयार करण्यात आले आहेत. यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास शिवअभ्यासक लोकांसमोर मांडणार आहेत.  पंधरा दिवस यात्रा चालणार असून समारोप नगर शहरात आ.निलेश लंके यांच्या उपस्थितीत होणार आहे.

आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य यात्रा

मराठी माणसांची अस्मिता आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शिवराय मनामनात.. शिवराय घराघरात ! पोहचविण्यासाठी आम्ही घेऊन येतोय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवस्वराज्य यात्रा या यात्रेचा प्रारंभ आज सौ. राणीताई लंके यांनी आई मोहटा देवीचे दर्शन घेऊन केला. यावेळी उपस्थित सर्व सहकारी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *