DNA मराठी

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण!

Talathi Bharti :  काही महिन्यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने या भरतीमध्ये मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे.

 या परीक्षेत बसलेल्या उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत. त्यामुळे उर्वरित उमेदवारांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने तलाठी भरती परीक्षेला मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

काँग्रेसने नोकरभरती परीक्षेचा निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, तलाठी नियुक्तीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सांगितले की, पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर सुमारे 20 ते 25 युवक काँग्रेस कार्यकर्ते जमले आणि त्यांनी दुपारी 3.15 वाजता बोरिवलीकडे जाणारी ट्रेन थांबवली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *