Dnamarathi.com

Congress News : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

तर दुसरीकडे ममता आणि भगवंत मान यांनी बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे.

 जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि राजीव चंद्रशेखर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा आणि भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

7 महिन्यात काँग्रेसचा भ्रमनिरास

वास्तविक, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट न दिल्याच्या रागातून जगदीश शेट्टर यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गुरुवारी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. 

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेट्टर म्हणाले की, काही मुद्द्यांमुळे आपण काँग्रेसमध्ये गेलो होतो. पण, भाजपचे कार्यकर्ते त्यांना पक्षात परत येण्यासाठी सतत आग्रह करत होते, बीएस येडियुरप्पा, विजयेंद्र येडियुरप्पा आणि कर्नाटकचे भाजप नेतेही त्यांना भाजपमध्ये येण्यास सांगत होते. त्यामुळे काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मोदी पुन्हा पंतप्रधान होतील

आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याबाबत बोलताना शेट्टर म्हणाले की, पक्षाने (भाजप) त्यांना यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या.

 याआधी बीएस येडियुरप्पा आणि कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि कर्नाटकातील राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *