DNA मराठी

water supply

Water

Ahilyanagar News: पाणी टंचाईच सकट गडद! जिल्ह्यातील 1 लाख लोकांची तहान भागतेयं टँकरच्या पाण्यावर

Ahilyanagar News : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे अहिल्यानगर ल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ९२ गावे आणि तब्बल ५०० वाड्या-वस्त्यांवर सध्या तीव्र टंचाई जाणवत आहे. या गावे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी प्रशासना कडून ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ शासकीय आणि ६२ खासगी टँकरचा समावेश असून, याद्वारे यातील सुमारे १ लाख ४१२२ लोकसंख्येची तहान भागवली जात आहे. तसेच नगर तालुक्यातील काही गावांना उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून जानेवारी फेब्रुवारी पासूनच या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागते नगर तालुक्यातील बहिरवाडी या गावात पाणी टंचाई तीव्र झाले असून पाण्याचे टँकर दर चार ते पाच दिवसांनी येत असलं तरी तो गावाला पूर्णपणे पाणी देऊ शकत नाही त्यामुळे अनेक गावकऱ्यांना दीड हजार रुपयापर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो तर काही परिसरात पाण्याचे टँकर येत नसल्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे.दरम्यान, जलजीवन योजने अंतर्गत जिल्ह्यात ९०० कोटींवर खर्च होऊनही जिल्ह्यातील ९२ गावे आणि ५०० वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जलजीवन पाणी योजना जिल्ह्यासाठी एक मृगजळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी केव्हा तोडगा निघणार असा प्रश्न टंचाईग्रस्त गावांतील नागरिक करीत आहेत.

Ahilyanagar News: पाणी टंचाईच सकट गडद! जिल्ह्यातील 1 लाख लोकांची तहान भागतेयं टँकरच्या पाण्यावर Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar News : पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत; पुरवठा विस्कळीत ‘या’ दिवशी होणार पुरवठा

Ahilyanagar News : विज वितरण कंपनी कडून शहर पाणी पुरवठा योजने करिता होणाऱ्या विज पुरवठ्या मध्ये बिघाड निर्माण झाल्याने सोमवार दि.१२/०१/२०२६ रोजी रात्री ११.३० वाजले पासुन आज पहाटे ४.३० वाजेपर्यंत विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सलग आठ तास पाणी उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत त्यामुळे मंगळवार दि.१३/०१/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने म न पा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिके मार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणी पुरवठा हा बुधवार दि. १४/०१/२०२६ रोजी करण्यात येईल. तसेच बुधवार दि.१४/०१/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नसून तो गुरुवार दि.१५/०१/२०२६ रोजी करण्यात येईल. तसेच सर्व उपनगर भागामध्ये रोटेशन पेक्षा उशीराने पाणी पुरवठा होणार आहे . तरी नागरीकानी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत; पुरवठा विस्कळीत ‘या’ दिवशी होणार पुरवठा Read More »

Water

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 20 मे रोजी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील विज पुरवठा दुपारी चार वाजले पासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन वेळा खंडीत झाल्याने पाणी वाटप सुरू असलेल्या स्टेशन रोड परिसर व काही उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. तर दुसरीकडे बूधवार 21 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी , कोठी व तसेच गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर , सिव्हील हडको, प्रेमदान हडको , टी.व्ही . सेंटर परिसर , म्युसिपल हाडको इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार 22 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर 22 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास शुक्रवार 23 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी सदय स्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे.

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा Read More »