DNA मराठी

Shrirampur

img 20260718 wa0002

Shrirampur Murder Case : श्रीरामपूर हत्याकांड! खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा …आमदार ओगले यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Shrirampur Murder Case : सकल श्रीरामपूरकरांच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन श्रीरामपूर येथील युवा उद्योजक स्व. आकाश दुबैय्या यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा व सरकारी वकील म्हणून खासदार उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र सुपूर्द केले. यावेळी श्रीरामपूर मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, संघटित गुन्हेगारांना मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना तडीपार करण्यात यावे तसेच पोलीस प्रशासनातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी आर्थिक हितसंबंध असून सदर पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. यावेळी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी निश्चितच ठोस कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिली.

Shrirampur Murder Case : श्रीरामपूर हत्याकांड! खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा …आमदार ओगले यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी Read More »

shrirampur band

Shrirampur Band : गुन्हेगारी विरोधात आज श्रीरामपूर बंद…

Shrirampur Band : श्रीरामपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती उच्छाद मांडला असून खून मारामाऱ्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे यातच श्रीरामपूर मधील एका हॉटेल मालकाच्या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली वाढती गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूर शहरांमध्ये आज बंद पाळण्यात आला असून यामध्ये नागरिक व्यापारी व राजकीय नेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. श्रीरामपूर मधील हॉटेल मालक आकाश दुबय्या यांच्या भर दिवसा घडलेल्या हत्याकांडामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे शहरात वाढती गुन्हेगारी व या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाळला असून आमदार हेमंत उगले नगराध्यक्ष करण ससाने यांच्यासह स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी फेरी काढून गुन्हेगारांचा विमोड करण्यासाठी साथ द्यावी असं आव्हान देखील केला आहे. तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुक्का अंतर्गत कारवाईचे करण्यात यावी अशी मागणी देखील पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे दरम्यान आकाश यांच्या कुटुंबीयांनी संबंधित गुन्हेगारावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर शहर बंद राहणार असे आवाहन सर्वपक्षीय विविध संघटनांनी केले आहे. श्रीरामपूर मध्ये अवैध धंदे गुंडांच्या टोळ्या ह्या कार्यरत असून यामुळे गोरगरिबांवती अन्याय महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत मात्र पोलिसांनी देखील योग्य वेळी कारवाई केली पाहिजे श्रीरामपूर शहराची ओळख गुन्हेगारी शहर म्हणून निर्माण होत आहे वाळूमुळे अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार होत असून शासन दरबारी हा विषय प्राधान्याने मांडू व मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्यात असल्याचे माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

Shrirampur Band : गुन्हेगारी विरोधात आज श्रीरामपूर बंद… Read More »

crime

Shrirampur News : श्रीरामपूर हादरल! शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार!

Shrirampur News : श्रीरामपूर शहरातून थरारक घटना समोर आली आहे. गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने कहाणे यांचा प्राण थोडक्यात बचावला. भररस्त्यात चालत्या वाहनावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे श्रीरामपूर परिसर खळबळ उडाली आहे. तसेच पुन्हा एकदा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यातच श्रीरामपूर मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. शिवसेना नेते प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात होते. त्याचवेळी गोंधवणी परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहनाच्या दिशेने थेट गोळीबार केला. प्रशांत कहाणे यांना संपवण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार केला होता. मात्र, सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने एक मोठी दुर्घटना टळली. प्रशांत कहाणे या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात आणि सुखरूप बचावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, गोळीबार करून पळून गेलेल्या अज्ञात हल्लेखोरांसह त्यांच्या दुचाकीचा शोध घेत आहे.

Shrirampur News : श्रीरामपूर हादरल! शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार! Read More »

img 20260410 wa0013

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

Ashok Kharat: पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यासह आणखी दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी खबरदार पुढारी या दैनिकातून पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी अशोक खरात याच्या संशयास्पद कृत्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे संतप्त झालेल्या खरातने त्या वेळेपासूनच खेमनर यांच्याविरोधात वैयक्तिक आकस ठेवला असल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर खरात याने आपल्या काही हस्तकांच्या माध्यमातून पत्रकार खेमनर यांना वारंवार धमकावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न, तसेच कायदेशीर नोटिसा पाठवून मानसिक त्रास देण्याचे प्रकारही केल्याचा आरोप होत आहे. या सर्व प्रकारामुळे खेमनर यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला.या सततच्या छळाला कंटाळून अखेर पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ची परवानगी घेतल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरात आणि त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांविरोधात पत्रकार संरक्षण कायदा, धमकावणे तसेच अब्रूनुकसानी संदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींवर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.या घटनेमुळे पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी कायदेशीर संरक्षण किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तसेच, पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या दबावाच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल Read More »

fraud

Shrirampur Crime : श्रीरामपूर पोलिसांची ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीवर कारवाई ; जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका

Shrirampur Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात ‘ग्रो इन्व्हेस्टर’ या कंपनीमार्फत अल्पवधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे. या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. कारवाईचा तपशील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर (ता. श्रीरामपूर) येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत संदिपराज मोहिणीबाई कपाटे (रा. हनुमानवाडी, भोकर शिवार) याच्या घरातून लोकांकडून पैसे स्वीकारल्याबाबतची कागदपत्रे, पासबुक, चेकबुक, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीकडे ठेवी स्वीकारण्याबाबत कोणताही अधिकृत परवाना आढळून आलेला नाही. नागरिकांना आवाहन सदरच्या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीमध्ये ज्या नागरिकांनी जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गुंतवले असतील, त्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुलभ होण्यासाठी त्वरित श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह आपला जबाब नोंदवावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सतर्क राहा, सुरक्षित राहा असे आवाहन श्रीरामपूर पोलिसांनी केले आहे.

Shrirampur Crime : श्रीरामपूर पोलिसांची ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीवर कारवाई ; जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका Read More »

bunty jahagirdar

Bunty Jahagirdar Death: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण; दोन्ही आरोपींना अटक

Bunty Jahagirdar Death: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील बंटी जहागीरदार याच्यावर 31 डिसेंबर रोजी दोन जणांनी गोळीबार केल्याने उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे. भर दिवसा जिल्ह्यात गोळीबार झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या धक्कादायक घटनेचा गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बंटी जहागीरदार अंत्यविधीतून घरी जात असताना 31 डिसेंबरच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पीटल जवळ दोन जणांनी गोळीबार केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्याचा मृत्यू झाला. तसेच त्याच्यासोबत असणारा अमिन गुलाब शेख हे जखमी झाले असून त्यांचेवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 103,109,3(5) तसेच आर्म्स अॅक्ट कलम 3/25 अंतर्गत दोन अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पोलीसांचे 3 पथके यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाणा करण्यात आलेले होती. रात्री उशिरा या गुन्हयातील दोन्ही आरोपी ताब्यात घेतले आहेत त्यांनी गुन्हयाची कबुली दिलीली असुन दोघांनाही सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. कृष्णा अरुण शिनगारे, (वय 23 वर्षे), रविंद्र गौतम निकाळजे (वय 23 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. गुन्हयाच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल विचारपुस करण्यात येत आहे. गुन्हयात वापरलेले शस्त्र आरोपींनी कोठुन आणली? गुन्हयाचा प्लॅन कसा केला? गुन्हयामध्ये अन्य कोणी अरोपी सामील आहेत किंवा कसे ? व गुन्हा करण्यामागे नेमके कारण काय. याबाचीचा पोलीस सखोल तपास करत आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर देखील पोलीसांचे बारकाईने लक्ष असून, कोणीही घटनेसंबधाने आक्षेपार्य वा आपत्ती जनक पोस्ट शेअर केल्यास वा घटनेबाबत कोणीही चुकीची माहिती प्रसारित केल्यास किंवा अफवा पसरविल्यास त्यांचेवर देखील पोलीसांकडून कारवाई करण्यात येईल अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Bunty Jahagirdar Death: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण; दोन्ही आरोपींना अटक Read More »

bunty jahagirdar

Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात भर दिवसा गोळीबार ; बंटी जहागीरदारचा मृत्यू

Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान जर्मन हॉस्पिटल जवळ दोन अज्ञात हल्लेखोराकडून हाजी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. तीन ते चार गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान दुपारी झालेल्या गोळीबारानंतर जखमी जहागीरदार यांना तातडीने कामगार हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात असता त्यावेळी त्यांच्या समर्थकांचा मोठा जमाव हॉस्पिटल परिसरात जमला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांना पुढील उपचाराकरिता नगर येथील हॉस्पिटल मध्ये पाठवले हे. दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी हल्लेखोरांनी जहागिरदार यांच्यावर गोळीबार केला.गोळीबाराचा आवाज ऐकताच नागरिकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. गोळीबाराची माहिती कळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात आरोपींच्या शोधासाठी नाकेबंदी केली असून गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपूर पुन्हा एकदा हादरले आहे. श्रीरामपूर मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून , परिस्थितीवर पोलिस लक्ष ठेवून आहेत.

Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात भर दिवसा गोळीबार ; बंटी जहागीरदारचा मृत्यू Read More »

bunty jahagirdar

Bunty Jahagirdar : मोठी बातमी; श्रीरामपूर हादरले, बंटी जहागीरदारवर भरदिवसा गोळीबार

Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात भर दिवसा गोळीबाळ झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बंटी जहागिरदार यांच्यावर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून बंटी जहागीरदार यांना 3 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज (30 डिसेंबर) दुपारी एका अंत्यविधीतून परत येत असताना त्यांच्यावर शहरातील जर्मन हॉस्पीटल समोर 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत दोन्ही आरोपी फरार झाले. गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांना उपचारासाठी शहरातील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आता पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगरमध्ये आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिस आरोपींचा शोध घेत असून सोशल मीडियावर आरोपींचे फोटो व्हायरल झाले आहे.

Bunty Jahagirdar : मोठी बातमी; श्रीरामपूर हादरले, बंटी जहागीरदारवर भरदिवसा गोळीबार Read More »

श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही

Vikhe Patil: येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर येथे तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तहसीलदार मिलिंद वाघ आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जलजीवन मिशनचे काम करतांना पाण्याचे स्त्रोत शोधल्यानंतर पाईप खरेदी करावी. उन्हापासून पाइप खराब होऊ नयेत यासाठी पाईप बंदीस्त ठिकाणी ठेवावेत. जलजीवन मिशनच्या कामात गुणवत्ता ठेवावी. कामात अनियमितता करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांच्या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निकृष्ट कामांची, अनियमितेची चौकशी करण्यात यावी. त्रुटींची दुरूस्ती करून पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण कराव्यात. ज्या गावांना पाणीपुरवठा योजना सुरू आहेत त्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची गरज पडू नये, असेही त्यांनी सांगितले. महावितरण कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेत येत्या काळात सर्वच शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेत सौर फिडर केंद्रांसाठी जिल्ह्यात 3 हजार एकर शासकीय जमीन देण्यात आली आहे. कुसुम’ आणि ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सोलर पंप वितरित करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तालुक्यातील नादुरुस्त उपकेंद्रांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील महावितरणच्या प्रलंबित कामांना जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून 40 कोटी रूपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. गावठाण जमीनीवर असलेले घरकुल नियमित करण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात 20 लाख घरकुले बांधण्यात येणार आहेत. यासर्व घरांना सोलरद्वारे विज दिली जाणार आहे . श्रीरामपूर तालुक्यासाठी जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या योजनेत तालुक्यातील गावांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीचा पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. या बैठकीला महसूल, पंचायत समिती, ग्रामीण रस्ते, जलसंधारण अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही Read More »

Shrirampur News : ‘या’ भागात पोलिसांची मोठी कारवाई, 7 गोवंशीय जनावरांची सुटका

Shrirampur News : श्रीरामपूर शहर पोलीसांनी मोठी कारवाई करत कत्तली करीता बाधुन ठेवलेल्या 7 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून तब्बल 4 लाख 50 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च 2024 रोजी पोनि, नितीन देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की, वार्ड क्र 2 मध्ये पाण्याच्या टाकीजवळ श्रीरामपूर येथे गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्यासाठी आणली आहे. या माहितीवरून नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी तात्काळ तपास पथकास पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने सदर ठिकाणी जाऊन तपास केला असता त्यांना गोवंशीय जातीचे जनावरे मिळून आले.   या प्रकरणात तपास करत पोलिसांनी शहारुख हसन कुरेशी विरोधात  श्रीरामपूर शहर पो.स्टे. मध्ये  महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे मुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9, सह महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 (च) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.   दाखल गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शफिक शेख हे करीत आहेत. 

Shrirampur News : ‘या’ भागात पोलिसांची मोठी कारवाई, 7 गोवंशीय जनावरांची सुटका Read More »