Shrirampur News : श्रीरामपूर शहर पोलीसांनी मोठी कारवाई करत कत्तली करीता बाधुन ठेवलेल्या 7 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून तब्बल 4 लाख 50 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च 2024 रोजी पोनि, नितीन देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की, वार्ड क्र 2 मध्ये पाण्याच्या टाकीजवळ श्रीरामपूर येथे गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्यासाठी आणली आहे.
या माहितीवरून नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी तात्काळ तपास पथकास पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने सदर ठिकाणी जाऊन तपास केला असता त्यांना गोवंशीय जातीचे जनावरे मिळून आले.
या प्रकरणात तपास करत पोलिसांनी शहारुख हसन कुरेशी विरोधात श्रीरामपूर शहर पो.स्टे. मध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे मुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9, सह महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 (च) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दाखल गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शफिक शेख हे करीत आहेत.