DNA मराठी

Shivsena

thackeray

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध

Raj Uddhav Thackeray Interview : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत नुकतीच चित्रित झाली आहे. ही ‘दणदणीत आणि खणखणीत’ मुलाखत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीचा टीझर ‘सामना’च्या अधिकृत X हँडल (@SaamanaOnline) वर शेअर करण्यात आला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे म्हणतात, “राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये!” तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नयेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे. मुलाखतीचा पहिला भाग गुरुवार, 8 जानेवारी 2026 रोजी ‘सामना’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित होणार आहे. ही संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याचे प्रतीक मानली जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने तसेच भाजप – शिवसेना शिंदे गट युतीसह आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध Read More »

eknath shinde

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

Eknath Shinde: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रोहन बोंबे, शिवन्या बोंबे व भागुबाई जाधव यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.   आमदार शरद सोनवणे व युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पीडित कुटुंबीयांना ही मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून ही घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली. नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या तीन घटनांमध्ये पिंपरखेड गावातील रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव अशा तीन जणांचा मृत्यू झाला होता. बिबट्या नरभक्षक झाल्याने गावात सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेरीस वन विभागाने या बिबट्याला ठार करून पिंपरखेड वासियांची या भीतीच्या सावटातून मुक्तता केली. मात्र त्यानंतर या घटनेची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच बिबट्यांच्या त्रासातून कायमस्वरूपी सुटका केली जाईल असे सांगून या ग्रामस्थांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. आज ही मदत सुपूर्त केल्यानंतर या तिन्ही पीडितांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच या घटनेनंतर केलेल्या आंदोलनामुळे ग्रामस्थांवर दखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करू असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले. झालेली घटना अत्यंत दुर्देवी असून गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नसली तरीही शिवसेना मात्र कायम आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे बोलताना या ग्रामस्थांना सांगितले. यावेळी युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे,पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, निरगुडसरचे सरपंच रविंद्र वळसे पाटील, वैभव पोखरकर, युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत, श्रीकांत लोखंडे, किरण ढोबळे, माजी सरपंच नरेश ढोमे, उपसरपंच विकास वरे, कैलास बोंबे, सोपान गावशेते, लक्ष्मण गायकवाड, माऊली ढोमे यांच्यासह शिरूर व आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच पिंपरखेडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात Read More »

election

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली?

Ahilyanagar Politics : महानगरपालिकेच्या 2025 च्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे राजकारणाच्या आरशात पाहण्याचा योगच जणू. दिवसभर शहरातील प्रभागांमधून फिरताना परिचित चेहरेच अधिक दिसत होते. ओळखीची माणसे, ओळखीचे चेहरे, काहींची पक्षनिष्ठाही माहीत होती. मात्र, संध्याकाळपर्यंत एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कोण कुठल्या पक्षाचा आहे, हेच समजत नव्हते. चहाच्या टपरीवर बसलेला एकजण आत्मविश्वासाने सांगत होता, मी अमुक पक्षाचा आहे. तेवढ्यात त्याला फोन आला, तो उठून गेला. चहा संपवून आम्ही निवडणूक कार्यालयाकडे येताना पुन्हा तोच भेटला आणि सहजपणे म्हणाला, “मी दुसऱ्याच पक्षातून फॉर्म भरला आहे.” ही एखादी अपवादात्मक घटना नव्हती. मागील पाच-सहा दिवसांत अशा अनेक कथा ऐकायला मिळाल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी—महायुती असो वा महाविकास आघाडी—सर्वच ठिकाणी चेहरे तेच, फक्त झेंडे बदललेले. या पक्षांतरांच्या खेळात एक वाक्य मात्र सर्वत्र समानपणे ऐकू येत होते… “जनतेच्या कल्याणासाठी, प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी मी पक्ष बदलत आहे…. विरोधक असो वा सत्ताधारी, मोठा नेता असो वा स्थानिक इच्छुक हे वाक्य इतक्या गोडपणे, इतक्या सहजपणे उच्चारले जात होते की तेच जणू निवडणूक घोषवाक्य बनले होते. मात्र या घोषणांच्या आड एक कटू सत्य दडलेले होते….. जनतेच्या प्रश्नांचा उल्लेख कुठेच नव्हता. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, शिक्षण—अहिल्यानगरच्या नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांवर एकही ठोस चर्चा ऐकू आली नाही. सत्तेत असलेले अचानक विरोधक झाले, विरोधक सत्तेच्या जवळ गेले. निवडून आल्यावर आपण कोणत्या पक्षात असू, हे सांगण्याचीही तयारी अनेकांची नव्हती. आजचा विरोध उद्याचा सत्ताधारी होऊ शकतो, हीच जणू राजकीय हमी बनली आहे. या सगळ्या धावपळीत एक गोष्ट ठळकपणे दिसली निवडणूक म्हणजे सार्वजनिक सेवेचा नव्हे, तर वैयक्तिक आणि कौटुंबिक व्यवस्थापनाचा प्रकल्प बनला आहे. कधी स्वतःसाठी, कधी पत्नीकरिता, कधी मुला-मुलीसाठी, कधी सुनेसाठी, तर कधी नातवासाठी जागा सुरक्षित करण्याची धडपड सुरू आहे. राजकारणाचा वारसा जपताना शहराचा वारसा मात्र दुर्लक्षित राहतो आहे. लोकशाहीत निवडणूक ही जनतेसाठी असते, हे तत्वज्ञान कागदावरच उरले आहे का, असा प्रश्न पडतो. ज्यांच्या नावाने उमेदवारी मागितली जाते, ती जनता या सगळ्या प्रक्रियेत अदृश्य आहे. राजकीय गणिते जुळवताना सामाजिक वास्तव विसरले गेले आहे. अहिल्यानगरच्या या निवडणुकीत पक्षांतरांचा गोंधळ जितका वाढतो आहे, तितकीच जनतेची विश्वासार्हता कमी होत आहे. शेवटी प्रश्न एवढाच उरतो. या निवडणुकीत जिंकणार कोण? पक्ष, उमेदवार की राजकीय घराणी? आणि हरलेली कोण? तर ती जनता, जिने पुन्हा एकदा विकासाच्या नावावर आश्वासनांची पिशवी खांद्यावर घेतली आहे. लोकसत्तेच्या परंपरेतून पाहिले तर ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर लोकशाहीच्या आत्म्याची कसोटी आहे.

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली? Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी शरद पवार गट 32, शिवसेना ठाकरे गट 24 आणि काँग्रेस 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून लढणार असून ज्या ठिकाणी डबल एबी फॉर्म दिले गेले ते विथड्रवाल करणार येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये युतीची घोषणा झाली असून भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीमधून बाहेर होण्याची घोषणा केली आहे. शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट स्वबळावर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरू होती मात्र जागावाटपावरून मतभेद झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे एमआयएम आणि मनसे देखील अहिल्यानगर महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर Read More »

img 20251224 wa0027

Maharashtra Election : ठाकरे बंधू एकत्र अन् काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत आघाडी जाहीर

Maharashtra Election : शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महानगर पालिका निवडणुकीसाठी युती झाली असून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेसने देखील मोठा निर्णय घेत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षासोबत आघाडी जाहीर केली आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी माहिती दिली आहे. टिळक भवन येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे अशा प्रसंगी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आघाडीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती पण सातारा, सांगली तसेच मराठवाडा व विदर्भात एकत्र निवडणुका लढलो आहोत आणि तीच भूमिका आज पुढे घेऊन जात आगामी काळात सोबत राहण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यावेळी म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन काम करत असताना समविचारी पक्षांनी एकत्र असावे या भावनेतून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजीच झाली आहे. राहुल गांधी हे देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब, मागासवर्गीय यांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा आजघडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे तसेच सामान्य लोकांना मान सन्मान मिळाला पाहिजे, असे जानकर म्हणाले.. शिवसेना मनसे युतीला शुभेच्छा.. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, त्यांच्या युतीला आमच्या सदिच्छा व शुभेच्छा आहेत, आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढली पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यानुसार पक्षाने निर्णय घेतला आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश मोठं आहे. महायुतीने साम, दाम, दंड, भेद नितीचा खुलेआम वापर केला, सोबतीला प्रशासन व निवडणूक आयोग होता, तरीही काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने व निष्ठेने लढला. अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो त्याचा फायदा काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत झाला, असेही सपकाळ म्हणाले. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ४१ नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ४१ आकड्याच्या आकाराचा पुष्पगुच्छ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिला.

Maharashtra Election : ठाकरे बंधू एकत्र अन् काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत आघाडी जाहीर Read More »

mahayuti

Maharashtra Election: नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 207 जागांवर मारली बाजी

Maharashtra Election 2025 : राज्यातील 288 नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांनी शानदार कामगिरी केली आहे. भाजपने सर्वात जास्त 120 पेक्षा जास्त जागा जिंकले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 44 जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँगेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. कोणाला किती जागा मिळाल्या? महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (EIC) रविवारी रात्री उशिरा निवडणुकीच्या निकालांचे अंतिम आकडे शेअर केले. आकडेवारीनुसार, भाजप 117 जागा जिंकून सर्वात मोठा विजयी ठरला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 53 जागांसह आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 37 जागांसह स्थान मिळवले. महायुती आघाडीमध्ये काँग्रेसने 28 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7 जागा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या. इतर नोंदणीकृत पक्षांनी 4 जागा जिंकल्या, मान्यता नसलेल्या नोंदणीकृत पक्षांनी 28 जागा जिंकल्या आणि अपक्ष उमेदवारांनी 5 जागा जिंकल्या. महाराष्ट्रातील 288 नगरपरिषदा आणि नगरपरिषदेच्या जागांसाठी 2 आणि 20 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. इतर दोन नगरपरिषदांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निकालांवरून राज्यात महायुती आघाडीची स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट होते. विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगावर आरोप दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांनी निवडणूक आयोगावर महायुती आघाडीला विजय मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. प्रदेश काँग्रेस प्रमुख हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप मित्रपक्षांना इशारा देत म्हटले आहे की, “भाजपचे यश एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी धोक्याची घंटा आहे. भाजप या दोन्ही मित्रपक्षांना 100% बाहेर काढेल” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Maharashtra Election: नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 207 जागांवर मारली बाजी Read More »

manikrao kokate

Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Manikrao Kokate : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर केली. मात्र या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे आदेश दिले आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा निर्णय माणिकराव कोकाटे यांची 2 वर्ष कारावासची शिक्षा कायम ठेवली होती. या प्रकरणात शिक्षा कायम असल्याने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिल्यानंतर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा Read More »

bhaskar jadhav

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Bhaskar Jadhav : महाराष्ट्र विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार मात्र यापूर्वीच सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अधिवेशनाच्या तारखेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. सत्ताधारी पक्ष कशाप्रकारे गृहीत धरून चालू शकतो याचा हे उदाहरण म्हणजे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आज कामकाजा सल्लागार समितीची मीटिंग झाली. यामध्ये हिवाळी अधिवेशना संदर्भात चर्चा झाली. 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर अशी तारीख दिली होती. दोन आठवड्याच्या ऐवजी तीन आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता. तिने नाही तर निदान ठरल्याप्रमाणे दोन आठवडे तरी घ्या  पण सरकारने मान्य केले नाही आणि अधिवेशन 14 तारखेला ठरलं. सत्ताधारी पक्ष संख्येने भरपूर आहे. परंतु विरोधकांच्या पक्षांना सामोर जाण्याचे त्यांच्या धाडस नाही. सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त असला तरी विरोधी पक्षाच्या भडीमरा पुढे आणि त्यांच्या प्रश्नांपुढे उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाहीत म्हणून सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवत गेला तयार नाही. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष जाहीर करावा असा आग्रह आम्ही त्यांना करत आहोत असं माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले. तसेच मी कोणावरही नाराज नाही मी कुठेही नाराज नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.   तर दुसरीकडे  मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणुका पुढे ढकलण्याचा घोषित करतात आणि काल दुपारी सांगतात मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. या लोकशाहीची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि स्वायत्त संस्था हे नावाला असलेले निवडणूक आयोग करत आहे. हे आयोग आयोग फक्त कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करणारे झालेले आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगावर केली.

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल Read More »

yeola election

Yeola Election : येवला निवडणूक प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी दिला चोप

Yeola Election : येवला येथे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले यानंतर परिसरात तुफान राडा पहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटाच्या रुपेश दराडे यांचा कार्यकर्ता येवला येथील निवडणूक केंद्राच्या जवळच पैसे वाटप करत होता असा आरोप नागरिकांकडून करण्यात आले आहे. यानंतर नागरिकांनी कार्यकर्त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 94 हजार रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली असून आणखी रक्कम कुठे याचा तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाने दखल घेत येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी  शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 21 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Yeola Election : येवला निवडणूक प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी दिला चोप Read More »

hemant patil

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप

Hemant Patil on Ashok Chavan : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुतीमधील अनेक पक्ष या निवडणुकीत स्वयंबळावर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी थेट अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मी म्हणेल तसेच जिल्ह्याने चालावे, या भूमिकेमुळेच चव्हाण यांनी युती तोडली, असा आरोप पाटील यांनी केला. शिवसेनेच्या आमदारांनी 60-20 टक्के जागा वाटपाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे जिल्ह्यातील तीनही आमदार यांनी दोन वेळा चव्हाण यांची भेट घेतली, पण त्यांनी जागा देण्यास नकार दिला. पैशाच्या जोरावर कार्यकर्ते आणि पक्ष संपवण्याचा प्रयोग नांदेडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोपही हेमंत पाटील यांनी केला आहे. मोठ्या निवडणुकांसाठी युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत युती तोडायची, ही पद्धत चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले. तर दुसरीकडे राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप Read More »