DNA मराठी

Shivsena

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : चंद्रपूरच्या जनतेची इच्छा महापौर भाजपाचा व्हावा; बावनकुळे स्पष्टच बोलले

Chandrashekhar Bawankule : चंद्रपूर महापालिकेत कुणाचा महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेससह भाजप देखील महापौर पदासाठी प्रयत्न करत असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरच्या जनतेची इच्छा महापौर भाजपाचा व्हावा असं म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,  आज किंवा उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि कोर कमिटी बैठक होणार असून त्यामध्ये गट नोंदणीवर निर्णय होणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमत कोणाकडेच नसल्याने त्या ठिकाणी मोठा पेच आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने चंद्रपूरच्या जनतेची इच्छा आहे. महापौर भाजपाचा व्हावा त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून मोठा सहकार्य मिळेल असा एक सूर आहे. त्यावर आम्ही करत आहोत. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही महापौर बनविण्यासाठी काम करू असं देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई महापालिकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संघर्ष किंवा स्पर्धा नाही तर चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे, अजित पवार एकत्र बसून योग्य पद्धतीने राज्यातील 29 पालिकेत महायुतीचा महापौर बसेल असा आमचा प्रयत्न राहील असेही यावेळी बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : चंद्रपूरच्या जनतेची इच्छा महापौर भाजपाचा व्हावा; बावनकुळे स्पष्टच बोलले Read More »

maharashtra government

Maharashtra Government: विरोधी पक्षनेत्यासाठी 10 टक्के आमदारांची अट; सरकार आणणार कायदा?

Maharashtra Government: विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांच्या संख्येबाबत स्पष्टता आणण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कायदा आण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेता पद रिक्त असून, यावरून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी तसेच भविष्यात ठोस नियमावली असावी, यासाठी पाऊल उचलली जात आहे . येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती विधानभवनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी विरोधी पक्षनेत्यासाठी किमान १० टक्के, म्हणजेच सुमारे २९ आमदारांचे संख्याबळ आवश्यक असावे, अशी भूमिका आहे. मात्र, राज्यात याबाबत सध्या कोणताही कांयदा किंवा निकष नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाला हे संख्याबळ मिळाले नाही. सध्याच्या संख्याबळानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे २०, काँग्रेसकडे १६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे १०, तर शेतकरी कामगार पक्षाकडे २ आमदार आहेत. परिणामी, विधानसभेत विरोधी पक्षनेता पद अद्याप रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने हा विषय कायद्याच्या चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १९६२, १९६७ आणि १९७२ या विधानसभा निवडणुकांमध्येही विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. मात्र, त्या वेळी विधानसभेच्या अध्यक्षांनी विशेषाधिकारांचा वापर करून सर्वाधिक आमदार असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला विरोधी पक्षनेता पद दिले होते. राजकीय वर्तुळात, विरोधी पक्षनेता पदावरून होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप टाळण्यासाठी आणि निर्णयप्रक्रियेत स्पष्टता आणण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचे बोलले जात आहे. या कायद्यामुळे भविष्यात विरोधी पक्षनेत्याची निवड ही राजकीय निर्णयावर नव्हे, तर स्पष्ट कायदेशीर तरतुदींवर आधारित राहु शकते. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक आमदारसंख्या निश्चित करणारा कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात  मांडला जातो का हे पाहणे महत्वाचे असेल.

Maharashtra Government: विरोधी पक्षनेत्यासाठी 10 टक्के आमदारांची अट; सरकार आणणार कायदा? Read More »

sanjay raut

Sanjay Raut on BMC Election : भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, खासदार राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut on BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यामुळे आता मुंबई महापालिकेत भाजपचा पहिल्यांदा महापौर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्व गटांनी ठरवले असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही हा त्यांचा प्रश्न त्यांचा पक्ष भाजपचा अंगवस्त्र आहेत, अमित शहा त्यांचे प्रमुख, ते त्यांच्याकडे जाऊन मागणी करतील, मात्र फडणवीस ऐकणार नाही अशी माझी माहिती आहे. त्यांनी आपले नगरसेवक बंद ठेवलेत, त्यांनी आमदार फोडले, त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात, ते आमदार सुरतला घेऊन गेले होते. एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री तरी त्यांना वाटत आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती ही किती मोठी हस्यजत्रा आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवलं आहे बघू काय होईल. जे नगरसेवक आहेत त्यात बरेच नवे चेहरे, ते शिवसैनिक आहेत, त्यांना वाटत भाजपचा महापौर होऊ नये त्यांना कितीही कोंडला तरी खूप साधन आहे. दळणवळणाची साधन आहे, संदेश काही जाऊ शकते. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महत्व महापौर बसू शकतो. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहे, आम्ही तथास्थ होउन पाहतोय, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा फोन झाला आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्य त्यांचे तरी नगरसेवकांना कोंडून ठेवले, स्वतःला भाई म्हणून घेणारे एकनाथ शिंदेंनी नगरसेवक कोंडून ठेवले. महापौर शिवसेनेचा असतो, डूब्लिकेट शिवसेनेचा नाही, ती अमित शाह यांची सेना आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला महापौर शिवसेनेला पाहिजे, असायला हवा ते आम्ही पाहू, मात्र शिंदेंनी मुंबई भाजपला दिली. 29 नगरसेवक कोंडले तो मराठी अस्मितेचा कोंडमारा, एकनाथ शिंदे सोडले तर हे कोणालाच फरक पडणार नाही.

Sanjay Raut on BMC Election : भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, खासदार राऊत असं का म्हणाले? Read More »

jalna election

Jalna Election: पहिल्याच निवडणुकीत जालना महापालिकेवर भाजपचा झेंडा; 41जागांवर मारली बाजी

Jalna Election : नव्याने झालेल्या जालना शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या महापालिकेवर तब्बल 41 जागा मिळवत भाजपने इतिहासात पहिल्यांदाच आपला झेंडा रोवला आहे. जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मनसेची युती करत 55 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे सेना यांनी महाविकास आघाडी कायम ठेवत निवडणूक लढविली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे सेनेला या महापालिकेत आपले खातेही उघडता आलेले नाही तर मनसेची ही अवस्था यापेक्षा वेगळे राहिलेली नाही. या संपूर्ण जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना तसेच काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढती झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या त्यात भाजपाच्या उमेदवारांची सरशी झाली. जालना महापालिकेचा पहिला महापौर भाजपाचा होणार असल्याने जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांचे वजन पक्षश्रेष्ठींकडे आपसुकच वाढले आहे. या निवडणुकीत भाजपला 41 जागा, शिवसेनेला 12 काँग्रेसला 09, एमआयएमला 02 आणि अपक्ष 01 जागी निवडून आला आहे. या निवडणुकीत एकूण स्थिती पाहता भाजपने महापालिकेत एक हाती सत्ता मिळविल्याचे दिसून येत आहे.

Jalna Election: पहिल्याच निवडणुकीत जालना महापालिकेवर भाजपचा झेंडा; 41जागांवर मारली बाजी Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: राज्यात राजकीय भूकंप, शरद पवार अजित पवार एकत्र येणार? CM फडणवीसांनी दिले संकेत

Maharashtra Politics : उद्या होणाऱ्या 29 महापालिका निवडणुकीसाठी महायुती मधील घटक पक्षांनी स्वयबळावर निवडणूक लढवण्याचे निर्णय अनेक महापालिकेत घेतल्याने या निवडणुकीनंतर राज्यात महायुती तुटणार का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भविष्यात दोन्ही पवार गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार फक्त दोन पक्ष म्हणून युती करून निवडणुका लढवत आहेत. ते अधिकृतपणे विलीन झालेले नाहीत. ही स्थानिक घडामोड आहे. दोन्ही पक्षांचे नेते त्यांच्या समर्थकांना एकजूट ठेवण्यासाठी एकत्र लढत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे उदाहरण दिले, जेव्हा शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणाले, 2019 चा अनुभव लक्षात घेता, मी कोणतीही राजकीय शक्यता नाकारत नाही. जर ते भविष्यात एकत्र आले तर आम्ही त्यावेळी त्याचा विचार करू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन्ही पवार गट अलिकडेच एकत्र आल्याने अंतर्गत समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळाले आहेत. जरी दोन्ही गट राज्य पातळीवर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी, स्थानिक निवडणुकांमधील ही युती अनेक राजकीय प्रश्न उपस्थित करत आहे. फडणवीस यांनी संकेत दिले की ही युती मोठ्या राजकीय बदलाचे संकेत देणारी नसून स्थानिक पातळीवर पक्ष समर्थकांना एकत्र ठेवण्याची रणनीती असू शकते. महायुतीवर विश्वास निवडणूक प्रचारानंतर, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेली सत्ताधारी महायुती मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक यासारख्या प्रमुख महानगरपालिका जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. त्यांनी मान्य केले की महाराष्ट्रात युतीचे राजकारण नेहमीच अप्रत्याशित राहिले आहे आणि भविष्यात, विशेषतः प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय निवडणुका जवळ येत असताना, नवीन समीकरणे उदयास येऊ शकतात.

Maharashtra Politics: राज्यात राजकीय भूकंप, शरद पवार अजित पवार एकत्र येणार? CM फडणवीसांनी दिले संकेत Read More »

Eknath Shinde: 11 दिवसांत 51 ठिकाणी प्रचार सभा अन् रोड शो ; एकनाथ शिंदेंचा झंझावाती प्रचार

Eknath Shinde: मुंबईसह राज्यातील २८ महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात झंझावाती प्रचार केला. राज्यभरात मागील १० दिवसांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ५१ ठिकाणी प्रचार केला. यात २९ प्रचार सभा आणि २५ रोड शोमध्ये त्यांनी सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारा दरम्यान शिवसेनेच्या १४ शाखांना भेट दिली. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या रोड शोला जनतेमधून तुफान प्रतिसाद मिळाला. राज्यात शिवसेना भाजपसोबत महायुतीमध्ये तर काही ठिकाणी स्वबळावर लढत आहे. अमरावती आणि अकोला येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सभा घेतल्या. तसेच छत्रपती संभाजी नगर, मीरा भाईंदर, नाशिक, कोल्हापूर, उल्हासनगर, कल्याण येथेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सभा घेतल्या. मुंबई आणि ठाणे महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे महायुतीच्या उमेदवारांसाठी रोड शो, प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नवी मुंबई महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढत असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या भागांमध्ये रोड शो केले. तसेच वरळी डोम येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि शिवाजी पार्क येथे महायुतीच्या मुंबईतील जाहीर सभेत ते सहभागी झाले होते. ३ जानेवारी ते १३ जानेवारी या ११ दिवसांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी २९ जाहीर सभा, २५ रोड शो आणि १४ शाखांना भेट दिली.

Eknath Shinde: 11 दिवसांत 51 ठिकाणी प्रचार सभा अन् रोड शो ; एकनाथ शिंदेंचा झंझावाती प्रचार Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंकडून CM फडणवीसांची मिमिक्री अन् मुख्यमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता अंतिम टप्प्यात प्रचार आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेत शिवसेना ठाकरे गट वर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीवर देखील प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 15 जानेवारी रोजी होणारी निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे, मराठी लोकांसाठी नाही. तसेच फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केल्याबद्दल टीका केली आणि म्हटले की त्यांचे काका राज ठाकरे हे एक चांगले मिमिक्री करणारे आहेत आणि म्हणूनच त्यांचा पक्ष सध्याच्या स्थितीत आहे. ठाकरे बंधूंच्या एकतेवर टीका शिवाजी पार्क येथे महायुती आघाडीच्या मेळाव्याला संबोधित करताना फडणवीस यांनी जुने व्हिडिओ दाखवले. या व्हिडिओंमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत, तर आता 20 वर्षांनंतर ते हात मिळवताना दिसत आहेत. फडणवीस म्हणाले, “ही निवडणूक मुंबई किंवा मराठी लोकांसाठी नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे.” त्यांनी विश्वास व्यक्त केला की महायुती बीएमसी जिंकेल. या रॅलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकांचे वर्णन “मराठी माणसाची शेवटची निवडणूक” असे केले होते. फडणवीस यांनी असे उत्तर दिले की ठाकरे कुटुंबाची राजकीय विश्वासार्हता येथे पणाला लागली आहे. ते म्हणाले की मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि कोणीही त्याला वेगळे करू शकत नाही. फडणवीस यांनी मुंबईत महायुतीचा महापौर नियुक्त करण्याचे आणि पारदर्शक कारभार आणण्याचे आश्वासन दिले. शहराचा कायापालट करण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. हिंदी आणि धारावीवरील हल्ला फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटले की, हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय याच सरकारने घेतला होता. धारावी पुनर्विकासाची निविदाही याच सरकारने रद्द केली होती. आता, अदानी समूह आणि राज्य सरकार संयुक्तपणे धारावीला आधुनिक टाउनशिपमध्ये रूपांतरित करत आहेत. भाषेच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की महाराष्ट्रात फक्त मराठी ही सक्तीची भाषा आहे.

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंकडून CM फडणवीसांची मिमिक्री अन् मुख्यमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर Read More »

sanjay shirsat

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील हा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यात तो एक नंबरचा माहीर आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, ते कार्यकर्ते याच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे होते. मात्र इम्तियाज जलीलने पैसे घेऊन तिकीटे विकली आणि त्या कार्यकर्त्यांना देशोधडीला लावले. त्यामुळेच आज कार्यकर्ते आपला संताप व्यक्त करत आहेत. “जैसी करणी, वैसी भरणी” हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळाले आहे. जे “शेर आया, शेर आया” म्हणत होते, त्याच इम्तियाज जलीलला आज पळावे लागत आहे. “जनता मेरे साथ है” म्हणणारा आज शेपूट घालून पळत आहे, आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. इम्तियाज जलीलने जे केले, त्याची किंमत त्याला मोजावी लागत आहे. पोलीस संरक्षणात गुंड पाठवण्याची गरज नाही. ज्यांनी दगडफेक केली किंवा हल्ला केला, त्यांना पोलिसांनी पकडून का मारले याची चौकशी केली पाहिजे. “माझे कोणी वाकडे करू शकत नाही, ओवेसी माझ्यासोबत आहे,” अशी जी इम्तियाज जलीलची मस्ती होती, त्याचे उत्तर आज त्याला मिळाले आहे. ओवेसी भडक भाषण करून मुस्लिम समाज माझ्यासोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत, मात्र त्याला उत्तर कार्यकर्त्यांनी आधीच दिले आहे.

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले Read More »

imtiaz jaleel

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा

BJP MIM Alliance: राज्यातील राजकारणात चर्चेत आलेल्या अकोट नगरपालिकेत आज मोठी राजकीय घडामोडी घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष अकोटकडे लागले आहे. अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने शहरातील विकासासाठी अकोट विकास आघाडीची स्थापना करत भाजपने एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह युती केली आहे. भाजपने थेट एमआयएमशी युती केल्याने विरोधक भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर युती झाली असून स्थानिक पातळीवर ज्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपसोबत युती मान्य नसून युती तोडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अकोटमध्ये भाजपशी युती होणार नाही. युती तोडण्याचे आदेश दिले आहे. असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र

Maharashtra Politics : एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 29 महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे नुकतंच अकोट पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. अकोट येथे नुकतंच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकले होते मात्र बहुमतपासून पक्ष दूर होता. तर आता अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पुढाकाराने एक आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीमध्ये एमआयएमला देखील स्थान देण्यात आल्याने विरोधकांकडून आता भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने या आघाडीत एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्थान दिले आहे. तर वंचित आणि काँग्रेसला या आघाडीपासून दूर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता या आघाडीवर एमआयएम आणि भाजपच्या वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोट नगरपालिका एकूण जागा : 35 निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार) पक्षीय बलाबल : भाजप : 11 काँग्रेस : 6 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 वंचित : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3 एमआयएम : 5 भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या ‘अकोट विकास मंचा’चे पक्षीय बलाबल : भाजप : 11 एमआयएम : 5 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र Read More »