DNA मराठी

#SawediLandFraud

shocking turn in the sawedi land scam

Sawedi land Scam : सावेडी भूखंड घोटाळ्याला धक्कादायक वळण! दबाव, मुखत्यार, आणि सुनावणीचा गोंधळ; मूळ मालकाचा ठावठिकाणा नाही

Sawedi land Scam l या प्रकरणात मूळ जमीन मालक कोण, आणि खरे घेणारे-देणारे कोण? याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही बाजूंना उद्यापर्यंत त्यांचे लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, आता अप्पर तहसीलदार काय अहवाल पाठवणार हे अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अहमदनगर – सावेडी येथील तब्बल १.३५ हेक्टर भूखंडावर (सर्वे नं. २४५/ब-१ व २४५/ब-२) गेले ३५ वर्षे कोणताही अधिकृत व्यवहार न झालेली जमीन अचानक चर्चेत आली आहे. अलिकडच्या काळात या जमिनीवर कोट्यवधींचा व्यवहार करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली असून, यासाठी महसूल विभागावर दबाव आणल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. या प्रकरणात आधी नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी वस्तुनिष्ठ चौकशी सुरू करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले. मात्र या तपासाला अचानक वेगळे वळण देत, प्रकरण अप्पर तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्या कक्षात वर्ग करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता अप्पर तहसीलदार कार्यालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर, मंडळ अधिकारी सावेडी, तलाठी सावेडी, तसेच डायाभाई कुटुंबीय, रमाकांत नामदेव सोनवणे, गणेश शिवराम पाचरणे (मुखत्यार) यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. काहींनी आपली बाजू तोंडी मांडली तर काहींनी लेखी युक्तिवाद सादर केला. डायाभाई यांच्या वारसांनी ‘आमच्याशी न बोलता जमिनीवर नावे कशी लावली?’ असा थेट सवाल उपस्थित करत वातावरण तापवले. या प्रकरणात मूळ जमीन मालक कोण, आणि खरे घेणारे-देणारे कोण? याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही बाजूंना उद्यापर्यंत त्यांचे लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, आता अप्पर तहसीलदार काय अहवाल पाठवणार हे अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या भूखंड प्रकरणात मुखत्यारांच्या माध्यमातून व्यवहार घडवले जात आहेत, मात्र मूळ मालकांचे व त्यांच्या वारसदारांचे कायदेशीर हक्क, सहमती व अस्तित्व धूसर असल्याने हा संपूर्ण प्रकार फसवणुकीच्या दिशेने वळल्याचा संशय नागरिकांमध्ये वाढत आहे. सावेडीतील बहुमूल्य जमिनीवर सुरू असलेल्या ‘गुप्त’ हालचालींमुळे महसूल यंत्रणेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली नाही, तर हा घोटाळा केवळ सावेडीचा नाही, तर संपूर्ण शहर प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच घाला ठरेल.

Sawedi land Scam : सावेडी भूखंड घोटाळ्याला धक्कादायक वळण! दबाव, मुखत्यार, आणि सुनावणीचा गोंधळ; मूळ मालकाचा ठावठिकाणा नाही Read More »

sebastian bennett

Sawedi land Scam “दस्तऐवजीकरणाआधीच हस्तक्षेपाचा खेळ! सावेडी प्रकरणात मंडल अधिकारी ऐवजी अप्पर तहसीलदार पाठवणारा अहवाल

Sawedi land Scam धक्कादायक वळण मिळाले आहे. सर्वे नं. २४५/ब-१ (०.७२ हेक्टर) व २४५/ब-२ (०.६३ हेक्टर) या एकूण १.३५ हेक्टर भूखंडावर गेल्या ३५ वर्षांपासून कोणताही कायदेशीर किंवा अधिकृत व्यवहार झाला नसल्याचा संशय. नगर प्रतिनिधी | अहमदनगरSawedi land Scam सावेडी येथील अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुमूल्य जमिनीच्या प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. सर्वे नं. २४५/ब-१ (०.७२ हेक्टर) व २४५/ब-२ (०.६३ हेक्टर) या एकूण १.३५ हेक्टर भूखंडावर गेल्या ३५ वर्षांपासून कोणताही कायदेशीर किंवा अधिकृत व्यवहार झाला नसल्याचा संशय. मात्र अलीकडेच या जमिनीवर मोठा आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली असून, त्यासाठी महसूल यंत्रणेकडे दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तींनी हे प्रकरण हातात घेतल्यावर तातडीने भूमाफियांना पाठीशी घालणारी लॉबी सक्रीय झाली असून, चौकशीची दिशा वळवण्यासाठी नियोजित पद्धतीने दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन, उपनिबंधक कार्यल्यावर रोष व्यक्त होऊ लागला आहे.नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील त्यांच्याकडे या प्रकरणात तक्रार दाखल झाली होती, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल मागवण्यात आला. त्यानंतर सावेडी मंडलाधिकारी यांनी वादी व प्रतिवादी दोघांनाही नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच या जमिनीवरील कोणतेही व्यवहार प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांचा निर्णय होईपर्यंत व्यवहार होऊ नये असे पत्र दिले होते, दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३ उपनिबंधक कार्यालयांना देण्यात आले होते.परंतु, या कडक चौकशीतून बचाव करण्यासाठी आणि सत्य बाहेर येण्याआधीच तपासाला वेगळा मोड देण्यासाठी एक संपूर्ण संगनमताने यंत्रणा रचली गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. भूखंडाशी संबंधित मुक्त्यार अर्जदार पाचरणे यांनी या प्रकरणात पोलिसांकडेही अर्ज करत थेट प्रांताधिकारी यांच्यावरच पत्राद्वारे प्रश्न उपस्थित करत, ही चौकशी अप्पर तहसीलदारांकडे वर्ग करावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे, ही मागणी झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांत तपास अप्पर तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला! ही ‘वेगवान कार्यवाही’ अनेक प्रशासकीय वर्तुळात संशयास्पद ठरत आहे.या चौकशीची अचानक बदललेली दिशा म्हणजे वस्तुनिष्ठ तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न की?या प्रकरणातील महसूल मधील अधिकाऱ्यांच्या स्पष्ट व निःपक्षपाती भूमिकेने काहीजण अस्वस्थ झाले होते हे उघड आहे. आता अहवालाची सूत्रे अप्पर तहसीलदारांकडे दिली गेल्यानंतर, नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण नगर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण इतके गंभीर आहे की त्यात केवळ जमिनीचा व्यवहार नाही, तर प्रशासन, दस्तावेज फर्जीवाडा, आणि भूमाफियांचा संगनमत असा सगळा गुंता आहे. जर अप्पर तहसीलदारांनी पूर्वीच्या तपासाचा आदर न करता नव्याने प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला, तर यामागे असलेले राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक हितसंबंध आणखी उघडे पडतील. ही फक्त भूखंडाची लूट नाही, तर कायदा आणि प्रशासन यांची विश्वासार्हता धोक्यात आणणारी साजिश आहे.प्रांताधिकाऱ्यांनी यांनी मंडलाधिकारी यांना वस्तुनिष्ठ अहवाल मागवला होता मात्र सर्व प्रयत्न करूनही मंडळ अधिकारी यांनी आपली भूमिका कायम ठेवली म्हणून याचा वस्तुनिष्ठ अहवाल आता अप्पर तहसीलदारांकडे अचानकपणे तपास वर्ग करणे म्हणजे केवळ कायदेशीर प्रक्रियेचा खेळ मांडण्याचा प्रयत्न असून, आता या प्रकरणात सत्य समोर येईल का, की पुन्हा एकदा दलाल आणि दबावतंत्र यांच्या राजकारणात प्रशासन झुकणार? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या आणि महसूल यंत्रणेच्या निष्पक्षतेची खरी परीक्षा आता लागणार आहे.

Sawedi land Scam “दस्तऐवजीकरणाआधीच हस्तक्षेपाचा खेळ! सावेडी प्रकरणात मंडल अधिकारी ऐवजी अप्पर तहसीलदार पाठवणारा अहवाल Read More »

sawedi land scam, the role of two 'heroes' of revenue

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा: ३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलच्या दोन ‘महानायकांची’ भूमिका

Sawedi land Scam हे खरेदीखत ३५ वर्षांनंतर २९ एप्रिल २०२५ रोजी नोंदवले गेले आणि १७ मे २०२५ रोजी या नोंदीस कायदेशीर मान्यता दिली गेली.३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलचे दोन ‘महानायकांची’ भूमिका अहिल्यानगर – Sawedi land Scam सावेडी परिसरातील बहुचर्चित भूखंड घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, तब्बल ३५ वर्षांनंतर या प्रकरणाला नवा धागा मिळाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, अहिल्यानगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे एक या संदर्भात तक्रार आली आहे, यावर प्रांताधिकारी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल मंडळ अधिकारी यांच्याकडे मागवला आहे. या प्रक्रियेला चालना देणारे मंडल अधिकारी आणि तलाठी हे दोन महसूल यंत्रणेतले ‘महानायक’ असल्याची सध्या चर्चेत आहेत. हे प्रकरण  १५ एप्रिल १९९१ रोजी १.९० लाख रुपयांना झालेल्या खरेदीखताच्या नोंदणीवरून उफाळून आला आहे. आश्चर्य म्हणजे, हे खरेदीखत ३५ वर्षांनंतर २९ एप्रिल २०२५ रोजी नोंदवले गेले आणि १७ मे २०२५ रोजी या नोंदीस कायदेशीर मान्यता दिली गेली. यामध्ये वादाला कारणीभूत ठरले तत्कालीन तलाठी प्रमोद गायकवाड यांनी संबंधित जमिनीची नोंद भरली. आणि सावेडी मंडल अधिकारी दिलीप जायभाय यांनी नोंदीस मान्यता देण्यात आली, परंतु, महत्त्वाचा मुद्दा असा की, जर या दस्तऐवजावर ३५ वर्षांनंतर नोंद घेतली गेली, तर त्या कालावधीत प्रत्यक्ष खरेदीदारांना किंवा मूळ मालकांना नोटीस का पाठवली गेली नाही? कायदेशीर प्रक्रियेचा भंग करत, मागच्या तारखेचा पंचनामा कसा केला गेला, आणि तो करताना गंभीर त्रुटी का राहिल्या, हे अनेक प्रश्न उपस्थित करतो. या सगळ्या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, खरेदीखत बनावट असल्याचा संशय आहे तर मग . DNA मराठीला मिळालेल्या माहिती नुसार, हि जमीन विक्रीसाठी ७० लाखांचे फ्रँकिंग उपनिबंधक कार्यालयात झाले आहे. यावरून हे लक्षात येते की, खरेदीखताच्या नोंदी मागे एक मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे. या जमिनीत लागलेलं रक्कम वसूल करून यातूनच हा व्यवहार दुसऱ्याला हस्तांतरित करून, मोठ्या प्रमाणात रक्कम मिळवण्याचा डाव आखण्यात आला का, हा संशय अधिक गडद होतो. शहा पारसमल मश्रीलाल यांनी २५ एप्रिल २०२५ रोजी नोंदणीसाठी अर्ज दिला होता, मात्र नोंदीसाठी नोटीसा कशा बजावल्या गेल्या नाहीत , याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडे नाही. इतकंच नव्हे, तर त्या नोटीसा खरंच पाठवल्या होत्या का, की त्या नुसत्याच दाखल्यात वापरल्या गेल्या, याचंही उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. डायाभाई यांना किवा यांच्या वारसांना का कळविले, या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा चौकशी सुरू आहे, तेव्हा या जमिनीची विक्री करण्यात घाई का करण्यात येत आहे. ही विक्री झाल्यास त्याचे गंभीर परिणाम कोणाला भोगावे लागतील? मूळ मालक, खरेदीदार की तिसरा पक्ष? यासारखे अनेक अनुत्तरित प्रश्न आजही उभे आहेत. यापूर्वी अशा अनेक प्रकरणांमध्ये बनावट खरेदीखत तयार करून जमिनीची विक्री केल्याचे समोर आले असून, त्यातून संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली आहे. शासनाचे नियम डावलून झालेली ही नोंदणी आणि त्यामागे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग, ही गोष्ट गंभीरपणे तपासण्याची गरज आहे. कारण, सामान्य माणसासाठी त्याची जमीन ही आयुष्याची पुंजी असते. आणि जर शासन यंत्रणा त्याच्याविरोधात उभी राहिली, तर न्याय मिळण्याची आशाही मावळते. या सर्व प्रक्रियेमध्ये मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी घेतलेल्या निर्णयांचे योग्य आहे का, हे पाहणे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. तपास सुरू असतानाही गुपचूप व्यवहार झाले असल्यास, यामागे भूमाफिया आणि शासकीय यंत्रणेमधील साटेलोटे स्पष्ट होतात. त्यामुळे ‘सावेडी घोटाळा’ ही केवळ एक जमीन घोटाळ्याची कथा नसून, ती प्रशासनातील पारदर्शकतेवर उठलेला मोठा प्रश्न आहे.

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा: ३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलच्या दोन ‘महानायकांची’ भूमिका Read More »

sawedi plot scam police entry

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण

Sawedi land scam  – तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवहार स्थगित अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi land scam  – सावेडी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणात आता पोलिसांचीदेखील एन्ट्री झाली असून महसूल यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू असून मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांनी वादी-प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत होऊ नयेत, अशा सूचनाही सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर (दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३) यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पाचरणे यांनी तक्रार करताना “जमिनीच्या व्यवहारात अडथळे निर्माण केले जात आहेत” असा आरोप केला आहे. त्यामुळे आता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून, चौकशीवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कोण आहेत पाचरणे? या प्रकरणात पाचरणे हे शिरूर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनीच ही पोलीस तक्रार दिली आहे. त्यांचा दावा आहे की, डायाभाई अब्दुल आजीज यांच्याकडून पारसमल शहा यांनी विकत घेल्याचा दावा केलाय, शहा  यांच्याकडून जनरल मुखत्यारपत्रावरून जमिनीचा व्यवहार पाचरणे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, या खरेदी खताच्या कायदेशीरतेवर संशय व्यक्त होत असून त्यावरच संपूर्ण वाद उद्भवला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? (Sawedi land scam ) सावेडीच्या भूखंड नोंदणी प्रकरणाने नगर शहराला हादरवून सोडले आहे. तीन दशके झोपलेल्या कागदांनी अचानकच ‘जिवंत’ होण्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वे नंबर २४५/ब १ (०.७२ हेक्टर) आणि २४५/ब २ (०.६३ हेक्टर) असा एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाचा भूखंड – ज्या जमिनीची ३५ वर्षांपूर्वी कोणतीही व्यवहार प्रक्रिया झाली नाही, ती अचानक नोंदणीसाठी समोर आली, या प्रकरणांमध्ये अजित दादाभाई आणि साजिद दयाभाई यांचे जनरल मुखत्यार म्हणून रमाकांत सोनवणे राहणार स्टेशन रोड अहिल्यानगर यांनी तक्रार केली आहे त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सावेडी भागातील एक भूखंड 1991 मध्ये खरेदी करण्यात आल्याचं खरेदी खत सादर करण्यात आलं आहे. मात्र, तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच २०२५ मध्ये ही नोंद करण्यात आली. त्यात काही बाबी संशयास्पद असून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचा संशय वर्तवला जात आहे. हे लक्षात आल्यानंतर महसूल विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रांताधिकारी सुधीर पाटील अंतिम निर्णय घेईपर्यंत कोणताही व्यवहार होऊ नये, असे पत्र देण्यात आले आहे .

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण Read More »

sebastian bennett

Sawedi land Scam कुणाच्या मरणाची वाट पाहत होते?

Sawedi land scam – अहिल्यानगर – अहिल्यानगरच्या सावेडी भागातील गाजत असलेल्या भूखंड नोंदणी प्रकरणाने सध्या शहराचे नुसते कान नव्हे तर अंत:करण ढवळून काढले आहे. ३५ वर्षांपूर्वीचा खरेदीखत, पावर ऑफ अ‍ॅटर्नी, हिबाबनामे आणि नोटरीच्या नोंदी आज अचानक कोणाच्या तरी मृत्यूमुळे बाहेर येतात आणि सर्वांनी ‘हे माझं’, ‘मी याचा वारस’, ‘ते माझं’ म्हणून उचल खाल्ल्याची लक्तरं वेशीवर टांगली जातात. मग इतके दिवस हे सगळे नक्की कुणाच्या मरणाची वाट पाहत होते? हे केवळ प्रश्‍न नाही; हा एका प्रामाणिक व्यवस्थेच्या मरणाचाही हुंकार आहे. एखादा वारसदार मरण पावतो आणि त्या पाठोपाठ एकामागोमाग एक भूमाफिया, कागदांचे माहेरघर बनलेले दस्तऐवज, खोटी पावती आणि सरकारी यंत्रणेतील बेशरम शांतता यांचा भयंकर नाट्यप्रयोग सादर होतो. मग प्रश्न हा पडतो की नेमकी ही भूखंड माफिया कुणाच्या मरणाची वाट पाहत होते… सर्व्हे नं. २४५/ब १ आणि २४५/ब २ — एकूण १ हेक्टर ३५ आर — ही जमीन, ३५ वर्षांनंतर अचानक नोंदणीसाठी पुढे काढली जाते आणि म्हणे १९९१ साली खरेदीखत झाले होते! पण त्या काळात तर २४५/ब २ हा गट क्रमांक अस्तित्वातच नव्हता. गट विभाजनच १९९२ मध्ये झाले, तर वर्षभर आधी खरेदीखत लिहिणाऱ्यांनी कोणते गूढ भविष्य पाहिले होते?याहून भयावह म्हणजे हे खरेदीखत लिहून देणारा ‘अब्दुल अजीज डायभाई’ — त्याच्या नावावर त्या काळात जमीनच नव्हती! मग हे सगळे “खरे” दस्तऐवज तयार झाले तरी कसे? की काहीजणांची सही, काहीजणांचा मृत्यू, काहीजणांची आठवण आणि काहीजणांचे स्वार्थ — हे सगळं एकाच ‘खता’त गाडलं गेलं? या सगळ्या खेळात सर्वात मोठा खलनायक ठरतो तो म्हणजे – ‘गप्प बसलेली यंत्रणा‘. निबंधक, महसूल कार्यालयाला हे प्रश्न पडत नाहीत का? की त्यांनाही या बनावट दस्तऐवजांचं वजन लक्ष्मी-दर्शनाच्या तुला मोजूनच समजतं? अहो तुम्ही आज अधिकारी असला म्हणून काय झालं शेवटी तुम्हीही एक माणूस आहात हे विसरू नका, या प्रकरणात फक्त जमीनच लुटली जात नाहीये, तर नीतिमत्तेची हत्या, कायद्याचा अपमान आणि सामान्य जनतेच्या विश्वासाचा खून झालेला आहे. अशी सडकी व्यवस्था चालू राहिली, तर उद्या तुमच्या-आमच्या जमिनीही कुणाच्या तरी “काही वर्षांपूर्वी”च्या खरेदीखतावर हरवल्या जातील. त्यावेळेस तुमची पुढील पिढी ही अधिकारी नसेल हे लक्षात ठेवा, प्रशासन आणि कायदा यंत्रणांनी आता तरी जागं व्हावं, अन्यथा जनता विचारेल — हे सगळे खरेदीखत, नोटरी, हिबाबनामे फक्त माणसाच्या मरणाची वाट पाहूनच बाहेर काढायचे का? आता कुणी मरेल याची वाट न पाहता, कायदा जिवंत आहे हे दाखवून द्या. नाहीतर पुढची वाट फक्त अराजकतेकडेच जाते. * हे सगळे पुढे आले याचे कारण पुण्यात दोन-तीन महिन्यापूर्वी एका वर्षाचे निधन झाले.*

Sawedi land Scam कुणाच्या मरणाची वाट पाहत होते? Read More »

sawedi land

Sawedi land Scam सावेडी जमीन व्यवहारात पुन्हा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर खरेदीखतासाठी दबाव; ‘लक्ष्मी दर्शन’चे आमिष?

land Scam Sawedi – अहिल्यानगर : सावेडी येथील तब्बल ३५ वर्षांपूर्वीच्या जमिनीच्या संशयास्पद व्यवहारात नवे वळण आले आहे. या प्रकरणात बनावट खरेदीखताच्या आधारे पुन्हा एकदा नवीन खरेदीखत करण्यासाठी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी आर्थिक आमिषाचे – ‘लक्ष्मी दर्शनाचे’ – प्रस्ताव दिल्याचेही समजते. सदर प्रकरणात २४५/ब२ या गट क्रमांकाची ०.६३ हेक्टर क्षेत्राची जमीन चर्चेचा विषय ठरली आहे. या भूखंडावर ३५ वर्षांपूर्वीचे खरेदीखत खरे की बनावट, याचा तपास सुरू असतानाच, त्याच खरेदीखताच्या आधारे नवी नोंदणी करण्याचा प्रयत्न होत आहे. संबंधित पक्षांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर नोंदणीसाठी दबाव आणल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, या नोंदणी प्रक्रियेत अडथळा नको म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘लक्ष्मी दर्शन’ देण्याचे सुचवले गेल्याचे संकेत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, सरकारी यंत्रणेवर बाह्य हस्तक्षेपाचा गंभीर प्रकार म्हणून पाहिली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी संबंधित व्यवहाराची चौकशी सुरू केली असून, मंडळ अधिकारी शैलजा देवकते यांनी वादी-प्रतिवादी पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या गट नंबरवरील कोणताही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावा, असे आदेश सहाय्यक दुय्यम निबंधकांना दिले गेले आहेत. या सर्व घडामोडींमुळे भू-माफियांची धडकी भरली असून, प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रकार आणि त्याला मिळणारी शासकीय यंत्रणांची साथ, या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील काळात ही चौकशी कुठपर्यंत जाते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Sawedi land Scam सावेडी जमीन व्यवहारात पुन्हा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर खरेदीखतासाठी दबाव; ‘लक्ष्मी दर्शन’चे आमिष? Read More »

Sawedi land Scam सावेडीतील १०० कोटींच्या जमिनीवर डाव; तलाठी आणि निबंधक कार्यालयातील कर्मचारी कोण ?

Sawedi land Scam १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या या जमिनीवर भूमाफियांकडून मोठा डाव खेळण्यात आल्याचा आरोप Sawedi land Scam अहिल्यानगर, – सावेडी भागातील अत्यंत मोलाची समजली जाणारी सर्वे नंबर २४५/ब १ (०.७२ हेक्टर आर) व २४५/ब २ (०.६३ हेक्टर आर) या एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीची तब्बल ३५ वर्षांनंतर झालेली नोंदणी सध्या शहरात प्रचंड चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरली आहे. बाजारभावानुसार अंदाजे १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या या जमिनीवर भूमाफियांकडून मोठा डाव खेळण्यात आल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात सावेडी तलाठी कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचारी थेट सहभागी असल्याचा संशय गडद होत आहे. या नोंदणीसाठी सादर करण्यात आलेले दस्तऐवज आणि अर्ज अपूर्ण, संशयास्पद आणि विसंगत आहेत. दस्तात उल्लेख करण्यात आलेल्या रकमेपासून ते साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यांपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, १९९१ मध्ये खरेदीखत झाल्याचा दावा असला, तरी त्या वेळी संबंधित गटाचे विभाजन झालेलेच नव्हते. हे विभाजन प्रत्यक्षात १९९२ मध्ये झाले, यामुळे १९९१ मध्ये खरेदीखत वैधपणे होणे शक्यच नव्हते. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे ३५ वर्षांपूर्वीचे दस्त इतक्या सहजतेने कसे मिळाले? कोणत्या कर्मचाऱ्याने जुने पेपर शोधून देण्यासाठी मदत केली? या प्रश्नांमुळे प्रशासनातील “अंदर की सेटिंग” आणि भूमाफियांच्या संगनमताचा संशय अधिकच बळावला आहे. सध्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी न केल्यास तीव्र जनआक्रोश उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sawedi land Scam सावेडीतील १०० कोटींच्या जमिनीवर डाव; तलाठी आणि निबंधक कार्यालयातील कर्मचारी कोण ? Read More »

Sawedi land Scam गुजरातच्या खरेदीदाराची जमीन, स्थानिक हात? संशय गडद

Sawedi land Scam अहिल्यानगर –  नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या समोर असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीची नोंदणी तब्बल ३५ वर्षांनंतर गुपचूप पद्धतीने पार पडल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या व्यवहारामागे प्रशासकीय हलगर्जीपणा, राजकीय वरदहस्त आणि गुप्त हेतू असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. या जमिनीचा व्यवहार सर्वसामान्य खरेदी-विक्रीचा नसून, प्रशासनातील ढिसाळ कारभार आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आढावा घेतला पाहिजे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. गुप्त नोंदणी, गूढ कामकाज सदर जमीन सर्वे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या गटात असून काही वर्षांपूर्वी या जागेवर हाडांचा कारखाना होता, अशी माहिती समोर आली आहे. सध्या मात्र त्या ठिकाणी जुन्या भिंती तोडून नव्याने उभारणीचे काम वेगाने सुरू असून, तेही रात्रीच्या वेळी आणि अत्यंत गोपनीयतेने, ज्यामुळे नागरिकांचा संशय अधिकच बळावला आहे. स्थानिक हात, परराज्यातील खरेदीदार? सदर जमीन गुजरात येथील खरेदीदाराच्या नावावर असल्याचे सांगितले जात असले तरी, स्थानिक काही लोकांच्या सहाय्याशिवाय हे काम अशक्य असल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी याच जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत तो प्रयत्न हाणून पाडला होता. चुकीचे दस्तऐवजीकरण? कोणतीही जाहिर नोटीस न देता पार पडलेला हा व्यवहार, नागरिकांच्या मते पारदर्शकतेच्या सर्व निकषांना हरताळ फासणारा आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार झाला का? याबाबत चौकशीची मागणीही वेग घेऊ लागली आहे. या व्यवहारामुळे केवळ जमीनच नव्हे तर शासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही, तर हा प्रकार राजकीय हस्तक्षेप व प्रशासकीय अपयशाचे ठळक उदाहरण म्हणून पुढे राहील.

Sawedi land Scam गुजरातच्या खरेदीदाराची जमीन, स्थानिक हात? संशय गडद Read More »