DNA मराठी

Rohit Pawar

Nilesh Lanke: अजित पवार गटात प्रवेश करणार? खासदर लंकेंनी स्पष्ट सांगितलं

Nilesh Lanke: राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षाचे खासदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. खासदार सुनील तटकरे यांनी खासदारांना संपर्क केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर आता खासदार निलेश लंके यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, पक्ष प्रवेशबद्दल चर्चा खोटी आहे. मी किंवा माझ्याबरोबर असलेल्या खासदारासोबत अशी चर्चा झाली नाही.आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रिया ताई सोबत काम करत आहोत. चर्चा फक्त माध्यमांमध्ये होत आहे. बीड प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी ही चर्चा असू शकते. असं निलेश लंके म्हणाले. तसेच आमचे खासदार संपर्क कोणाशी करणार नाही असं देखील ते म्हणाले. तर विधानसभेला पक्षाला जे अपयश आलं त्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता व पक्ष संघटना कशी मजबूत करायची यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पक्ष संघटनेतच्या नेतृत्वात बदल किंवा खांदेपालट असे संकेत दिले गेले नाहीत. सर्वांना सोबत घेऊन घराघरात पक्ष संघटनेचे पोहोचवण्याचा काम करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तर दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. जर मुंडेंचा तो जवळचा कार्यकर्ता आहे. नैतिकता म्हणून त्यांनी आपली भूमिका अधिकृत केली पाहिजे. असं खासदार लंके म्हणाले. याच बरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका एकत्र लढवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशी देखील माहिती त्यांनी दिली.

Nilesh Lanke: अजित पवार गटात प्रवेश करणार? खासदर लंकेंनी स्पष्ट सांगितलं Read More »

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट

Rohit Pawar : 2019 प्रमाणे 2024 लाही राज्यामध्ये कर्जत-जामखेड हा मतदार संघ लक्षवेधी राहणार आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने असल्याने ही लढत मोठी रंगतदार आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपाने गाजणार असून राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदर रोहित पवार यांनी सहकुटुंब येत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत शहरातून एक भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. रॅली नंतर एका मोठ्या सभेचा आयोजनही करण्यात आलेलं होते. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मी 2019 प्रमाणे आताही एका बलाढ्य पक्षा विरुद्ध लढत असलो तरी विजय पुन्हा माझाच होईल असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक जिंकण्यासाठीच असून पुढील पाच वर्षासाठी कोणती विकास कामे करायचे याचे प्लॅनिंग मी केलेले आहे. राम शिंदे यांच्यावर टीका करताना पवार यांनी, त्यांना विकासाबद्दल काहीही कळत नसल्याचा टोला लगावला. त्यांनी विकास कामे केले किंवा मी केली यासाठी त्यांनी समोरासमोर येऊन कोणी किती विकास कामे केली हे सांगावे असे खुले आव्हान रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिले आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत 170 ते 180 जागांवर निवडून येईल असा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला. विरोधकांनी जाणीवपूर्वक मतं खाण्यासाठी सुपारीबाज उमेदवार उभे केले आहेत, मात्र जनतेला विकासा कोण करेल याची माहिती असल्याने महाविकास आघाडी सोबत राज्यातील जनता राहील असा विश्वासही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट Read More »

Rohit Pawar: ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी रोहित पवारांकडून 14000 सायकलींचा वाटप

Rohit Pawar :  ग्रामीण भागामध्ये शाळेपासून पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या मुला-मुलींना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाण्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये आणि त्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून कर्जत जामखेड मतदार संघातील मुला मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे.  हे वाटप करताना कुठलाही भेदभाव केला गेला नाही तो कुठल्या समाजाचा आहे त्यांनी मतदान केलं आहे का? असं न पाहता मुला मुलींचा अभ्यासावरती परिणाम होऊ नये म्हणून विविध संघटनाच्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी 14000 सायकलीचा वाटप करण्यात आले अशी प्रतिक्रिया आमदार रोहीत पवार यांनी दिली. अजून दोन टप्प्यात हे सायकल वाटप केली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी रोहित पवार यांनी दिली.  रोहित पवार यांच्या मतदार संघात धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप करण्यात आले.  सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे  कुणी काय बोलावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्यावरही धार्मिकतेचा प्रभाव आहे सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे अशी शिकवण दिली आहे.  दुसऱ्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल अपप्रचार करू नये अशी संतांची शिकवण आहे कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मदत केली पाहिजे अशी संतांची शिकवण आहे अशा प्रकारचा कोणी वक्तव्य करत असेल तर ते बरोबर नसल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Rohit Pawar: ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी रोहित पवारांकडून 14000 सायकलींचा वाटप Read More »

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम

आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Rohit Pawar : जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले. आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रत्नदीपबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आ. रोहीत पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली.  चार मुद्दयावर विद्यापीठ प्रतिनिधीनी कुलगुरू समवेत होणाऱ्या मिटींग नंतर निर्णय घेतले जातील असे अश्वासन दिले परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला डॉ. भास्कर मोरे याला 24 तासात अटक करण्याची मुदत संपली 100 घंटे झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.   महिला आयोगाकडून दखल रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाकडून मुलींचे माणसिक, अर्थिक शाररीक, अत्याचारामुळे सुरू असलेल्या  अंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वता:हून दखल घेतली आहे.  आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ) (एक) व (2) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे व माहीती कळवण्यास सांगितले आहे.

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Read More »

Maharashtra News: आम्ही लोकसभा लढवणारच.. राणी लंके

Maharashtra News: समोर कोणीही उमेदवार असला तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन  येणारी लोकसभा निवडणूक लढणारच असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी स्पष्ट केले आहे.  शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ मोहटादेवी गडावरून आज करण्यात आला. यानंतर पाथर्डी इथे पत्रकार परिषदेत बोलताना राणी लंके यांनी मला उमेदवारी करावी लागली तर मी लोकसभा निवडणुक नक्कीच लढवणार असे स्पष्टपणे सांगितले. लोकसभेला आ.निलेश लंके उमेदवार असणार का आपण, आपली तयारी आहे का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राणी लंके यांनी येणारी लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही तयार आहोत हे सांगत नगर दक्षिणेतून आ.निलेश लंके अथवा आपण स्वतः निवडणूक लढवणारच असे सांगण्याचा प्रयत्न केला.  राणी लंके यांच्या वक्तव्यावरून समोर कोण उमेदवार असेल याची चिंता नसून कोणीही उमेदवार असला तरी लंके दांपत्यापैकी एकजण निवडणुकीच्या रिंगणात असेल असे आता स्पष्ट होत आहे.  शिवस्वराज्य यात्रा नगर दक्षिण मतदारसंघात असून सर्व सातही तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार असून यासाठी पाच शिवस्वराज्य रथ तयार करण्यात आले आहेत. यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास शिवअभ्यासक लोकांसमोर मांडणार आहेत.  पंधरा दिवस यात्रा चालणार असून समारोप नगर शहरात आ.निलेश लंके यांच्या उपस्थितीत होणार आहे. आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य यात्रा मराठी माणसांची अस्मिता आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शिवराय मनामनात.. शिवराय घराघरात ! पोहचविण्यासाठी आम्ही घेऊन येतोय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवस्वराज्य यात्रा या यात्रेचा प्रारंभ आज सौ. राणीताई लंके यांनी आई मोहटा देवीचे दर्शन घेऊन केला. यावेळी उपस्थित सर्व सहकारी होते.

Maharashtra News: आम्ही लोकसभा लढवणारच.. राणी लंके Read More »

Ram Shinde : तुम्ही स्वतः च पाहा! ‘त्या’ प्रकरणात राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला

Ram Shinde :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासह इतर राजकीय पक्षांनी देखील तयारी सुरू केली आहे.  यातच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आगामी निवडणुका महायुतीतील घटक पक्ष हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील टीका केली होती. आता या टीकेला उत्तर देत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांसह विरोधकांना टोला लगावला. राम शिंदे एका कार्यक्रमानिमित्त अहमदनगर शहरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी आपल्या पक्षावर लक्ष देणे गरजेचे आहे.  आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याचा आम्ही निर्णय घेऊ. त्यांना आमच्या घरात काय चाललंय हे डोकं पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चाललं याकडे लक्ष दिले पाहिजे. कर्जत एमआयडीसी वर बोलताना राम शिंदे म्हणाले की तो प्रस्ताव सदोष होता त्या प्रकल्पाला गावकऱ्यांनी देखील विरोध केला तसेच ती जमीन विवादातील होती.  त्यामुळे नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून टीम ही कर्जत तालुक्यात गेली असून त्यांच्याकडून चाचणी केली जात आहे. तसेच पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की याबाबत मी एक प्रशासकीय बैठक देखील घेतलेली आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा असे निर्देश मी दिलेले होते त्या अनुषंगाने आजच त्या टीमने सहा क जागांची पाहणी केली आहे. त्यामुळे लवकरच शासनाकडे आराखडा पाठवला जाईल अशी माहिती यावेळी राम शिंदे यांनी दिली.

Ram Shinde : तुम्ही स्वतः च पाहा! ‘त्या’ प्रकरणात राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला Read More »