DNA मराठी

Rohit Pawar

discussions of phone tapping create excitement in the cabinet

फोन टॅपिंगच्या चर्चांनी मंत्रिमंडळात खळबळ; रोहित पवार (Rohit Pawar) यांची पोस्ट पोस्ट चर्चेत

tapping case – “सध्या काही मंत्र्यांचे फोन बर्‍याचदा Not Reachable येतात… का याचा विचार केला पाहिजे!” अशा आशयाची पोस्ट करत पवार यांनी थेट नाव न घेता संशयाची दिशा दाखवली आहे. मुंबई, २५ जुलै २०२५ – राज्यात मंत्र्यांचे फोन ‘#not_reachable’ येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. हे तांत्रिक कारणांमुळे होत नसून, काही मंत्र्यांकडून जाणीवपूर्वक मोबाईल बंद ठेवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. कारण सांगितले जाते — फोन टॅपिंगची (Phone Tapping) भीती! मंत्र्यांचे फोन ऐकले जात आहेत, खासगी संभाषण सुरक्षित राहणार नाही, अशा भीतीने काही मंत्री आपले मोबाईल बंद ठेवत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात उघडपणे होऊ लागली आहे. मंत्रिमंडळाच्या (Cabinet) गोटात दबक्या आवाजात ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘X’ (पूर्वीचे Twitter) या सोशल मीडियावर केलेल्या सूचक पोस्टमुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. “सध्या काही मंत्र्यांचे फोन बर्‍याचदा Not Reachable येतात… का याचा विचार केला पाहिजे!” अशा आशयाची पोस्ट करत पवार यांनी थेट नाव न घेता संशयाची दिशा दाखवली आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये (Ruling Party) अस्वस्थता जाणवते आहे. राज्याचे काही वरिष्ठ नेते (Senior Leaders) आणि गुप्तचर यंत्रणांच्या (Intelligence Agencies) हालचालींचा उल्लेखही या चर्चांमध्ये होताना दिसतोय. फोन टॅपिंगच्या या संभाव्य मुद्द्यावर राज्य सरकार (State Government) किंवा संबंधित यंत्रणांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. हे फक्त अफवा (Rumours) आहेत की कुठलं गंभीर वास्तव (Truth) – हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या एका पोस्टने मंत्रिमंडळात एक नवा तणाव निर्माण केला आहे, हे मात्र नक्की!

फोन टॅपिंगच्या चर्चांनी मंत्रिमंडळात खळबळ; रोहित पवार (Rohit Pawar) यांची पोस्ट पोस्ट चर्चेत Read More »

img 20250723 wa0003

कृषिमंत्री Manikrao Kokate यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधक करत आहे. तर दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जुगारी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, अशोक बाबर, प्रकाश पोटे, अथर खान, गौरव नरवडे, फरीन शेख, रुकैय्या शेख, अल्तमश जरीवाला, समीर पठाण, सरपंच शरद पवार, फय्याज तांबोली, अनिस शेख, आरिफ पटेल, जावेद शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केलेली आहेत. शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्च भाषेत उद्गार काढून त्यांचा अपमान देखील केलेला आहे. पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी, कर्जमाफी वरील वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. एका कृषिमंत्रीने शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. असं जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले. तर नुकतेच कृषिमंत्री कोकाटे विधान परिषदेत अधिवेश सुरु असताना चक्क मोबाईलवर रम्मीचा जुगार खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे भावना दुखावल्या गेल्या असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

कृषिमंत्री Manikrao Kokate यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक Read More »

rohit pawar vs manikrao kokate

Rohit Pawar vs Manikrao Kokate आम्ही कोणालाही घाबरत नाही!” — रोहित पवारांचा थेट इशारा

काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह काही विरोधी नेत्यांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. अहिल्यानगर  – राज्याच्या राजकारणात सध्या गरम हवा निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आक्रमक आमदार रोहित पवार यांनी थेट राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर घणाघात केला आहे. “आम्ही कोणालाही घाबरत नाही — ना ईडीला, ना पोलीस खटल्यांना आणि ना तुमच्यासारख्या मंत्र्यांना. जे काही करायचं असेल, ते करा. आम्ही ते सगळं सामोरे जाण्यास तयार आहोत,” अशा शब्दांत रोहित पवारांनी (Rohit Pawar) कोकाटेंना थेट इशारा दिला आहे.ही प्रतिक्रिया त्यांनी पुढारी या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्ताधारी-विरोधकांमध्ये नव्या संघर्षाची चिन्हं स्पष्टपणे दिसू लागली आहेत. *घटनाक्रमाची पार्श्वभूमी*काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांच्यासह काही विरोधी नेत्यांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप केले असून त्याविरोधात ते कायदेशीर कारवाई करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आता थेट मैदानात उतरून कोकाटेंना चपराक दिली आहे. त्यांनी म्हटलं:“कोकाटे साहेब, तुम्ही शेवटचे चार महिने मंत्री आहात. या काळात काय पराक्रम केलात हे राज्यातील जनतेने पाहिलं आहे. तुम्ही किती वेळा वादात सापडलात, किती विचित्र स्टेटमेंट्स दिलीत, याची साक्ष सर्व महाराष्ट्राने घेतली आहे.” पवारांचा हल्लाबोल — मुख्य मुद्दे“आम्ही कोणालाही घाबरत नाही!”रोहित पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्ही ईडीच्या चौकशांना सामोरे गेलो आहोत, कधीही पळून गेलो नाही. त्यामुळं कोकाटे साहेब, तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. “कृषिमंत्र्यांची कारकीर्दच वादग्रस्त!”गेल्या काही महिन्यांतील माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वादग्रस्त व्हिडीओ, विधानं, वागत असलेली बेजबाबदार भूमिका यावर रोहित पवारांनी टीकास्त्र सोडलं. “सत्तेचा गैरवापर थांबवा!”त्यांनी आरोप केला की, सत्तेचा वापर करून विरोधकांना दबावाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आमचं मनोबल कोणी खच्ची करू शकत नाही. आगामी राजकीय दिशा? या वादातून राज्यात नव्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. दोघेही नेते आक्रमक असून, राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. कोकाटे यांच्याकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिलं जाईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.सध्याच्या राजकारणात रोहित पवार (Rohit Pawar) हे विरोधकांतील महत्वाचे आणि आक्रमक नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. त्यांचा हा थेट आणि सडेतोड इशारा — “जे करायचं असेल ते करा, आम्ही तयार आहोत!” — हा सत्ताधाऱ्यांसाठी एक मोठा साखरझोपेतील धक्का ठरू शकतो.

Rohit Pawar vs Manikrao Kokate आम्ही कोणालाही घाबरत नाही!” — रोहित पवारांचा थेट इशारा Read More »

discussions gain strength after jayant patil's resignation; sangram jagtap

जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना बळ; संग्राम जगताप

“अजित पवार यांच्या गटात आले, तर मनापासून स्वागत” — संग्राम जगताप अहिल्यानगर | प्रतिनिधी – जयंत पाटील बातमी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) NCP अध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. यावर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप sangrm Jagtap यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “जयंत पाटील Jayant Patil, यांचं नाव गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात घेतलेल्या भेटींमुळेही अनेक शक्यता पुढे आल्या. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं, मात्र त्यांच्यातील अस्वस्थता कायम राहिली,” असं जगताप यांनी सांगितलं. “माजी महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते, परंतु सरकार पडल्यानंतर त्यांच्या भोवतीच्या चर्चांना वेग आला. आज त्यांनी स्वतःहून राजीनामा सादर केला, यावरून या चर्चांमध्ये काही तथ्य होतं, हे स्पष्ट होतं,” असं मत जगताप यांनी व्यक्त केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, “जर जयंतदादा अजित पवार aajit pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असतील, तर आम्ही सर्वजण त्यांचं मन:पूर्वक स्वागत करू. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आणि राज्याला निश्चितच फायदा होईल,” असा ठाम विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे. जयंत पाटील यांचा पुढील राजकीय निर्णय काय असणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर चर्चांना बळ; संग्राम जगताप Read More »

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले

Laxman Hake on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री पदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ देखील अजित पवारांवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत असल्याने छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आता अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी देत भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले असल्याचे देखील बोलले जात आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है. सुप्रिया सुळे केंद्रात , रोहित पवार, जयंत पाटील राज्य मंत्रिमंडळात काहीच दिवसांत पाहायला मिळतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उशिरा का होईना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले त्याचा स्वागत आहे.ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश आवश्यक होता. मात्र ओबीसींचे आरक्षण आणि आरक्षणामधील घुसखोरी हे ओबीसी आणि ओबीसी नेत्यांसमोरील येत्या निवडणुकीमधील अडचणीचे प्रश्न आहेत. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे. असं माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले. तसेच छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले Read More »

“मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तींचा विरोध, ठाकरे कुटुंबाची एकत्र येण्याची वेळ!”

Rohit Pawar: महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नांची शिदोरी पुन्हा एकदा वाढत आहे, आणि यावर ठाकरे कुटुंबाच्या एकजुटीचा विरोध होण्याची वेळ आली आहे. ‘महाराष्ट्रधर्म’ जपण्यासाठी ठाकरे कुटुंब एकत्र येत आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी एका ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे, “शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे.” हे ट्विट हे एक महत्त्वाचं संदेश देत आहे की, एकता आणि एकजुटीच्या माध्यमातूनच मराठी अस्मितेचं संरक्षण शक्य आहे. ठाकरे कुटुंबाचे नेतृत्व आणि त्याच्या एकजुटीला यापुढे महाराष्ट्रधर्माच्या रक्षणासाठी आणखी मोठं महत्त्व दिलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाने हा संदेश ग्रहण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या राजकारणात एका मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी सर्व कुटुंबांनी एकत्र येणं आवश्यक आहे. याच एकजुटीमध्येच महाराष्ट्राचं हित आहे, असं आमदार रोहित पवार यांचे मत आहे. हे निःसंशयपणे राज्याच्या भविष्याचं एक सकारात्मक चित्र रेखाटत आहे. त्यामुळे, एकत्र येण्याची ही वेळ केवळ राजकारणाची नाही, तर मराठी अस्मितेची आहे. आणि याच कारणामुळे, या संघर्षात प्रत्येकाने आपला सहभाग द्यावा लागेल.

“मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तींचा विरोध, ठाकरे कुटुंबाची एकत्र येण्याची वेळ!” Read More »

कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप; रोहित पवार vs राम शिंदे संघर्षाचा नवा टप्पा

Rohit Pawar: कर्जत नगरपंचायतीत सत्तासंघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि भाजपचे 13 नगरसेवक एकाचवेळी सहलीवर गेले असून, त्यामागे नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची हालचाल आहे. ही घटना आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या दीर्घकाळ चाललेल्या वैराची नवी कडी आहे. राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी: रोहित पवार vs राम शिंदेविधानसभा निवडणुकीतील पराभवगेल्या निवडणुकीत रोहित पवार (राष्ट्रवादी) यांनी राम शिंदे (भाजप) यांचा अतिरिक्त मतांनी पराभव केला.यामुळे भाजपचे नेतृत्व (देवेंद्र फडणवीस) रुष्ट झाले आणि राम शिंदे यांना पार्टीचे सभापतीपद देऊन त्यांना मजबूत केले. एमआयडीसी (MIDC) प्रकरण – राजकीय सूडरोहित पवार यांनी कर्जतला MIDC मंजूर केली होती, पण राम शिंदे यांनी ती रद्द करून नवीन MIDC योजना आणली. स्थानिकांनी या नवीन योजनेचा तीव्र विरोध केला, कारण ती जनहिताच्या विरोधात होती. हा प्रकल्प रद्द झाल्यानंतर राम शिंदे यांनी नगरपंचायतीत डाव टाकला आणि राष्ट्रवादीच्या 11 + भाजपच्या 2 नगरसेवकांना एकत्र केले. नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वासहे 13 नगरसेवक आता नगराध्यक्ष उषा राऊत (रोहित पवार गट) यांच्यावर अविश्वास ठराव आणणार आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज सादर केला आहे आणि लवकरच नव्या नगराध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. “निवडणुकीतील अन्यायाची प्रतिक्रिया” – प्रवीण घुलेमाजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी म्हटले आहे, “राम शिंदे यांनी MIDC प्रकरणात जनतेला फसवले. आम्ही त्यांच्या राजकारणाला परतवणार आहोत. नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास ठराव आणला आहे.” रोहित पवार यांच्यावर दडपशाहीचे आरोपगटनेते संतोष मेहत्रे यांनी म्हटले, “मागील निवडणुकीत दडपशाही झाली. नगराध्यक्ष पदाचे वाटप अडीच वर्षांनी होणार होते, पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले.”13 नगरसेवकांनी एकत्र येऊन रोहित पवार यांच्या राजकीय प्रभुत्वाला आव्हान दिले आहे. पुढील राजकीय रणरणीअविश्वास ठरावाची प्रक्रिया: जिल्हाधिकारी यांना अर्ज सादर झाला असून, लवकरच निर्णय अपेक्षित आहे. नवीन नगराध्यक्षाची निवडणूक: जर अविश्वास ठराव पास झाला, तर नव्या नेत्याची निवड होईल. रोहित पवार vs राम शिंदे पुढील डाव: हा संघर्ष स्थानिक पातळीवर भाजप-राष्ट्रवादी युतीच्या भवितव्यावर परिणाम करू शकतो.

कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप; रोहित पवार vs राम शिंदे संघर्षाचा नवा टप्पा Read More »

कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप, 13 नगरसेवक सहलीवर, रोहित पवारांना मोठा धक्का

Karjat Politics : कर्जत नगरपंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला असून तब्बल 13 नगरसेवक सहलीवर गेल्याने आता नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याची राजकीय हालचालही सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि भाजपचे एकूण 13 नगरसेवक एकाच वेळी सहलीवर गेल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जत नगरपंचायतीत अस्थिरता होती. गटनेते संतोष मेहत्रे यांनी नगराध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मागील निवडणुकीत दडपशाही झाली होती. नगराध्यक्ष पदाचे वाटप अडीच वर्षांनी होणार होते, पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास ठराव आणला आहे.” या ठरावाला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या 13 नगरसेवकांचा पाठिंबा आहे. यामध्ये महिला नगरसेविकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. या नगरसेवकांनी सोमवारी जिल्हाधिकारी पंकज आशियाना यांच्याकडे अर्ज सादर करून कारवाईची मागणी केली आहे. राजकीय संघर्षात आमदार रोहित पवार यांची अडचणही घटना आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का ठरत आहे. कारण नगरपंचायतीतील बहुसंख्य नगरसेवक त्यांच्या विरोधात उभे आहेत. त्यांच्या विरोधकांनी हालचालीला गती दिली असून, आमदार राम शिंदे यांच्या समर्थकांचा हातभार लागलेला दिसतो. “निवडणुकीतील दडपशाहीची प्रतफेड” – प्रवीण घुलेमाजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी या राजकीय हालचालीला “निवडणुकीतील अन्यायाची प्रतिक्रिया” म्हटले आहे. त्यांनी म्हटले, “आम्ही गेल्या काळात दडपशाही सहन केली, पण आता जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचा वेळ आला आहे. यापुढील निर्णय जनहिताच्या दृष्टीने घेतले जातील.” तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी अविश्वास ठरावावर लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक करीत आहेत. सहलीवर गेलेले 13 नगरसेवकसौ. रोहिणी सचिन घुलेसौ. छायाताई सुनिल शेलारसंतोष सोपान मेहत्रेज्योती लालासाहेब शेळकेसतीश उद्धवराव पाटीललंकाबाई देविदास खरातभास्कर बाबासाहेब भैलुमेभाऊसाहेब सुधाकर तारेडमलताराबाई सुरेश कुलथेमोनाली ओंकार तोटेमोहिनी दत्तात्रय पिसाळअश्विनी गजानन दळवीसुवर्णा रविंद्र सुपेकर कर्जत नगरपंचायतीतील ही राजकीय उलथापालथी स्थानिक पातळीवर नवे समीकरण निर्माण करणारी आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची मागणी करत या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला आहे. पुढील काही दिवसात या प्रकरणाचा निकष लागणार असून, राजकीय पटावर नवे बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप, 13 नगरसेवक सहलीवर, रोहित पवारांना मोठा धक्का Read More »

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar: राज्यातील राजकारणात एक मोठा खळबळजनक प्रकार समोर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार हे गोरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत होते. मात्र आता त्यांनी गोरे यांच्या कथित गैरकारभाराची सविस्तर माहिती देत त्यांच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मातंग समाजाला न्याय मिळण्यात अडथळारोहित पवार यांनी सांगितले की, “मी सुरुवातीपासून महिलेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, मंत्री गोऱ्हे हे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन दबाव आणण्याचे काम करत आहेत.” पवार यांनी असा धक्कादायक आरोप केला की, गोरे यांनी त्यांच्या भागातील कॉलेजला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजातील मृत व्यक्तीचे खोटे आधार कार्ड तयार करून त्याला जिवंत दाखवले. या मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असून, त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 2016 रोजी झाला होता. भिसे यांच्या कुटुंबाने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. खोट्या सहीने जमीन हडप करण्याचा आरोप“पिराजी भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांचे खोटे कागदपत्र तयार करण्यात आले. भिसे हे अंगठा लावत असताना त्यांच्या नावावर तोतयाने सही केली. ही गंभीर फसवणूक असून यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचाही भंग होतो. एवढ्या गंभीर प्रकारानंतरही गोरे यांना जामीन मिळाला,” असा आरोप पवार यांनी केला. विशेष म्हणजे, ज्या न्यायाधीशाने गोरे यांना जामीन दिला, त्यांना उच्च न्यायालयाने डिमोट केल्याचेही पवार यांनी सांगितले. कोरोना काळातील योजनांचा गैरवापरया प्रकरणात आणखी गंभीर बाब उघड करत रोहित पवार म्हणाले, “गोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचा फोटो वापरून कॉलेज रजिस्टरसाठी कागदपत्रे तयार केली. कोविड काळात सामान्य माणूस बाहेर फिरू शकत नव्हता. याच काळाचा फायदा घेत गोरे यांनी आपल्या फायद्यासाठी कॉलेज रजिस्टर केलं.” तसेच “मायनी मेडिकलमध्ये 3 कोटी 25 लाख रुपयांची अनियमितता झाली असून, हे मेडिकल देशमुख कुटुंबाशी संबंधित आहे, ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली होती,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. गोरे यांना मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावाया संपूर्ण प्रकरणात गोरे यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावा करत रोहित पवार म्हणाले, “देवा भाऊ त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणूनच ते वाचत आहेत. पण पाठीशी कितीही मोठी शक्ती असली, तरी आम्ही न्यायासाठी लढत राहू.” तसेच या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता यावी आणि सत्य बाहेर यावे, यासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. राजकीय वर्तुळात खळबळया आरोपांमुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कोणत्या वळणावर जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी केलेले आरोप जर खरे ठरले, तर गोऱ्हे यांच्यासह संबंधितांवर मोठी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप Read More »

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा

Rohit Pawar: दोन दिवसापूर्वी 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहरात पार पडली. मात्र या स्पर्धेच्याउपांत्य फेरीत सामन्यात आणि अंतिम सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत सामन्यात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराजमोहोळ यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात राक्षे पराभूत झाले मात्र त्यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत निर्णय अमान्य केला. तर अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेवर आणि आयोजकांवर सोशल मीडियासह अनेक नेते मंडळी टीका करताना दिसत आहे. कर्जत – जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी देखील जोरदार टीका करत आयोजकांवर निशाणा साधला आहे. स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठीवादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं. म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो. असं रोहीत पवार यांनी ट्विट करत आयोजकांवर टीका केली आहे.

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा Read More »