Dnamarathi.com

Ram Shinde :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासह इतर राजकीय पक्षांनी देखील तयारी सुरू केली आहे. 

यातच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आगामी निवडणुका महायुतीतील घटक पक्ष हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील टीका केली होती. आता या टीकेला उत्तर देत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांसह विरोधकांना टोला लगावला.

राम शिंदे एका कार्यक्रमानिमित्त अहमदनगर शहरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी आपल्या पक्षावर लक्ष देणे गरजेचे आहे.

 आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याचा आम्ही निर्णय घेऊ. त्यांना आमच्या घरात काय चाललंय हे डोकं पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चाललं याकडे लक्ष दिले पाहिजे.

कर्जत एमआयडीसी वर बोलताना राम शिंदे म्हणाले की तो प्रस्ताव सदोष होता त्या प्रकल्पाला गावकऱ्यांनी देखील विरोध केला तसेच ती जमीन विवादातील होती.

 त्यामुळे नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून टीम ही कर्जत तालुक्यात गेली असून त्यांच्याकडून चाचणी केली जात आहे.

तसेच पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की याबाबत मी एक प्रशासकीय बैठक देखील घेतलेली आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा असे निर्देश मी दिलेले होते त्या अनुषंगाने आजच त्या टीमने सहा क जागांची पाहणी केली आहे. त्यामुळे लवकरच शासनाकडे आराखडा पाठवला जाईल अशी माहिती यावेळी राम शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *