DNA मराठी

Raj Thackeray news

mns

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी…

Raj Thackeray: पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाडिया कॉलेज परिसरात ABVP ने ‘बायकॉट मनविसे’ अशी पोस्टर्स लावल्याचा आरोप करत मनविसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या निषेधार्थ मनविसे कार्यकर्त्यांनी टिळक रोडवरील ABVP च्या पुणे कार्यालयावर धडक देत कुलूप ठोकले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार आंदोलन केले. मनविसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ABVP जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ABVP कार्यकर्त्यांनीही त्यांच्या बंद कार्यालयाबाहेर प्रतिउत्तरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुण्यात दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षाचे वातावरण चिघळले आहे. दरम्यान आता यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली असून पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती कृषिकेश रावले,पोलीस उपायुक्त झोन-1 यांनी दिली.

Raj Thackeray: मनविसेकडून ABVP कार्यालयाला टाळं, प्रत्युत्तरात ABVP चीही घोषणाबाजी… Read More »

raj thackeray

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत

Raj Thackeray: राज्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने पिके वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरत आहे. तर दुसरीकडे सरकारमधील अनेक मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत परिस्थिती जाणून घेत आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील रविवारपासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. मनसेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे या दौऱ्यात लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर काही जिल्ह्यात जाणार आहे. तर दुसरीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बीज बियाणे आणि खते मनसेकडून दिली जाणार. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण रविवारपासून मदत घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार. लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर भागातही मनसेची मदत पोहोचवली जाणार. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली बी-बीयाने आणि खते मनसेकडून दिली जाणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत Read More »

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचा कुणाल कामरा – राज ठाकरेंवर हल्लाबोल

Gulabrao Patil : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली, तर राज ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्यावरही त्यांनी खरमरीत भाष्य केले. गुलाबराव पाटील म्हणाले, “कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे, त्याने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याचं दुकान बंद झालं आहे. आता तो शिंदे साहेबांवर टीका करतोय. त्याला वाटत असेल की बोलल्यावर काही होणार नाही, पण तो चुकतोय.” पाटील यांनी पुढे सांगितलं की, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. “दोन दिवसांत त्याने माफी मागितली नाही, तर शिवसेना स्टाईलने त्याच्या तोंडाला काळं फासू,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं, “संजय राऊत हा त्यांचाच माणूस आहे. त्यांच्याच सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे.” दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही पाटील यांनी टीकेची झोड उठवली. राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “काल त्यांना स्वप्न पडलं असेल. साधा एक आमदार निवडून आणू शकत नाहीत. फक्त सभांना गर्दी असते. मी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. पालिका निवडणुका येताहेत, त्यामुळे ही नौटंकी सुरू आहे.” पाटील यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली. कुणाल कामराच्या वक्तव्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले असून, त्यांनी मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओमध्ये तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि मनसे यांच्यातील शाब्दिक चकमक तीव्र होताना दिसत आहे. या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांचा कुणाल कामरा – राज ठाकरेंवर हल्लाबोल Read More »

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला

Raj Thackeray : केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मताने व नेशन व इलेक्शन प्रस्ताव पास केल्यानंतर काही जणांनी याला समर्थन तर काही जणांनी विरोध केला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारला टोला लावत राज्यात आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या असा टोला लावला आहे.  राज ठाकरे म्हणाले की, ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला   केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.  बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो…  पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या. असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला Read More »

Raj Thackeray : … म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश टाळला, ‘हे’ आहे कारण

Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा करत महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला होता त्यामुळे महायुतीमध्ये जाण्याबाबतची बोलणी फिसकटली असं म्हणाले होते. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज ठाकरे यांच्या महायुतीमध्ये प्रवेश भाजपमुळे नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला नाही.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी असा प्रस्ताव राज ठाकरे यांना दिला होता. मात्र राज ठाकरे आपला चिन्ह इंजिन सोडून दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या कालच्या भाषणाबाबत उल्लेख देखील केला होता. सूत्रांनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासबोत ताज लँड्समधील बैठकीत राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा प्रस्ताव देण्यात आला होता.  तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत यापूर्वी स्पष्टीकरण देत सांगितले होते की, भाजपकडून राज ठाकरे यांना त्यांच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी, असा कुठलाही प्रस्ताव देण्यात आला नव्हता.    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. पक्षाचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला.

Raj Thackeray : … म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश टाळला, ‘हे’ आहे कारण Read More »

BJP Raj Thackeray MNS Alliance : राज ठाकरे एकत्र आल्यास यूपी, बिहारमध्ये टेन्शन वाढणार? भाजपने उचलले ‘हे’ पाऊल

BJP Raj Thackeray MNS Alliance : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपमध्ये युती होणार असल्याची चर्चा होत आहे.  आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरण पाहता भाजपला राज ठाकरेंची गरज असल्याने ही युती होणार असल्याची चर्चा आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीतील भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे आणि पवार यांनीही याला सहमती दर्शवली आहे.  गेल्या आठवड्यातच राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा झाली. त्यांच्यात लोकसभा जागावाटप आणि युतीबाबत 40 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंनी दोन जागांची मागणी केली आहे. मात्र भाजप त्यांना मुंबईत जागा देण्याच्या विचारात आहे. मात्र, मनसे आणि भाजप एकत्र येण्याच्या मार्गात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे राज ठाकरे यांची ‘ट्रान्स-प्रांतीय’बाबतची कठोर भूमिका.  मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात अमराठी लोकांविरोधात प्रचार केला. ठाकरे यांनी महाराष्ट्रात विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राहणाऱ्या लोकांविरोधात अनेकदा आक्रमक वक्तव्ये केली आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात वारंवार आक्रमक भूमिका घेतल्याने उत्तर भारतीयांमध्ये संतापाची भावना आहे. राज ठाकरेंच्या महायुतीतील संभाव्य प्रवेशामुळे मुंबईतील भाजपचे उत्तर भारतीय कार्यकर्ते आणि अधिकारी खूश नाहीत. उत्तर भारतीय मजूर, छठपूजा आदींबाबत राज यांची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांमध्ये नकारात्मक प्रतिमा आहे. राज यांना सोबत घेतल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारवरही परिणाम होईल, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे आता मनसेच्या महायुतीमध्ये प्रवेशाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीत ‘चारशे पार’चा नारा देणाऱ्या हिंदी पट्ट्यातील भाजपच्या प्रतिमेवर याचा परिणाम होणार आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींच्या राज्याभिषेकात उत्तर भारतातील मतदारांची भूमिका महत्त्वाची असेल आणि त्यामुळे कोणताही धोका पत्करता येणार नाही, असा विश्वास भाजपला आहे. मनसेबाबतचा निर्णय राज्यस्तरावर घेतला जाईल, असा पवित्रा भाजपने घेतला आहे. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका न घेण्याचा सल्ला भाजपने मनसेला दिला आहे. शिंदे सेनेचा विरोध? राज ठाकरे यांनी भाजपकडे लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली आहे. यामध्ये दक्षिण मुंबई तसेच नाशिक किंवा शिर्डी येथील जागांचा समावेश आहे. मात्र, शिवसेनेने (शिंदे गट) त्याला विरोध केला. गेल्या निवडणुकीत दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तिन्ही जागा शिवसेनेने (अविभक्त) जिंकल्या होत्या. तीनपैकी दोन खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे तर एक खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. शिंदे यांना पुन्हा या तीन जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत.

BJP Raj Thackeray MNS Alliance : राज ठाकरे एकत्र आल्यास यूपी, बिहारमध्ये टेन्शन वाढणार? भाजपने उचलले ‘हे’ पाऊल Read More »

Raj Thackeray : मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, आठ दिवसांचा वेळ नाहीतर रस्त्यावर…

Raj Thackeray :  दुकान व आस्थापणांना मराठी भाषेतील पाटी लावण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयाने मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी अद्यापही परिस्थिती जैसे थी आहे, यामुळे आता मनसेने आक्रमक पाऊल उचलले आहे. न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ आठ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत करून घ्यावे. अन्यथा मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन हातात घेतले जाईल. असे पत्र अहमदनगर शहरातील बाजारपेठेतील इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या व्यावसायिकांना दिले आहे. आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा रस्त्यावर….मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीत पाट्या हव्यात असे सांगून महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी रान उठविले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही अनेकांनी आपल्या आस्थापनांच्या पाट्या मराठीत केल्या होत्या. त्यानंतर मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी होऊन महाराष्ट्रात व्यवसाय करत असलेल्या प्रत्येक आस्थापनांची नामफलक हे मराठी देवनागरी लिपी मध्ये असावं हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. परंतु आदेशानंतरही बऱ्याच दुकानदारांकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेकडून मराठी पाट्यांसाठी व्यावसायिकांना पत्राची मोहीम हाती घेतली आहे. मराठी नामफलकावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढला आहे. आता हा विषय राजकीय राहीलेला नाही आता न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ ८ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत करून घ्यावे. अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन हातात घेतले जाईल. असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अहमदनगर शहरातील बाजारपेठेतील इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या व्यावसायिकांना दिले आहे. व्यावसायिकांनी ८ दिवसांत इतर भाषेतील पाट्या बदलून मराठी भाषेत लावाव्यात अन्यथा आठ दिवसांनंतर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल. असा इशारा मनविसेने दिला आहे.

Raj Thackeray : मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, आठ दिवसांचा वेळ नाहीतर रस्त्यावर… Read More »