Dnamarathi.com

Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा करत महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला होता त्यामुळे महायुतीमध्ये जाण्याबाबतची बोलणी फिसकटली असं म्हणाले होते. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज ठाकरे यांच्या महायुतीमध्ये प्रवेश भाजपमुळे नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला नाही.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी असा प्रस्ताव राज ठाकरे यांना दिला होता. मात्र राज ठाकरे आपला चिन्ह इंजिन सोडून दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या कालच्या भाषणाबाबत उल्लेख देखील केला होता.

सूत्रांनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासबोत ताज लँड्समधील बैठकीत राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा प्रस्ताव देण्यात आला होता. 

तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत यापूर्वी स्पष्टीकरण देत सांगितले होते की, भाजपकडून राज ठाकरे यांना त्यांच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी, असा कुठलाही प्रस्ताव देण्यात आला नव्हता. 

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. पक्षाचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *