DNA मराठी

Pune

Crime

Pune Crime: पुण्यात डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश

Pune Crime : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वारजे आणि उत्तम नगर परिसरात डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून ड्रग्स विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील राठोड याला अटक करण्यात आली असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी Porter या डिलिव्हरी ॲपचा वापर करून MD (मॅफेड्रोन) या ड्रग्सचा पुरवठा करत होते. पोलिस तपासात तब्बल 300 जणांना या ड्रग्सचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून काही प्रमाणात MD ड्रग्स जप्त केले असून, या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश Read More »

santosh pandit

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी रील स्टार संतोष पंडीतवर गुन्हा दाखल…

Santosh Pandit : सोशल मीडियावर स्वतःला रील स्टार म्हणून मिरवणाऱ्या संतोष पंडित याच्याविरोधात महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे आणि परवानगीशिवाय मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सोमवारी (30 मार्च) टिळक रस्त्यावर ही घटना घडली. नाशिकमधील खरात प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी संतोष पंडित घटनास्थळी येऊन पत्रकारांवर संताप व्यक्त करत गैरवर्तन करू लागल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याने संबंधित पत्रकाराबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली तसेच अश्लील हावभावही केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, पंडितने केवळ संबंधित पत्रकारालाच नव्हे तर आंदोलनात सहभागी इतर महिलांनाही धमकावण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, महिलेच्या इच्छेविरुद्ध मोबाईलवर चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे. महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७५, ७८, ३५२, ३५१ (२) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत असून पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी रील स्टार संतोष पंडीतवर गुन्हा दाखल… Read More »

Crime

Pune Crime: समलैंगिक संबंधांना विरोध अन् 22 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलांची केली हत्या…

Pune Crime: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात १७ मार्चला १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती . ही हत्या अक्षय दत्तात्रय मांजरे या २२ वर्षांच्या तरुणाने समलैंगिक संबंधना विरोध केल्याने केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. मात्र या हत्येचा तपस करताना आरोपी अक्षय मांजरेने मागीलवर्षी २१ जूनला अशाचप्रकारे समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने ११ वर्षांच्या मुलाची देखील हत्या केली होती असं तपासात उघड झालंय. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपी अक्षय मांजरे हा त्याठिकाणी गर्दीचा भाग म्हणून उभा होता. २१ जून २०२५ ला त्याने समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा डोक्यात दगड घालून खून केला मात्र त्या हत्येचा तपास पोलिसांनी व्यवस्थित केला नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. अक्षय मांजरेवर संशय असल्याने त्याची जुजबी चौकशी करून त्यावेळी त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर १७ मार्च २०२६ ला त्याने पुन्हा १२ वर्षाच्या एका मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही मुलाने विरोध केल्याने अक्षय मांजरेने त्याचाही डोक्यात दगड घालून खून केला. या दोनाही हत्या करून आपला त्या हत्येनशी कोणताही संबंध नाही हे दाखवण्यासाठी तो तपासासाठी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तिथे उपस्थित राहत होता. अखेर पोलिसांनी गावातील अनेकांची कसून चौकशी करायचं ठरवलं त्यावेळी अक्षय मांजरेच्या सांगण्यामध्ये पोलिसांना विसंगती जाणवू लागली आणि या दोन हत्येंचा उलगडा झाला.

Pune Crime: समलैंगिक संबंधांना विरोध अन् 22 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलांची केली हत्या… Read More »

pune zilla parishad

Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक जिल्हा परिषद यांनी जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या पाचव्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जिल्हा परिषदेची विशेष सभा आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीच्यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भुषण जोशी, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदी उपस्थित उपस्थित होते. डुडी म्हणाले, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ चे कलम ४५ (२) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व निवडणूक) नियम १९६२ प्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे, असे डुडी म्हणाले. अध्यक्ष पदाकरिता विरधवल कृष्णराव जगदाळे आणि विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, त्यापैकी विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी माघार घेतली. तसेच उपाध्यक्ष पदाकरिता विवेक प्रतापराव वळसे पाटील आणि मंगेश गुलाबराव काकडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यापैकी मंगेश गुलाबराव काकडे यांनी माघार घेतली. त्यामुळे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला डुडी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त नामनिर्देशन पत्राचे वाचन केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त सर्व नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे जाहीर करुन ते मागे घेण्याकरिता १५ मिनीटांचा कालावधी देण्यात आला. सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील Read More »

Police

Maharashtra Crime : धक्कादायक, लोणीकंद मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांकडून मोठ्या भावाला मारहाण

Maharashtra Crime : अभियांत्रिकी महाविद्यालयातील सी सी टीव्ही कॅमेऱ्याचा पासवर्ड का बदलला असे विचारले म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्याने मुलासह मोठ्या भावाला मारहाण केल्याचा प्रकार लोणीकंदमध्ये घडला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर रामचंद्र भूमकर ( वय ५८) व त्यांचा मुलगा सिद्धांत ( वय २५ ) ( दोघेही रा. लोणीकंद ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचे मोठे भाऊ उद्धव रामचंद्र भूमकर ( वय ६५, रा. लोणीकंद ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर कुटुंबीयांचे रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हे महाविद्यालय आहे. उद्धव भूमकर हे त्या संस्थेचे खजिनदार आहेत. तर शंकर भूमकर हे संचालक असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. बकोरी रोडवर हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील सी सी टीव्ही चा पासवर्ड सिद्धांत याने बदलला. तसेच सर्व आर्थिक व्यवहार शंकर व त्यांचा मुलगा बघतात. त्याबाबत उद्धव यांना काही कळू देत नाहीत. त्याबाबत विचारणा केली की दोघे शिवीगाळ करायचे. कॉलेजच्या काही महत्वाच्या फाईल जागी दिसल्या नाही. लोणीकंद येथील घरी उध्दव यांनी पासवर्ड व फाईल बद्दल शंकर यांना विचारले असता. दोघा बाप लेकांनी उद्धव यांना तू आम्हाला विचारणारा कोण म्हणून शिवीगाळ करीत आधी लाथा बुक्याने व नंतर कोणत्या तरी कठीण वस्तुने खाली पाडून मारहाण केली. उद्धव यांच्या पुतण्याने व पत्नीने त्यांची सोडवणूक केली. यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसात त्यांनी दोघांविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

Maharashtra Crime : धक्कादायक, लोणीकंद मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांकडून मोठ्या भावाला मारहाण Read More »

Sharad Pawar

Sharad Pawar: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बारामतीमध्ये प्राथिमक उपचार घेतल्यानंतर त्यांना दुपारी पुण्याला हलविण्यात आले आहे. दोन दिवसांपासून त्यांना अवस्वस्थ वाटत असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी आणखी त्रास जाणवल्याने बारामतीतील डॉक्टरांनी तपासणी केली. मात्र, त्यानंतर दुपारी त्यांना तातडीने पुण्याला हलविण्याच सल्ला देण्यात आला. माहितीनुसार, शरद पवार यांना श्वासनाचा आणि खोकल्याचा त्रास असल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले आहे.

Sharad Pawar: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली Read More »

mahesh landge

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे

Mahesh Landge : महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देखील दिले आहे. या निवेदनात महेश लांडगे म्हणाले की, ”दिवंगत अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड शहरात ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मंजुरी देण्यात येणार आहे. “पिंपरी-चिंचवड शहर देशातील क्रमांक एकचे शहर बनवण्याचे दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजितदादांची विकासदृष्टी, लोककल्याणाची भावना आणि शहराच्या प्रगतीसाठीचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे महाराष्ट्राला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही राज्याची मोठी हानी आहे, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून शहरवासी यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तत्पूर्वी जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे, असल्याचे लांडगे यांनी सांगितले. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभारण्यात येणारे स्मारक, सभागृहाला दिले जाणारे त्यांचे नाव आणि ‘अजित सृष्टी’ ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देत राहील. याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार लांडगे म्हणाले.

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे Read More »

pune crime

Pune Crime: पुणे हादरलं,आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव; कारण काय?

Pune Crime: पुण्यात आईच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्वतः आईनेच आपल्या ११ वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केली तर १३ वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील वाघोली येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बीएआयएफ रोड परिसरात ही घटना घडली आहे. सोनी संतोष जायभाय असे आरोपी मातेचे नाव आहे. तिने आपला ११ वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तिने आपली १३ वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. दरम्यान, या भयंकर हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला, तर धनश्री गंभीर जखमी झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जायभाय कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून, कामानीनिमित्ताने ते वाघोली येथे स्थायिक झाले होते. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले आहे. मात्र, एका आईने आपल्याच पोटच्या मुलांना संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचे गूढ अद्याप उकललेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना की मानसिक आजार? पोलीस या सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

Pune Crime: पुणे हादरलं,आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव; कारण काय? Read More »

ganesh bidkar

Pune Election: भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

Pune Election : भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगावर धावून जात शिवीगाळ केल्याचा आरोप असून निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. हा प्रकार 10 जानेवारी रोजी सायंकाळी मंगळवार पेठेतील सदानंद नगर परिसरात घडला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आदित्य दीपक कांबळे (वय 24) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निलेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवार पेठेत थांबले होते. याचवेळी भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्तेही शुभेच्छा देण्यासाठी आल्याने परिसरात गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी सागर कांबळे याने गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Pune Election: भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल… Read More »

img 20260107 wa0041

Pune Crime: पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; एका लॉजमध्ये विष पिऊन संपवले जीवन

Pune Crime : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉज मध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज मराठे असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते सांगली पोलिस दलात तासगाव येथे कार्यरत होते. अवघ्या 25 वर्षाचे असताना मराठे यांची सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील देहू याठिकाणी त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सांगली पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने सुट्टी टाकली होती. त्यांना गुडघ्याच्या त्रास असल्याने ते पुणे शहरात उपचारासाठी येत असत. यंदा सुद्धा पुण्यात उपचारासाठी आलेल्या मराठे यांनी सुट्टी टाकली होती. पुण्यात आल्यावर उपचारासाठी गेल्यावर ते पुन्हा लॉजवर आले आणि त्यांनी त्यांच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळून आलेली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; एका लॉजमध्ये विष पिऊन संपवले जीवन Read More »